कोरोना रूग्णवाढीत वडगाव शेरी पुणे शहरात अव्वल; प्रभाग ५ मध्ये तर नऊ दिवसांत विक्रमी ११६४ रूग्ण 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 25, 2021 09:19 PM2021-03-25T21:19:31+5:302021-03-25T21:19:47+5:30

पूर्वी दहा दिवसाला कोरोनाचे रुग्ण हजार होत होते. मात्र, आता दहा दिवसांमध्ये जवळपास अडीच हजार नवे रुग्ण आढळून आले आहेत.

Wadgaon Sheri tops Pune in terms of patient growth; Ward 5 has a record 1164 patients in nine days | कोरोना रूग्णवाढीत वडगाव शेरी पुणे शहरात अव्वल; प्रभाग ५ मध्ये तर नऊ दिवसांत विक्रमी ११६४ रूग्ण 

कोरोना रूग्णवाढीत वडगाव शेरी पुणे शहरात अव्वल; प्रभाग ५ मध्ये तर नऊ दिवसांत विक्रमी ११६४ रूग्ण 

googlenewsNext

विशाल दरगुडे- 

चंदननगर: कोरोनीचा संसर्ग रोखण्यासाठी पुणे महानगरपालिकेने नियमावली तयार केलेली आहे.परंतू त्याला हरताळ फासला जात असल्याचे दिसून येत आहे.बाजारापेठत आजही गर्दी दिसत आहे. गेल्या दहा दिवसांमध्ये नगररस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीमध्ये कोरोना रुग्णांची संख्या पुणे शहरामध्ये जोराने म्हणजे प्रथम क्रमांकांची आहे. यात वडगावशेरी-कल्याणीनगर प्रभाग ५ मध्ये दररोज सरासरी शंभरच्या पुढेच रूग्ण सापडत आहेत. काल तर उच्चांक १८२ रूग्ण सापडले आहेत. रुग्णवाढीचा दर दुप्पट झाला आहे.

पूर्वी दहा दिवसाला कोरोनाचे रुग्ण हजार होत होते. मात्र, आता दहा दिवसांमध्ये जवळपास अडीच हजार नवे रुग्ण रुग्ण आढळून आले आहेत. सर्वात जास्त रुग्ण प्रभाग पाच वडगाव शेरी मध्ये आहे.

वडगाव शेरी – नगररोड क्षेत्रीय  कार्यालयाच्या हद्दीमध्ये गेल्या महिन्याभरामध्ये मोठया प्रमाणात रुग्ण वाढले आहे. क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीमध्ये १८ सुक्ष्म प्रतिबंधित्र क्षैत्र आहेत.यामध्ये वडगाव शेरी, खराडी, लोहगाव, शास्त्रीनगर, विमाननगर, पोरवाल रोड या ठिकाणी सुक्ष्म प्रतिबंधित्र क्षेत्र आहेत.   

कोरोनाचे रुग्ण वाढत आहे. तरी, अद्याप  नागरीक हे निर्बंध पाळत नाहीत.लग्नात पन्नास पेक्षा जास्त नागरीक असतात. मास्क आणि  सोशल डिस्टसिंगचा वापर करत नाही. दोनशे पेक्षा जास्त नातेवाईकामध्ये लग्न होत आहे. कल्याणीनगर, विमाननगर, वडगावशेरीमधील हॉटेल गर्दीने फुलले आहे.कुठेही कोरोनाचे नियम पाळले जात नाहीत.  भाजी मंडई, मंदिर आणि सार्वजनिक ठिकाणी गर्दी होत आहे. मास्क न वापरणाऱ्यावरील कारवाईच होत नाही. त्याचा गैरफायदा नागरीक घेतात.

दरम्यान,नगररस्ता क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत १५ ते २४ मार्च च्या दरम्यान २९३३ रुग्ण सापडले आहेत. खराडी येथील कोविड केअर सेंटर पुन्हा सुरू केले आहे. कोरोना रुग्ण वाढू नये. यासाठी प्रशासन उपाययोजना करत आहे.वडगाव शेरी प्रभाग ५ मध्ये ११६४ खराडी प्रभाग ४ मध्ये ८६३, विमाननगर प्रभाग 3 मध्ये ४९६ , लोहगाव प्रभाग ४२ मध्ये ४१० नवीन कोरोनाचे रुग्ण आढळून येत असल्याने पालिकेची चिंता वाढू लागली आहे.तरी देखील नगररस्ता क्षेत्रीय कार्यालायाला गांभीर्य नसून कडक निर्बंध करण्याची गरज आहे.वडगावशेरी-खराडी-लोहगाव-विमाननगरमधील नागरिकांना मात्र याची तमाच नसल्याचे वाढणाऱ्या आकडेवारीत दिसुन येत आहे.

वडगावशेरी,खराडी याठिकाणच्या बाजारपेठेत सकाळी संध्याकाळा गर्दी दिसते.फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन होत नाही.रिक्षातुन दोनच प्रवासी नेण्याचे बंधन असताना तिन प्रवासी घेऊन जातात.
.........
कोरोनाचे नियम न पाळणाऱ्यांवर दंडत्माक  कारवाई केली जात आहे.नगररस्ता आरोग्य विभागाकडून दररोज गर्दीच्या मास्क न वापरणे तसेच सुरक्षित अंतर न ठेवणाऱ्या ठिकाणी कारवाई केली जात आहे.

- सुहास जगताप,नगररस्ता क्षेत्रीय अधिकारी.

Web Title: Wadgaon Sheri tops Pune in terms of patient growth; Ward 5 has a record 1164 patients in nine days

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.