शहरं
Join us  
Trending Stories
1
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
2
"ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
3
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
4
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
5
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
6
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
7
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
8
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
9
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
10
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
11
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
13
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
14
'अटके'वरून शाब्दिक युद्ध रंगलं; "...तर अटक करून दाखवाच"; राज ठाकरे यांचं मुख्यमंत्र्यांना थेट आव्हान!
15
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
16
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
17
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल
18
रस्ते गिळलेली अतिक्रमणे होणार नियमित; महसूल विभागाचा मोठा निर्णय
19
मिठी नदीच्या सफाई कामात झालेल्या कथित घोटाळ्याप्रकरणी ईडीचे आठ ठिकाणी छापे 
20
सहाव्या वर्षी वडिलांना एक चाल सांगितली अन्...; कोनेरू हम्पीची खास आठवण

विलास डोईफोडेला बाणेर चषक

By admin | Updated: May 1, 2017 03:06 IST

भैरवनाथाच्या नावानं चांगभलंच्या गजरात, गुलाल खोबऱ्याच्या उधळणीत आणि ढोल-ताशांच्या निनादात श्री भैरवनाथाची यात्रा परंपरागत

बाणेर : भैरवनाथाच्या नावानं चांगभलंच्या गजरात, गुलाल खोबऱ्याच्या उधळणीत आणि ढोल-ताशांच्या निनादात श्री भैरवनाथाची यात्रा परंपरागत पद्धतीने उत्साहात पार पडली. बाणेर येथील ग्रामस्थांचे श्रद्धास्थान असलेल्या या यात्रेला हजारो भाविकांची उपस्थिती होती. अशी माहिती देवस्थान ट्रस्टचे खजिनदार डॉ. दिलीप मुरकुटे व उपाध्यक्ष लक्ष्मण सायकर यांनी दिली. ‘श्रीं’च्या पालखी मिरवणुकीस भाविकांनी मोठी गर्दी केली होती. नवसाला पावणारे व जागृत देवस्थान म्हणून प्रसिद्ध असलेल्या भैरवनाथाच्या चरणी लीन होण्यासाठी शहर व परिसरातून असंख्य भाविक आले होते. यात्रेत वाहतूक, पाणीपुरवठा, आरोग्य, वीजसेवा, अग्निशामक आदी व्यवस्था ठेवण्यात आली होती.यानिमित्ताने बाणेर गावातील महापालिकेच्या सोपानराव कटके प्राथमिक शाळेच्या आवारात सायंकाळी ६ ते रात्री ९च्या दरम्यान कुस्त्यांचा जंगी आखाडा झाला. बाणेर चषक राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत खुल्या गटात चांदीची गदा व एक लाख रुपये इनामाची प्रथम क्रमांकाची कुस्ती विलास डोईफोडे याने ज्ञानेश्वर बोचडे याला चितपट करून जिंकली. तृतीय क्रमांकाच्या ५१ हजार रुपये इनामाच्या कुस्तीत गोकुळ आवारे याने गोपीनाथ घोडके याला पराभूत केले. ८४ किलो गटात अत्यंत प्रेक्षणीय लढतीत ७५ हजार रुपये इनामाची प्रथम क्रमांकाची कुस्ती अण्णा जगताप याने हनुमंत शिंदे याला चितपट करून जिंकली, तर तृतीय क्रमांकाच्या ३५ हजार रुपये इनामाच्या कुस्तीत सत्पाल सोनटक्के याने अक्षय कावरे याला पराभूत केले. डॉ. दिलीप मुरकुटे, लक्ष्मण सायकर, सागर ताम्हाणे, दत्तात्रय गायकवाड, अमोल बालवडकर, गुलाबराव तापकीर, बबनराव चाकणकर, संजय ताम्हाणे, गणेश कळमकर, प्रल्हाद सायकर, गणेश मुरकुटे, कृष्णा गांधिले, आशिष ताम्हाणे, अनिकेत मुरकुटे, राहुल पारखे, संदीप वाडकर, गहिनीनाथ कळमकर, जयसिंग मुरकुटे, बाळासाहेब सायकर, शंकर ननवरे, नितीन रनवरे, बन्सीलाल मुरकुटे, अंकुश धनकुडे, रामदास विधाते, विजय विधाते, भगवंत भुजबळ उपस्थित होते. (वार्ताहर)शिस्तबद्ध दर्शनासाठी ट्रस्टतर्फे नियोजनभाविकांना शिस्तबद्ध दर्शन घेता येण्यासाठी मंदिर  परिसरात सुयोग्य नियोजन देवस्थान ट्रस्टकडून करण्यात  आले होते. त्यामुळे भक्तांना कुठल्याही अडचणींना सामोरे जावे लागले नाही. या उपाय योजनेमुळे भाविकांनी समाधान व्यक्त केले.