शहरं
Join us  
Trending Stories
1
रोहित शर्माने कप्तानी सोडली की त्याला हटवलं? निवड समिती अध्यक्ष अजित आगरकरांनी स्पष्टच सांगितलं, म्हणाले...
2
“राहुल गांधी यांचा पासपोर्ट जप्त करावा अन् कायदेशीर कारवाई करावी”; भाजपा नेत्यांची मागणी
3
फर्रुखाबादमधील कोचिंग सेंटरमध्ये भीषण स्फोट; एकाचा मृत्यू, सहा जण जखमी
4
“सोनम वांगचूक यांना सोडून द्यावे, नवीन पिढीसाठी मोठे योगदान”: शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद
5
४८ तासांत मंजूर झाले कोट्यवधींचे कर्ज ! भंडारा, नागपूर जिल्ह्यात शेतकऱ्यांच्या नावे कर्ज घोटाळा; ईडीकडून कारवाईचा धडाका
6
“अनिल परब अर्धवट वकील”; रामदास कदमांचा पलटवार, पत्नीने जाळून घेतले की? यावरही दिले उत्तर
7
Sandhya Shantaram Death: नृत्याच्या 'बिजली'च्या पैंजणांचा आवाज थांबला..! ज्येष्ठ अभिनेत्री संध्या शांताराम यांचं निधन
8
Video - "मी तुला गोळी मारेन, कोणी वाचवणार नाही"; भाजपा नेत्याची गुंडगिरी, डान्सरवर उधळले पैसे
9
प्रवाशांची दिवाळी! मुंबई-गोवा ‘वंदे भारत’च्या फेऱ्या वाढणार; कोकणवासीयांना फायदा, नवे टाइमटेबल
10
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला कोणत्या उपासनेने होते शीघ्र लक्ष्मीकृपा? वाचा 'हे' प्रभावी स्तोत्र
11
Pakistan: खेळणं समजून शाळेत नेला बॉम्ब, वर्गात जाताच मोठा स्फोट; अनेक विद्यार्थी जखमी
12
Kojagiri Purnima 2025: शास्त्रानुसार कोजागरीच्या रात्री जागरण आणि पूजा केल्याने होते लक्ष्मीकृपा; वाचा व्रतविधी!
13
Kojagiri Purnima 2025: कोजागरीला लक्ष्मी योगात 'या' राशींवर बरसणार सुख-संपत्तीचे चांदणे!
14
"त्यांचा आशीर्वादच मिळाल्याची भावना होती...", संध्या शांताराम यांच्या निधनानंतर प्रिया बेर्डेंनी दिला आठवणींना उजाळा
15
“आम्ही युती-आघाडीचे बळी ठरलो, आता स्थानिकांच्या भावना लक्षात घेणार”; उद्धव ठाकरे थेट बोलले
16
"गौतमी पाटील तू महाराष्ट्राचा बिहार केलास, तुझी कार..."; मराठी अभिनेत्याने व्यक्त केला संताप
17
वनडेतही नवे पर्व! रोहित शर्माचं मोठं स्वप्न भंगलं; गिलच्या कॅप्टन्सीत किंग कोहलीसमोरही असेल चॅलेंज
18
"अरे बिट्टू, मी तुझ्यासाठी काय केलं नाही, तरीही तू..."  मुलीचा ब्रेकअपनंतरचा व्हिडीओ व्हायरल!
19
'जननायक' पदवीची चोरी होतेय , बिहारी वाले सावधान! पंतप्रधान मोदींनी राहुल गांधी आणि 'राजद'वर निशाणा साधला
20
Uddhav Thackeray : बाळासाहेबांच्या पार्थिवावरुन रामदास कदम यांनी केलेल्या आरोपावर उद्धव ठाकरेंची पहिली प्रतिक्रिया

ज्येष्ठ उद्योगपती प्रल्हाद छाब्रिया यांचे निधन

By admin | Updated: May 6, 2016 06:01 IST

ज्येष्ठ उद्योजक आणि फिनोलेक्स उद्योग समूहाचे संस्थापक प्रल्हाद छाब्रिया (वय ८६) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पुत्र प्रकाश, कन्या अरुणा कटारा, सून, नातवंडे

पुणे : ज्येष्ठ उद्योजक आणि फिनोलेक्स उद्योग समूहाचे संस्थापक प्रल्हाद छाब्रिया (वय ८६) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्यामागे पुत्र प्रकाश, कन्या अरुणा कटारा, सून, नातवंडे असा परिवार आहे.प्रल्हाद छाब्रिया यांचा जन्म कराचीमध्ये (आताच्या पाकिस्तानातील) झाला होता. भारत-पाकिस्तान फाळणीदरम्यान ते भारतात आले. १९५४ मध्ये अल्पशा भांडवलावर त्यांनी फिनोलेक्स उद्योग समूहाची मुहूर्तमेढ रोवली. आज या उद्योग समूहाची उलाढाल दहा हजार कोटींच्या वर आहे.छाब्रिया यांनी भारतात प्रथमच जेली भरलेल्या दूरसंचार केबल्स आणि ठिबक सिंंचनासाठीच्या केबल्स सादर केल्या. त्यांच्या या अनोख्या उत्पादनांना जगभर मान्यता मिळाली. फिनोलेक्स-प्लासन लि. ही कंपनी म्हणजे भारत आणि इस्रायलदरम्यान करार झालेली पहिली कंपनी ठरली. छाब्रिया यांनी पुण्यातील सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातही हिरिरीने भाग घेतला. मुकुल-माधव फाउंडेशन आणि होप फाउंडेशनच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्य केले. वैद्यकीय, सामाजिक आणि वंचित घटकांच्या कल्याणासाठी त्यांनी अनेक उपक्रम व योजना राबविल्या आहेत. त्यांनी रत्नागिरी येथे मुकुल-माधव विद्यालय, तसेच अभियांत्रिकी शिक्षणासाठी फिनोलेक्स अ‍ॅकॅडमी आॅफ मॅनेजमेंट अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजीची स्थापनाही केली. पुण्याजवळील हिंंजवडी येथे त्यांनी इंटरनॅशनल इन्स्टिट्युट आॅफ इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीही सुरू केली होती.छाब्रिया यांच्या निधनाचे वृत्त समजताच उद्योगपती राहुल बजाज, संजीव बजाज, अभय फिरोदिया, अरुण फिरोदिया, नौशाद फोर्बज, अजय शिर्के, अदर पूनावाला, अनंत सरदेशमुख, उत्कर्ष मुनोत, पीयूष मुनोत, अमित भोसले, विश्वजित कदम, चेतन वाकलकर आदींनी त्यांच्या निवासस्थानी जाऊन अंत्यदर्शन घेतले़छाब्रिया यांच्या पार्थिवावर कैलास स्मशानभूमीत रात्री अंत्यसंस्कार करण्यात आले़ या वेळी त्यांचे पुत्र प्रकाश छाब्रिया, बंधू किसन छाब्रिया, कन्या अरुणा कटारा, सून रितू छाब्रिया, नात गायत्री, हंसिका छाब्रिया, दीपक छाब्रिया, विजय छाब्रिया, फिनोलेक्स पाइपचे सौरभ धानोरकर, एस़ के़ जैन, सहआयुक्तसुनील रामानंद, निवृत्त पोलीस अधिकारी अशोक धिवरे यांच्यासह उद्योग, व्यापार, सामाजिक, राजकीय आदी क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते़आधुनिक महाराष्ट्राच्या कृषी विकासात प्रल्हादजी छाब्रिया यांचे मोठे योगदान आहे. लोकमत परिवाराशी त्यांचे गहिरे ऋणानुबंध होते. माझे वडील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक जवाहरलालजी दर्डा उद्योगमंत्री असताना ते आणखी घट्ट झाले. अत्यंत दूरदृष्टीचा आणि समाजाभिमुख उद्योगपती म्हणून त्यांची ओळख होती. केवळ महाराष्ट्रानेच नव्हे, तर देशाने कल्पक उद्योगपती गमावला आहे. त्यांच्या निधनाने कधीही भरून न येणारे नुकसान झाले आहे. प्रल्हादजींचे सुपुत्र आणि माझे मित्र प्रकाश यांच्या दु:खात दर्डा परिवार आणि ‘लोकमत’ पूर्णपणे सहभागी आहे. त्यांना या धक्क्यातून सावरण्याची शक्ती मिळो, हीच ईश्वरचरणी प्रार्थना. - खासदार विजय दर्डा, चेअरमन, लोकमत मीडिया प्रा. लि.