शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

पुणे जिल्ह्यातील २३३ ग्रामपंचायतींसाठी ५ नोव्हेंबरला मतदान; 'या' दिवशी होणार मतमोजणी

By नितीन चौधरी | Updated: October 3, 2023 21:14 IST

पुणे : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील जानेवारी ते डिसेंबर अखेर मुदत संपणाऱ्या व नवनिर्मित ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या. त्यात ...

पुणे : राज्य निवडणूक आयोगाने राज्यातील जानेवारी ते डिसेंबर अखेर मुदत संपणाऱ्या व नवनिर्मित ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर केल्या. त्यात जिल्ह्यातील २३३ ग्रामपंचायतींचा समावेश आहे तसेच १५७ ग्रामपंचायतीमधील रिक्त जागांवरही पोटनिवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यासाठी१६ ऑक्टोंबपासून उमेदवारी अर्ज दाखल करता येणार असून, ५ नोव्हेंबरला मतदान होणार आहे. तर ६ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे. 

याबाबत संबंधित तहसीलदार ६ ऑक्टोबर रोजी निवडणुकीची नोटिस प्रसिद्ध करतील. तर १६ ते २० ऑक्टोबर दरम्यान उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. २३ ऑक्टोबरला अर्जांची छाननी होणार असून, २५ ऑक्टोबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत अर्ज मागे घेता येणार आहे. त्याच दिवशी निवडणूक लढविणार्‍या उदेवारांची अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे.

उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करावा लागणार आहे. तर निधन, राजीनामा, अन्य कारणामुळे ग्रामपंचायत सदस्य आणि थेट सरपंचाची पदे रिक्त झालेल्या ठिकाणी पोटनिवडणूक होणार असून, यासाठी नेहमीच्या पद्धतीने अर्ज करावे लागणार आहेत. या घोषणेमुळे निवडणूक जाहीर झालेल्या ठिकाणी आचारसंहिता लागू झाली आहे. आरक्षित जागेवर निवडणूक लढविणार्‍या उमेदवाराला अर्जासोबत जातवैधता प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे सादर केलेल्या अर्जाची पावती जोडावी लागणार आहे. तसेच एक वर्षाच्या आत पडताळणी समितीने दिलेले वैधता प्रमाणपत्र सादर करण्याबाबतचे हमीपत्र उमेदवारी अर्जासोबत जोडावे लागणार आहे.

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतPuneपुणे