शहरं
Join us  
Trending Stories
1
दोस्तीत कुस्ती! भारताला २५% टॅरिफचा धक्का देत डोनाल्ड ट्रम्प यांची पाकिस्तानशी हातमिळवणी; केली मोठी डील 
2
ट्रम्प यांचा भारतावर २५ टक्के टॅरिफ बॉम्ब; १ ऑगस्टपासून लागू होणार आयात शुल्क, दंडही आकारणार
3
आजचे राशीभविष्य ३० जुलै २०२५ : बुधवार कमाल करणार, बहुतांश राशींना...
4
भारत-पाक युद्ध तिसऱ्या देशाने थांबवले नाहीच; परराष्ट्रमंत्री एस. जयशंकर यांनी खोडला दावा
5
‘लाडकी बहीण’च्या लाभार्थी महिला कर्मचाऱ्यांवर कारवाई; राज्य सरकारने जारी केले आदेश
6
मालेगाव खटल्याचा निकाल आज; १७ वर्षांनी विशेष NIA कोर्ट निर्णय देणार, संपूर्ण देशाचे लक्ष
7
संघर्षाचा शेवट गोड! तिसऱ्या मजल्यावरून ३९ व्या मजल्यावर; बीडीडीवासीयांचा आनंद गगनात मावेना
8
सर्वांत महाग-शक्तिशाली निसार उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण; पृथ्वीची प्रत्येक इंच जमीन मॅप करणार
9
“मोदी यांच्या आचारसंहिता भंगप्रकरणी कोर्टात जाणार, निवडणूक आयोगाची कारवाईस टाळाटाळ”: चव्हाण
10
कृषी खात्यातील कथित भ्रष्टाचाराची चौकशी करा!; सुरेश धस यांचे मुख्यमंत्र्यांना पुन्हा पत्र
11
डिझेल दर सवलतीमुळे एसटीचे ११.८ कोटी वाचणार; स्पर्धात्मक निविदेमुळे महामंडळाला फायदा
12
देशातील विमानांमध्ये सुरक्षेच्या २६३ त्रुटी! सर्वाधिक एअर इंडिया, तिसऱ्या क्रमांकावर इंडिगो
13
मुंडेंचे नाव आले अन् माझा छळवाद सुरू झाला: अण्णा डांगे; भाजपात फेरप्रवेश, मन केले मोकळे
14
अनिलकुमार पवार हे दादा भुसे यांचे नातेवाईक, शिफारशीने नियुक्ती; संजय राऊत यांचा आरोप
15
अतिक्रमित जमिनींचा मिळणार मालकी हक्क, ३० लाख कुटुंबांना लाभ; चंद्रशेखर बावनकुळेंची माहिती
16
रशियात ८.८ तीव्रतेचा भूकंप; जपान, अमेरिकेत त्सुनामीसारख्या लाटांचे थैमान; जगात भीतीचे ‘हादरे’
17
एकनाथ शिंदे दिल्लीत, देवेंद्र फडणवीस राज्यपालांच्या भेटीला; महायुतीत काहीतरी मोठं घडतंय? 
18
Ladki Bahin Yojana: लाडक्या बहिणींना जुलै महिन्याचे १५०० रुपये कधी मिळणार? जाणून घ्या
19
'ईश्वराची कृपा आहे' असं म्हणणाऱ्या मोदींना…; राज्यसभेत संजय राऊत काय बोलून गेले?
20
"बळजबरी आणि दबावाने काहीही..."; डोनाल्ड ट्रम्प यांच्या टॅरिफ इशाऱ्याला चीनचे जशास तसे उत्तर

भारतीय राजकारणी समाज कॅन्सरपीडित : विक्रम गोखले; पुण्यात वीर जीवा महाले पुरस्कार वितरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 27, 2017 14:57 IST

भारतात गेल्या तीन दशकापासून राजकीय समाजामध्ये मतपेटीचे लांगुलचालन चालू आहे. पूर्ण राजकीय समाज याने त्रस्त झाला आहे, अशी टीका ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी भारतीय राजकारणावर वीर जीवा महाले पुरस्कार वितरण सोहळ्यात केली.

ठळक मुद्देहिंदू हा धर्म नाही तर संस्कृती, ती सर्वांना नेहमी एकत्र जगण्यास शिकवते : विक्रम गोखले तरुणांनी देशाची संरक्षण व्यवस्था अधिक सुरक्षित करण्याचा विचार करावा : एस. के. अंबिके

पुणे : भारतात गेल्या तीन दशकापासून राजकीय समाजामध्ये मतपेटीचे लांगुलचालन चालू आहे. हे भारतासाठी फारच त्रासदायक असून या राजकारणाला असे वाईट कृत्य करण्याचा कॅन्सर झाला आहे व पूर्ण राजकीय समाज याने त्रस्त झाला आहे, अशी टीका ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांनी भारतीय राजकारणावर केली. नातूबाग मैदान येथे शिवप्रताप दिनानिमित्त समस्त हिंदू आघाडीतर्फे आयोजित वीर जीवा महाले पुरस्कार वितरण सोहळ्यात ते बोलत होते. गोखले यांच्या हस्ते हा पुरस्कार कोल्हापूरचे बजरंग दल प्रमुख संभाजी साळुंखे यांना देण्यात आला. यावेळी माजी आमदार अशोक मोडक, डॉ. एस. के. अंबिके, तरुण शिवव्याख्यानकार सौरभ कर्डे, समस्त हिंदू आघाडी कार्याध्यक्ष मिलिंद एकबोटे आदी उपस्थित होते. तसेच हिंदू शौर्य पुरस्कार मालेगाव हिंदू आघाडी समाजसेवक मच्छिंद्र शिर्के यांना देण्यात आला. गोखले पुढे म्हणाले, की सत्ता टिकवून ठेवणे, आमची बाजू कोणती तुमची बाजू कोणती अशा गोष्टी राजकारणात सतत घडत आहेत. तरुणांनी देशाच्या राजकारणात सहभागी होण्याचा विचार केला नसेल तर त्यांनी राजकारणाचे भान ठेवावे आणि राजकारणाचा भाग म्हणून रहावे. तुम्ही घरात बसून, टाळ्या वाजवून, मोबाईल हातात घेऊन फिरत बसण्यापेक्षा देशाच्या भविष्याचा विचार करावा. सर्वांनी शरीराने, मनाने, विचाराने मजबूत व्हा. तुमच्या नजरेतून शत्रू पळाला पाहिजे. हिंदू हा धर्म नाही तर ही संस्कृती आहे. ती सर्वांना नेहमी एकत्र जगण्यास शिकवते. शिवाजी महाराज हे मुसलमानांच्या विरोधात नव्हते तर ते आपल्या देशाच्या, स्वराज्याच्या, मातीच्या जो विरुद्ध जाईल त्यांच्याशी लढले. जगातील एकमेव संस्कृती ही हिंदू आहे तिचा अभिमान ठेवा.मोडक म्हणाले, की शिवाजी महाराजांच्या कर्तृत्वाने हिमालय ते कन्याकुमारी असा संपूर्ण भारतभर आपला ठसा उमटवला आहे. तरीसुद्धा आपल्या राजधानीमध्ये अफजलगुरु सारख्यांची आरती होते, हा भारताला लागलेला काळिमा आहे.  अंबिके म्हणाले, की महाराष्ट्रातल्या तरुणांनी आर्मी, एअरफोर्समध्ये सामील व्हावे. आणि देशाची संरक्षण व्यवस्था अधिक सुरक्षित करण्याचा विचार करावा. कार्यक्रमात पोवाडा गीतांचे सादरीकरण करण्यात आले. सूत्रसंचालन नंदकिशोर एकबोटे यांनी केले.

टॅग्स :Vikram Gokhaleविक्रम गोखलेPuneपुणे