शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणच्या बंदरावर भीषण स्फोट की घातपात? १४ जणांचा मृत्यू तर ७५० लोक जखमी 
2
ईडीचे कार्यालय असलेल्या कैसर-ए-हिंद इमारतीला भीषण आग; पहाटे २.३० वाजल्यापासून अद्याप धुमसतेय...
3
पहिलाच प्रकार! बँक अकाऊंट सांभाळता सांभाळता डीमॅट अकाऊंट खाली झाले; रातोरात ५ लाखांचे शेअर वळते केले
4
पाकची कोंडी करण्यासाठी हालचाली; अमेरिकेसह विविध देशांचा पाठिंबा मिळविण्यासाठी संपर्क साधणे सुरू
5
पाकिस्तानी दहशतवाद्यांना आता धास्ती 'अननोन गनमॅन'ची; दोन वर्षांत २० ते २५ अतिरेक्यांचा केला खात्मा
6
आजचे राशीभविष्य, २७ एप्रिल २०२५: नव्या कार्याचा आरंभ न करणे हितावह राहील
7
बिलावल बरळले; पाणी रोखले तर भारतीयांच्या रक्ताचे पाट वाहतील
8
काश्मीरमध्ये मोठे कोंबिंग ऑपरेशन, दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या ४४६ पेक्षा जास्त लोकांना घेतले ताब्यात
9
दहशतीच्या भयाण रात्री खुर्शीदभाईंनी आम्हा पाच कुटुंबांना दिला घरात आश्रय; आमच्यासाठी धावून आलेले देवदूतच
10
बेकायदा पार्किंगबाबत जनजागृती करा; उच्च न्यायालयाची ज्येष्ठ नागरिकांना सूचना
11
पर्यटकांना होऊ शकतो घाबरण्याचा आजार; मानसिक आरोग्यावर घातक परिणाम होऊ शकतात
12
पाकचे तीन तुकडे होणे गरजेचे, तर युद्ध क्षमता कमी होईल..!
13
पाकिस्तानला पाण्यासाठी भीक मागायला लावायची असेल तर...
14
पाण्यानंतर आता मेडिसीनसाठीही तरसणार पाकिस्तान? आपत्कालीन परिस्थिती टाळण्यासाठी तयारीला लागलं फार्मा सेक्टर
15
'झेलम'ला अचाकच पूर आला, पाकिस्तानात एकच गोंधळ उडाला; पाक मीडियानं भारतावर मोठा आरोप केला! नेमकं काय घडलं?
16
पर्यटकाच्या व्हिडिओमध्ये कैद झाले दहशतवादी...? देहूरोड येथील सामाजिक कार्यकर्त्याचा दावा
17
चोपड्यात थरार...! प्रेमविवाह केलेल्या मुलीला बापानेच गोळी झाडून संपवलं, जावई जखमी  
18
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
19
अंबाला गावात लग्नाच्या जेवणातून विषबाधा; आठ वर्षीय बालकाचा मृत्यू, अनेकांची प्रकृती चिंताजनक
20
पाकिस्ताननं बांगलादेशात तैनात केले फायटर जेट? PAK पत्रकाराचा मोठा दावा; म्हणाला, यावेळी...

ज्येष्ठ गायक नारायणराव बोडस यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 05:40 IST

ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक आणि संगीत रंगभूमीवरील अभिनेते पं. नारायणराव बोडस यांचे सोमवारी सकाळी पावणेआठ वाजता दीर्र्घ आजाराने येथे निधन झाले.

पुणे : ग्वाल्हेर घराण्याचे ज्येष्ठ गायक आणि संगीत रंगभूमीवरील अभिनेते पं. नारायणराव बोडस यांचे सोमवारी सकाळी पावणेआठ वाजता दीर्र्घ आजाराने येथे निधन झाले. ते ८४ वर्षांचे होते. त्यांच्या मागे पत्नी सविता आणि पुत्र केदार बोडस असा परिवार आहे.विष्णू दिगंबर पलुसकर यांच्या गायकीशी नाते सांगणाºया बोडस घराण्यात नारायणरावांचा जन्म झाला. त्यांचे संगीताचे शिक्षण वडील लक्ष्मणराव तसेच प्रल्हादपंत गानू यांच्याकडे झाले. नोकरीआणि शास्त्रीय गायनाचा रियाज अशी कसरत करत त्यांनी संगीतसाधना केली. गायक आणिनट म्हणून त्यांच्या कारकिर्दीची सुरुवात ‘सौभाग्यरमा’ या डॉ. बी. एन. पुरंदरे लिखित नाटकापासून झाली. दाजी भाटवडेकर यांनाया नाटकातील नारायणरावांचे व्यक्तिमत्त्व आवडले. संस्कृत भाषेत नाटके करणाºया दाजींना आपल्या संस्कृत नाटकासाठी बोलक्या चेहºयाचा, भारदस्त आवाजाचाआणि चांगला गायक असणारा नट हवा होता. त्यांनी लगेच ‘संगीत शारदम’ या नाटकासाठी त्यांची निवड केली. त्यानंतर दाजी भाटवडेकरांच्याअनेक नाटकात त्यांनी भूमिका केल्या.संगीत सौभद्रम, पती गेले ग काठेवाडी, बुद्ध तिथे हरला, सं. मृच्छकटिक, सं. महाश्वेता, सं. मानापमान, सं. स्वयंवर, सं. सौभद्र, सं. संशयकल्लोळ, सं. धाडिला राम तिने का वनी?, सुंदर मी होणार, मंदारमाला, सुवर्णतुला, बावनखणी, संत गोरा कुंभार, लहानपण देगा देवा, देव दीनाघरी धावला, तो एक राजहंस, सं. कृष्णार्जुनयुद्ध, अशा अनेक संगीत व बिगर संगीत नाटकांत अविस्मरणीय भूमिका केल्या. त्यांनी काही चित्रपट व टीव्ही मालिकांतूनही काम केले, पण त्यांना संगीत रंगभूमीच अधिक भावली.नारायणरावांनी वयाची साठी पूर्ण झाल्यावर रंगभूमीची कायमची रजा घेण्याचा निर्णय घेतला आणि १९९३ मध्ये गोव्यात संगीत सौभद्र्रमध्ये अखेरची भूमिका करून रंगभूमीचा निरोप घेतला. त्यानंतर त्यांनी संगीत अध्यापनाचे काम सुरू केले. त्यांनी १२ वर्षे मुंबई विद्यापीठात पदवी व पदव्युत्तर विद्यार्थ्यांना संगीताचे धडे दिले. तेथून निवृत्त झाल्यावर २००६ पासून त्यांनी वाशी येथील गांधर्व महाविद्यालयात संगीत शिकणाºया विद्यार्थ्यांना विनामूल्य मार्गदर्शन केले. त्यांच्या या प्रदीर्घ संगीतसेवेचा शासनाने बालगंधर्व पुरस्कार देऊन गौरव केला होता. 

टॅग्स :Puneपुणे