शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
5
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
6
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
7
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
8
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
9
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
10
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
11
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
12
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
13
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
14
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
15
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
16
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
17
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
18
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
19
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
20
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

वाघजाईदेवी यात्रा उत्सवनिमित्त पुण्यातील पळसोशीत रंगला मातीतील कुस्त्यांचा आखाडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 6, 2018 13:39 IST

भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील पळसोशी (ता. भोर) येथील ग्रामदैवत श्री वाघजाईदेवी यात्रा-उत्सवानिमित्त भरविण्यात आलेल्या जंगी कुस्त्यांच्या आखाड्यात तालुक्यातील शेकडो मल्लांनी नेत्रदीपक कुस्त्या करून कुस्तीशौकिनांची मने जिंकली.

ठळक मुद्देतालुक्यातील शेकडो मल्लांनी नेत्रदीपक कुस्त्या करून कुस्तीशौकिनांची जिंकली मने५० रुपये ते ५ हजार रुपयांपर्यंत ग्रामस्थांकडून कुस्त्यांना देण्यात आले इनाम

नेरे : भोर तालुक्याच्या दक्षिणेकडील विसगाव खोऱ्यातील पळसोशी (ता. भोर) येथील ग्रामदैवत श्री वाघजाईदेवी यात्रा-उत्सवानिमित्त भरविण्यात आलेल्या जंगी कुस्त्यांच्या आखाड्यात तालुक्यातील शेकडो मल्लांनी नेत्रदीपक कुस्त्या करून कुस्तीशौकिनांची मने जिंकली.विसगाव खोऱ्यातील ग्रामदैवतांच्या पहिल्या टप्प्यातील यात्रा-उत्सव पळसोशी गावच्या वाघजाईदेवीच्या उत्सवाने चालू होतो. बुधवारी (दि. ४) पहाटे देवीला अभिषेक, ग्रामप्रदक्षिणा, पारंपरिक ढोलताशाचा खेळ दुसऱ्या दिवशी लोकनाट्य तमाशा आणि मातीतील जंगी कुस्त्यांचा आखाडा भरवण्यात आला. या वेळी प्रकाश म्हस्के, बाळू राऊत, अंकुश म्हस्के, पोपट जाधव, तारक म्हस्के, अमित म्हस्के, ज्ञानेश्वर म्हस्के, गोपीचंद म्हस्के, सरपंच रामचंद्र म्हस्के, तुकाराम म्हस्के यांनी पंच म्हणून, तर खजिनदार आनंदा म्हस्के, अंकुश म्हस्के, संतोष म्हस्के यांनी काम पाहिले.या आखाड्यात तालुक्यातील शेकडो नामवंत पैलवानांनी हजेरी लावली. ५० रुपये ते ५ हजार रुपयांपर्यंत ग्रामस्थांकडून कुस्त्यांना इनाम देण्यात आले. पैलवानांनी चितपट कुस्त्या करून पंचक्रोशोतील तसेच तालुक्यातील कुस्ती शौकिनांच्या डोळ्यांचे पारणे फेडले.

टॅग्स :Puneपुणे