शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
2
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
3
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
4
खाकी वर्दीतला 'हा' चेहरा ओळखला का?; ज्यानं टीम इंडियाला पहिला टी-२० वर्ल्डकप जिंकवला
5
समुद्री चाचे लुटूनही सोबत घेऊन जाऊ शकले नाहीत, एवढा खजिना भारताच्या जहाजावर सापडला; हिरे, सोने, चांदी...
6
शस्त्रसंधी धोक्यात, भारताच्या चिंतेत वाढ! होर्मुझ सामुद्रधुनीत सध्या परिस्थिती काय आहे?
7
Travel : रात्री चमकणारा समुद्र अन् काचेची वाळू; जगातील सर्वात हटके बीचेस, भारतातील 'या' किनाऱ्याचाही समावेश!
8
अवघ्या २४ तासांतच फुस्सं झाला पाकिस्तानचा प्लॅन?; २५० मृत्यूनंतर तुर्कीनं इस्रायलला फटकारलं
9
Latest Marathi News LIVE: ...म्हणून मी माघार घेण्याचा निर्णय रद्द केला; करूणा मुंडेंचा दावा, बारामतीत लढणारच
10
"मुनीर आपले हिरो, आज अल्लाहने..."; अमेरिका-इराण युद्धविरामाचं श्रेय घेण्यासाठी शहबाज शरीफ यांचा आटापिटा
11
Hyundai Creta Summer Edition: कमी किंमतीत प्रीमिअम फीचर्स! ह्युंदाई क्रेटा समर एडिशन लॉन्च, पाहून स्पर्धकांना फुटला घाम
12
वाहनमालकांनो...! उद्यापासून टोल नाक्यावर रोख रक्कम स्वीकारली जाणार नाही! फास्टॅग, युपीआय नसेल तर पुढे जाता येणार नाही...
13
सिलिंडरच्या OTP मुळे वाचला जीव, विहिरीत ३ दिवस मृत्यूशी झुंज; आजोबांसोबत काय घडलं?
14
इराण-अमेरिका बैठकीपूर्वी २ दिवस सुट्टी जाहीर, हॉटेलही केले रिकामे; पाकिस्तानात खास तयारी
15
जगातील अजब देश! या १० देशांकडे स्वतःचे 'सैन्य'च नाही; मग संरक्षणाची जबाबदारी कोणाची?
16
सावधान! स्मार्टफोनमध्ये चुकूनही ठेवू नका 'असे' व्हिडिओ, अन्यथा थेट घरून उचलून नेतील पोलीस
17
फक्त ३ सोप्या स्टेप्समध्ये घरीच तयार करता येईल वर्षभर टिकणारी चटपटीत आमचूर पावडर
18
इराणच्या समुद्रात युद्धाचा भडका! भारत सरकारकडून भारतीयांना इमर्जन्सी अलर्ट; "कुठेही जाण्यापूर्वी आम्हाला सांगा..."
19
युद्धविरामादरम्यान इस्रायलचा लेबनॉनवर हवाई हल्ला; हिजबुल्लाह प्रमुखाचा वैयक्तिक सचिव ठार!
20
Sanoj Mishra : "जिहादी जेलमध्ये जाणार, महादेव लवकरच माझा वनवास..."; मोनालिसावरुन सनोज मिश्रा आक्रमक
Daily Top 2Weekly Top 5

गावकारभाऱ्यांना नगर परिषदेत नाकारले

By admin | Updated: April 24, 2015 03:32 IST

राजगुरुनगर नगर परिषदेच्या निवडणुकीत कुठल्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही.

राजगुरुनगर : राजगुरुनगर नगर परिषदेच्या निवडणुकीत कुठल्याही पक्षाला बहुमत मिळाले नाही. १८ जागांपैकी ७ भाजपाला, २ शिवसेनेला आणि तब्बल ९ जागा अपक्षांना मिळाल्या आहेत. पाच-सहा अपक्ष राष्ट्रवादी काँग्रेसशी जवळीक असणारे आहेत. अपवाद वगळता सर्व चेहरे नवीन आहेत. विशेष म्हणजे मावळत्या ग्रामपंचायतीतील सदस्यांना मतदारांनी नाकारले. किशोर ओसवाल हे एकमेव सदस्य नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत.काही अपक्षांच्या मदतीने भाजपा नगर परिषदेच्या सत्तेवर येईल असा कयास सध्या राजकीय वर्तुळात लावला जात आहे.अतिशय उत्साहाच्या आणि चुरशीच्या झालेल्या निवडणुकीत काही धक्कादायक निकाल लागले आहेत. यामध्ये काही माजी ग्रामपंचायत सदस्य पराभूत झाले आहेत. प्रभाग क्रमांक १७ मधून किशोर ओसवाल हे एकमेव मावळत्या ग्रामपंचायतीतील सदस्य नगरसेवक म्हणून निवडून आले आहेत. माजी सरपंच कैलास सांडभोर, प्रदीप कासवा, माजी उपसरपंच रेवणनाथ थिगळे, बाळासाहेब कहाणे, माजी सदस्य वैभव घुमटकर, कांतिलाल गुगळे, माजी सदस्या ऊर्मिला सांडभोर, सखुबाई डोळस, उमा वाघ, मनीषा सांडभोर, सुनीता घुमटकर, लीलाबाई थिगळे, राक्षेवाडीच्या माजी सरपंच विद्या राक्षे असे पूर्वी ग्रामपंचायत पदाधिकारी व सदस्य राहिलेले दिग्गज पराभूत झाले.आज सकाळी ८ वाजता मतमोजणीच्या प्रक्रियेला सुरुवात झाली. प्रत्यक्षात साडेनऊ वाजता मतदान यंत्रे मतमोजणीसाठी टेबलवर घेतली. अवघ्या पाच मिनिटांत ९ प्रभागांचा निकाल समजला. त्यानंतर १५ मिनिटांत पुढच्या ९ प्रभागांची मतमोजणी झाली व सर्व निकाल बाहेर आले. सकाळी दहाच्या सुमारास निवडणूक निर्णय अधिकारी हिंमतराव खराडे यांनी सर्व निकाल जाहीर केले. निकालानंतर विजयी उमेदवारांच्या समर्थकांनी फटाके उडविले तसेच गुलाल आणि भंडारा उधळून आनंद साजरा केला. काहींनी विजयी मिरवणुका काढल्या. निकालानंतर कोणाची सत्ता येणार याच्या चर्चा सुरू झाल्या. भाजपा आणि काही अपक्ष; भाजपा आणि शिवसेना; अपक्ष आणि शिवसेना अशी गणिते मांडली जाऊ लागली. पाच वर्षांचा कार्यकाल वाटून घेऊन समीकरणे बसविली जाऊ शकतात, अशीही चर्चा होत आहे. (वार्ताहर)