शहरं
Join us  
Trending Stories
1
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
2
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
3
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
4
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
5
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
6
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
7
महाकुंभातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने केले लग्न; पत्नी काय करते? जाणून घ्या...
8
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
9
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
10
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
11
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
12
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
13
टाटा Punch चा धमाका Nexon ला मागे टाकत बनली देशातील नंबर-१ SUV; बघा टॉप १० कारची यादी
14
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
15
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
16
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
17
IIT बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
18
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
19
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
20
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
Daily Top 2Weekly Top 5

Video : देहूत संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्यात फुगडी खेळताना संभाजीराजांचा गेला तोल अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2021 20:25 IST

आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखीचे आज तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे उद्या प्रस्थान होणार आहे

पिंपरी: खासदार संभाजीराजे सध्या मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आग्रही आणि आक्रमक भूमिकेत पाहायला मिळत आहे. याच पार्श्वभूमीवर भेटीगाठी, आंदोलनं, बैठका यामुळे त्यांचा दैनंदिन कार्यक्रम देखील व्यस्त आहे. मात्र, आज (दि.१) देहूत छत्रपती संभाजीराजे यांनी संत तुकाराम महाराज पालखी प्रस्थान सोहळ्याला उपस्थिती लावली. यावेळी त्यांनी वारकऱ्यांसोबत फुगडी खेळण्याचा आनंद देखील लुटला. परंतू,याचवेळी त्यांच्यासोबत गमतीदार प्रसंग घडला आणि उपस्थित वारकऱ्यांसह त्यांना देखील हसू आवरता आले नाही. 

आषाढी वारीसाठी संत तुकाराम महाराज पालखीचे आज तर संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचे उद्या प्रस्थान होणार आहे.सकाळपासूनच देहूत ज्ञानोबा माऊली तुकाराम, राम कृष्ण जयहरी चा नामघोष आणि टाळ, मृदंगाच्या गजराने भक्तिमय वातावरण निर्माण झाले होते.

याचवेळी खासदार संभाजीराजे भोसले यांनी गुरुवारी देहूत संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्यात हजेरी लावली. यावेळी त्यांनी वारकऱ्यांसोबत फुगडी खेळण्याचा आनंद लुटला.मात्र, फुगडी खेळता खेळता संभाजीराजेंचा तोल गेला आणि त्याच क्षणी उपस्थित वारकऱ्यांनी त्यांना सावरलं. हा प्रसंग अनुभवणाऱ्या वारकऱ्यांना आणि खुद्द संभाजीराजे यांना देखील हसू आवरता आले नाही. 

संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यास संभाजीमहाराज उपस्थित होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.

संत तुकाराम महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांचा अनुबंध उलगडताना संभाजी महाराज म्हणाले, ‘‘संत तुकाराम महाराज यांच्या पालखी प्रस्थान सोहळ्यास आम्हाला बोलावले याबद्दल मी आभार व्यक्त करतो. संत तुकाराम महाराजांनी भक्ती दिली. या भक्तीच्या माध्यमातून छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभे केले. शिवाजी महाराजांनी तुकाराम महाराजांना गुरुस्थानी मानले होते.

अन् तुकाराम महाराजांनी जाती धर्माच्या पलीकडे जाऊन आपला समाज उभा राहिला पाहिजे. म्हणून छत्रपती शिवाजी महाराज असतील, राजाराम महाराज असतील, ताराराणी, शाहू महाराज यांनीही हीच भूमिका ठेवली होती. छत्रपती शिवाजी महाराजांच्या घराण्याला पालखी सोहळ्यात पूजेचा मान मिळाला. आम्ही तुकोबांना अभिवादन करण्यासाठी येथे आलो आहे, अशी आमची भावना आहे.’’

टॅग्स :dehuदेहूSambhaji Raje Chhatrapatiसंभाजी राजे छत्रपतीSant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळा