नरेश बाबूराव विश्वकर्मा (वय ३९, रा. नायगाव (ईस्ट), रश्मी स्टार सिटी, जी-५ २०१ पालघर) असे अटक केलेल्याचे नाव आहे. याप्रकरणात चंदन ठाकरे यास यापूर्वीच अटक करण्यात आली असून, अन्य तिघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत साप्ते यांच्या पत्नीने वाकड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
गेली तीन वर्षांमध्ये हा प्रकार घडत होता. विश्वकर्मा व त्याच्या अन्य साथीदारांनी साप्ते यांस जिवे मारण्याची धमकी देण्यासह कामगार कामावर येऊ देणार नाही, तसेच व्यावसायिक नुकसान करण्याच्या धमक्या दिल्या. त्यानंतर, त्यांकडून दहा लाख रुपये व प्रत्येक प्रोजेक्टमध्ये एक लाख रुपये या स्वरुपात पैशांची मागणी केली. याखेरीज, व्यवसायात पार्टनर असलेल्या चंदन ठाकरे याने वेळोवेळी विश्वासघात व फसवणूक करून आर्थिक नुकसान केले. त्यास कंटाळून साप्ते यांनी गळफास घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे. याप्रकरणी आरोपीला अटक करत न्यायालयात हजर करण्यात आले. सहायक सरकारी वकील विशाल मुरळीकर युक्तिवाद करताना म्हणाले, आरोपींनी केलेला गुन्हा गंभीर स्वरुपाचा आहे. त्यांनी कट रचून साप्ते यांकडून खंडणी वसूल केली. तसेच, साप्ते यांच्या प्रत्येक प्रोजेक्टमध्ये दबाव आणून बेकायदेशीररीत्या वाटा प्राप्त केला. गुन्ह्यातील अन्य आरोपींना अटक करायची असून गुन्ह्याच्या अधिक तपासासाठी आरोपीला पोलीस कोठडी द्यावी. न्यायालयाने ती मान्य केली.
------------------------------