शहरं
Join us  
Trending Stories
1
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
2
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
3
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
4
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
5
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
6
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
7
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
8
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
9
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
10
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
11
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
12
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
13
"जे काम भारताने करायला हवे होते, ते दहशतवाद पसरवणाऱ्या देशाने केले..."; मोदी सरकारवर ओवेसींचा निशाणा
14
अमेरिकेवर विश्वास नाही, रशिया-चीनने सुरक्षेची हमी द्यावी; इराणची मोठी मागणी...
15
अमेरिका-इराण युद्धात सहभागी न होताच एका मुस्लीम देशाचा झाला तगडा फायदा; कमावणार पैसाच पैसा
16
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
17
"डोनाल्ड ट्रम्प असे व्यक्ती नाहीत ज्यांच्याशी...!"; शस्त्रसंधीनंतर काही तासांतच अमेरिकेचा इराणला इशारा, तणाव कायम
18
"अशोक खरातसोबत असलेली कोणती महिला बेशुद्ध वाटते?", शर्मिला ठाकरे संतापल्या, महिलांना सुनावले
19
Jasprit Bumrah Unwanted Records : बुमराहच्या नावे लाजिरवाणी 'हॅटट्रिक'! ८ वर्षांनी आली 'ही' वेळ
20
अमेरिका, इस्रायलचे हल्ले सुरु झाले, इराणमध्ये ३००० भारतीय विद्यार्थी होते...; भारतातील राजदुतांनी पै-पाहुण्यांना, ओळखीच्यांना फोन करायला सुरुवात केली...
Daily Top 2Weekly Top 5

एचआयव्ही बाधित कामगार महिलेला कामगार न्यायालयात दिलासा 

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2018 11:42 IST

एचआयव्ही बाधित असल्याने तीन वर्षांपूर्वी एका ३२ वर्षीय महिलेला कंपनीने कामावरुन काढून टाकले होते.

ठळक मुद्देटेस्ट पॉझिटीव आल्याने कामावरुन काढून टाकण्यात आले होते,  संबंधित महिलेला पुन्हा कामावर रूजू करून घेण्याचे आदेश याप्रकरणी महिलेने कंपनीच्या विरोधात कामगार न्यायालयात दाद

पुणे : एचआयव्ही बाधित असल्याने शहरातील एका औषध निर्मिती कंपनीतून कामावरून काढलेल्या महिलेला कामगार न्यायालयात दिलासा मिळाला आहे. संबंधित महिलेला त्वरित कामावर रुजू करून घेत कामावरुन कमी केल्या दिवसापासूनचा पगार तसेच अन्य भत्ते महिलेला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.  तीन वर्षांपूर्वी एका ३२ वर्षीय महिलेला कंपनीने कामावरुन काढून टाकले होते. त्यामुळे या प्रकरणी महिलेने कंपनीच्या विरोधात कामगार न्यायालयात दाद मागितली. तिचे वकील अ‍ॅड. विशाल जाधव यांच्या मार्फत दावा दाखल केला होता. त्यांनी दिलेल्या लढयाला यश आले असून तक्रारदार एचआयव्ही बाधित महिलेला पुन्हा कामावर रुजू करून घेण्याचे आदेश कामगार न्यायालयाने दिले आहेत. तक्रारदार महिला एका औषधनिर्मिती कंपनीत आॅपरेटर आहे. कंपनीने महिलेकडे वैद्यकीय चाचणी करुन याबाबत अहवाल सादर करण्यास सांगितले होते. वैद्याकीय तपासणीत ती एचआयव्ही बाधित असल्याचे उघड झाले होते. दरम्यान, याबाबतचा अहवाल कंपनीकडे सादर केला. तेव्हा कंपनीने महिला एचआयव्ही बाधित असल्याचे कारण देऊन तिला तडकाफडकी कामावरुन कमी केले होते. दरम्यान, महिलेने स्वेच्छेने राजीनामा दिल्याचा दावा कंपनीकडून करण्यात आला होता. तक्रारदार महिला २०१०मध्ये कंपनीत रूजू झाल्या होत्या. उपचारासाठी केलेला खर्च मिळण्यासाठी ४ आॅगस्ट २०१५ रोजी कंपनीकडे वैद्याकीय तपासणी अहवाल सादर केला होता. वैद्याकीय तपासणी अहवालात संबंधित महिला एचआयव्ही बाधित असल्याचे उघडकीस आले होते. त्या दिवशी तिला कंपनीतील वरिष्ठ अधिकाºयांनी राजीनामा देण्याची सूचना केली होती, असे अ‍ॅड. जाधव यांनी सांगितले. कामगार न्यायालयाने कंपनी तसेच तक्रारदार महिलेचे वकील अ‍ॅड. जाधव यांची बाजू ऐकून घेतली. त्यानंतर एचआयव्ही बाधित महिलेच्या बाजूने निकाल दिला. कामावरुन कमी केल्या दिवसापासूनचा पगार तसेच अन्य भत्ते महिलेला देण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत.

टॅग्स :PuneपुणेHIV-AIDSएड्सWomenमहिलाCourtन्यायालय