शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
3
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
4
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
5
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडेली पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
6
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
7
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
8
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
9
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
10
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
11
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
12
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
13
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
14
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
15
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
16
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
17
Ashok Kharat Case : भोंदूबाबा खरातचा 'महाप्रताप'! भक्तांच्याच नावे उघडली १०० बोगस खाती; 'समता' आणि 'जयदंबा' पतसंस्था रडारवर
18
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
19
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
20
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
Daily Top 2Weekly Top 5

सचिन कुंडलकरांच्या पाेस्टचा विश्वंभर चाैधरींकडून खरपूस समाचार म्हणाले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 10, 2019 12:00 IST

साहित्य संमेलनावर दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी टीका करताना यवतमाळला कमी लेखले हाेते, त्यांच्या फेसबुक पाेस्टचा विश्वंभर चाैधरी यांनी समाचार घेतला.

पुणे : यवतमाळ येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन नयनतारा सेहगल यांना पाठवण्यात आलेले निमंत्रण मागे घेण्यात आल्याने संमेलन वादात सापडले असताना या वादात दिग्दर्शक सचिन कुंडलकर यांनी उडी घेतली हाेती. यवतमाळ कुठे आहे हे मला माहित देखील नव्हते अशा शब्दात त्यांनी साहित्य संमेलनावर टीका करताना यवतमाळला कमी लेखले हाेते. त्याचा खरपूस समाचार घेत सामाजिक कार्यकर्ते यांनी कुंडलकरांना उद्देशून पाेस्ट लिहीत यवतमाळ कुठे हे तुम्हाला कसं माहित असणार? हा काही ग्लॅमरस एरिया नाही जुहू बीच सारखा अशी उपराेधिक टीका त्यांच्यावर केली आहे. 

    इंग्रजी साहित्यिका नयनतारा सेहगल यांना संमेलनाच्या उद्घाटक म्हणून पाठवलेले निमंत्रण संमेलनाच्या काही दिवस आधी मागे घेण्यात आले. सरकारी दबावाला बळी पडून हा निर्णय आयाेजकांनी घेतल्याची टीका सर्वच स्तरातून करण्यात आली. यावर फेसबुक पाेस्ट लिहीत सचिन कुंडलकरांनी संमेलनावर टीका केली. परंतु ही टीका करत असताना त्यांनी यवतमाळला कमी लेखले. कुंडलकर यांनी आपल्या फेसबुक पाेस्टमध्ये लिहीले हाेते की, 'यवतमाळ कुठं आहे हेच मला माहीत नव्हतं. अशा अनोळखी जागी गर्दी करून भयंकर भाषणं ऐकण्यापेक्षा पुण्या-मुंबईत किंवा एखाद्या निसर्गरम्य ठिकाणी जमून छोटी गेट टूगेदर्स करणं जास्त चांगलं होणार नाही का?, मोकळेपणानं लिहायला आणि मनसोक्त वाचायला लाखो माणसांनी येऊ गर्दी करायची काय गरज आहे?    अनेकांनी कुंडलकरांच्या पाेस्टवर टीका केल्याने त्यांनी ती पाेस्ट डिलीट केली. यावर विश्वंभर चाैधरी यांनी फेसबुक पाेस्टच्या माध्यामातूनच उत्तर दिले असून चाैधरी म्हणतात, प्रिय कुंडलकर,यवतमाळ कुठे हे तुम्हाला कसं माहित असणार? हा काही ग्लॅमरस एरिया नाही जुहू बीच सारखा. हा तर महाराष्ट्रातला तो जिल्हा जिथं सर्वाधिक शेतकर्यांच्या आत्महत्त्यांचा अंधार भरून राहिला आहे. तुमचं अन्न तो तयार करतो, त्यांच्यातला शेवटचा आत्महत्त्या करत नाही तोपर्यंत तुम्हाला पैसे मोजून धान्य मिळत राहील. त्याला तुच्छ लेखण्याची मस्तीही चालून जाईल तोपर्यंत.पण तुम्ही त्याचं पोट चालवता त्यापेक्षा जास्त तोच तुमचं पोट चालवतो. त्याच्या शेजारच्याच जिल्ह्यात वीज तयार होते जी तुम्हाला सदैव लाईम'लाईट'मध्ये ठेवते! तुम्ही शूटींगच्या वेळी 'लाईट्स ऑन' वगैरे ओरडत असाल तेव्हा त्याचे आभार माना कारण वीज तयार करण्यात होणारं भयंकर प्रदूषण तो सहन करतो आणि तुम्हाला कायम उजेडात ठेवतो; स्वतः पंधरा पंधरा तासाचं 'लोड शेडींग' सहन करून.आणि हो पुण्यामुंबईत स्थिरावलेले त्याचे पोरगा-भाचा-भाऊ-पुतण्या हेच तुमच्या सिनेमाचे गल्ले भरून देतात. तुमचे अन्नदाता.यवतमाळ कुठं आहे आणि ते कसं आहे ते आम्ही तुम्हाला चर्चेत समजावून सांगू. नकाशासह. कधीही, पुण्यातल्या कोणत्याही कट्ट्यावर. खात्री आहे की आमच्याशी बोलल्यावर तुमच्या मनात असे प्रश्न उभेच राहणार नाहीत.

टॅग्स :Sachin Kundalkarसचिन कुंडलकर Yavatmalयवतमाळliteratureसाहित्य