शहरं
Join us  
Trending Stories
1
छत्रपती शिवरायांबाबत धीरेंद्र शास्त्रींच्या विधानामुळे वाद; काँग्रेसकडून अटकेची मागणी, काय घडलं?
2
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
3
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
4
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
5
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
8
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
9
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
10
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
11
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
12
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
13
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
14
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
15
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
16
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
17
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
18
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
19
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
20
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
Daily Top 2Weekly Top 5

बिबट्याने घेतला बालिकेचा बळी, दुर्देवी चिमुकली ४ महिन्यांची

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2019 02:27 IST

येडगाव (ता. जुन्नर) येथील खानेवाडी परिसरात असलेल्या धनगराच्या वाड्यावर बिबट्याने हल्ला करून कल्याणी सुखदेव झिटे या ४ महिन्यांच्या बालिकेला बळी घेतला.

नारायणगाव : येडगाव (ता. जुन्नर) येथील खानेवाडी परिसरात असलेल्या धनगराच्या वाड्यावर बिबट्याने हल्ला करून कल्याणी सुखदेव झिटे या ४ महिन्यांच्या बालिकेला बळी घेतला.वनविभाग अधिकारी, ग्रामस्थ आणि झिटे कुटुंबीयांनी केलेल्या शोधमोहिमेमध्ये ५०० मीटरवर मुलीचा मृतदेह आढळून आला, घटना आज (दि. २३) पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास घडली. या घटनेमुळे जुन्नर तालुक्यात हळहळ व्यक्त केली जात असून वनविभागाने नरभक्षक बिबट्याला त्वरित जेरबंद करावे, अशी मागणी केली आहे, दरम्यान, वनविभागाच्यावतीने झिटे कुटुंबीयांना तातडीची मदत म्हणून ३ लाख रुपयांचा धनादेश देण्यात आला असून पुढील महिन्यात १२ लाख रुपये वनविभागाच्यावतीने देण्यात येणार आहे, अशी माहिती जुन्नर विभागाचे उपवनसंरक्षक जयरामे गौडा आर व ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी बी. सी. येळे यांनी दिली.कल्याणी सुखदेव झिटे (वय ४ महिने, रा. मूळ जांबुत बुद्रुक, ता. संगमनेर, जिल्हा अहमदनगर, सध्या रा. येडगाव, ता. जुन्नर) ही मुलगी बिबट्याच्या हल्ल्यात मृत्युमुखी पडली आहे.या घटनेबाबत उपवनसंरक्षक जयरामे गौडा यांनी दिलेल्या माहितीनुसार : येडगाव (खानेवाडी, ता. जुन्नर) येथे रामदास भिकाजी भोर यांच्या मोकळ््या शेतजमिनीमध्ये सुखदेव झिटे या मेंढपाळाचा मेंढ्यांचा कळप बसविलेला होता. पहाटेच्या सुमारास मेंढपाळ सुखदेव झिटे मेंढ्यांसह आपली पत्नी व दोन लहान मुलींसह उघड्यावर झोपले होते. पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास बिबट्या मेंढ्यांवर हल्ला करण्याच्या उद्देशाने आला असता बिबट्याने या ठिकाणी उघड्यावर झोपलेल्या चार महिन्यांच्या बालिकेवर हल्ला करून तिला उचलून नेले. परंतु अंधारात असल्याने तिचा शोध घेता आला नाही, पहाटे ५ च्या सुमारास वनविभागाचे पथक घटनास्थळी आले, ओतूरचे वनपरिक्षेत्र अधिकारी बी. सी. येळे व त्यांचे कर्मचारी, झिटे, ग्रामस्थ यांनी बिबट्या ज्या दिशेला गेला त्याच्या आधारे शोध घेत असता अर्ध्या किमी अंतरावर या बालिकेचा मृतदेह सकाळी ६.१५ वाजता मिळून आला. बालिकेच्या शरीराचा काही भाग खाल्लेला दिसून आला.

>घटनास्थळी उपवनसंरक्षक जयरामे गौडा आर, सहायक उपवनसंरक्षक श्रीमंत गायकवाड, युवराम मोहिते, वनपरिक्षेत्र अधिकारी अजित शिंदे, बिबट निवारण केंद्राचे डॉ. अजित देशमुख, ओतूर वनपरिक्षेत्र अधिकारी बी. सी. येळे, नारायणगाव पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अर्जुन घोडे-पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी करून झिटे कुटुंबीयांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले. यावेळी आमदार शरद सोनवणे, राष्ट्रवादीचे युवानेते अमित बेनके यांनी भेट दिली. येडगावचे सरपंच गणेश गावडे, देविदास भोर, पोलीसपाटील गणेश बांगर, सुखदेव नेहरकर, दीपक भिसे, समीर गावडे आदी स्थानिक ग्रामस्थ यांच्याशी उपाययोजनांसंदर्भात चर्चा केली. येडगाव व परिसर हा बिबट वावर असलेले क्षेत्र आहे. या परिसरात ऊस, चिकू, मका, गहू अशी बागायती व दीर्घकालीन पिके घेतली जातात. यामुळे या परिसरात बिबट्यांच्या अधिवासास अनुकूल वातावरण निर्माण झालेले आहे. यामुळे बिबट या ठिकाणी स्थिरावलेले आहेत. या परिसरात पिंजरे लावण्याचे आश्वासन ग्रामस्थांना वनविभागाने दिले. बिबटप्रवण क्षेत्रात रात्रीच्या वेळी गस्त चालू ठेवण्याचे निर्देश दिले व लावलेल्यापिंजऱ्याच्या ठिकाणी वनमजूर व वनरक्षकयांना रात्रीच्या वेळी थांबण्याबाबतवनपरिक्षेत्र अधिकारी यांना सूचना दिल्या. बालिकेच्या मृत शरीराचा सापडलेला भाग शवविच्छेदनासाठी ग्रामीण रुग्णालय, जुन्नर येथे पाठवून तेथे विच्छेदन करून मृतदेह झिटे कुटुंबाच्या ताब्यात देण्यात आला.