शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

..तर ‘त्या’ पीडित व्यक्तीला उच्च न्यायालयात दाद मागता येणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2020 19:48 IST

याचिका दाखल करण्याचे सर्वाधिकार पीडित व्यक्तीस

ठळक मुद्दे2003 साली रामदास मोरे यांच्यासह काहींना बेदम मारहाण प्रकरणमुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाचा निकाल

पुणे : आरोपीला शिक्षा झाल्यास त्याने त्याविरोधात सत्र न्यायालयात याचिका दाखल केल्यास सत्र न्यायालयाने संबंधित आरोपीस निर्दोष सोडल्यास अशावेळी पीडीत व्यक्तीला उच्च न्यायालयात दाद मागता येणार आहे. (अपील करण्याचे अधिकार आहेत) असा निकाल मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने दिला आहे.   2003 साली रामदास मोरे यांच्यासह काहींना बेदम मारहाण केल्याप्रकरणी येथील प्रथम न्यायदंडाधिकारी न्यायालयाने आरोपींना दोषी ठरवत दोन वर्षांची शिक्षा सुनावली होती. या शिक्षेविरुद्ध आरोपींनी पुणे सत्र न्यायालयात अपील दाखल केले होते. सत्र न्यायालयाने आरोपींची निर्दोष मुक्तता केली होती. त्यामुळे सत्र न्यायालयाच्या निकालाविरुद्ध मोरे यांनी अ‍ॅड. अनिकेत निकम यांच्यामार्फत मुंबई उच्च न्यायालयात अपील दाखल केले. पीडित व्यक्तीला अपील न्यायालयाच्या निकालाच्या विरुद्ध पुन्हा अपील करता येणार नाही, असा युक्तिवाद आरोपींच्या वकिलांनी केला. त्याचा युक्तिवाद खोडून काढत अ‍ॅड. निकम यांनी केलेल्या युक्तिवादानुसार, सुधारित कायद्याअंतर्गत पीडिताला अनेक अधिकार मिळाले आहेत. लॉ कमिशन रिपोर्ट ऑफ इंडिया 2009 यात पीडित व शोषितांचे अधिकार व हक्कासंदर्भात सखोल टिप्पणी आहे. बचाव पक्षाचा युक्तिवाद मान्य केला तर पीडित व्यक्तीस बहाल केलेले अधिकार निरर्थक होतील. आरोपीला निर्दोष मुक्त करण्याच्या निकालाविरुद्ध अपील करण्याचे जितके अधिकार शासनाला आहेत त्यापेक्षाही जास्त अधिकार पीडित व्यक्तीला आहेत. अ‍ॅड. निकम यांनी या संदर्भात सर्वोच्च न्यायालय आणि उच्च न्यायालयाचे विविध न्याय निवाडे सादर केले. मुंबई उच्च न्यायालयाच्या खंडपीठाने अ‍ॅड. निकम यांचे युक्तिवाद ग्राह्य धरताना पीडित व्यक्तीस आरोपींना निर्दोष मुक्त करण्याच्या अपीलेंट न्यायालयाच्या निकालाविरुद्ध मुंबई उच्च न्यायालयात अपील करण्याचे अधिकार आहेत, असा निकाल दिला.  

टॅग्स :PuneपुणेCourtन्यायालयPoliceपोलिस