शहरं
Join us  
Trending Stories
1
१० जूनला लग्न झालं अन् २ दिवसांत नवऱ्याचा मृत्यू; विमान अपघातात 'ती' ने सर्वस्व गमावले
2
इस्त्रायलचे पुढचे टार्गेट पाकिस्तान! इराण तणावादरम्यान शेजारील देश भीतीच्या छायेत
3
"जे स्वतःला सिंहाप्रमाणे...!" इराणवर हल्ला करण्यापूर्वी नेतन्याहू यांनी 'या' पवित्र भिंतीवर सोडली खास 'नोट'? काय आहे याचा अर्थ?
4
Maharashtra Weather Forecast: मुंबईसह कोकण-पश्चिम महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणार; 'या' जिल्ह्यांना रेड अलर्ट
5
PM मोदी झाले भावूक, म्हणाले, 'माझं मन हे मान्य करायला तयारच नाहीये की, विजयभाई आपल्यात नाहीत'
6
Viral Video : नवऱ्याची दुसरी बायको बघून संतापली पत्नी, सरळ चप्पल काढली अन्..; रस्त्यावरच मोठा राडा!
7
मुंबई भाजपा पदाधिकाऱ्यांमध्ये राडा; आशिष शेलार कारमधून उतरताच दोन गटांत हाणामारी
8
सहानुभुतीसाठी पाकिस्तानची नुसती रडारड...! इराण-इस्रायल युद्धात पाकच्या पंतप्रधानांची उडी, म्हणाले...
9
'जीवन खूप मौल्यवान आहे...' अहमदाबाद विमान अपघातानंतर केविन पीटरसनने भावनिक पोस्ट!
10
विमान कंपन्यांना झटका बसणार! सरकार 'बोईंग ड्रीमलायनर 787' बाबत मोठा निर्णय घेणार
11
इराण-इस्रायलचा बाजाराला 'धक्का'! अदानी-SBI सह 'हे' शेअर सर्वाधिक घसरले, तुमच्या पोर्टफोलिओचे काय?
12
हा फोटो नीट बघा! एअर इंडियाच्या दिल्ली-हाँगकाँग विमानाचा दरवाजा थरथरू लागला, अन्...;
13
ना सासरी गेली ना माहेरी... राजा रघुवंशीला संपवल्यानंतर १४ दिवस सोनम कुठे होती?
14
स्वतःची सॉफ्टवेअर कंपनी, आता बनला फूड डिलिव्हरी बॉय! IT इंजिनिअरच्या आयुष्याला धक्कादायक वळण!
15
वडिलांनी रिक्षा चालवून शिकवले, पहिल्यांदाच मुलगी विमानात बसली अन् हाच प्रवास अखेरचा ठरला
16
एअर इंडियाला लोकांनी ठरवलं २४१ लोकांच्या मृत्यूसाठी जबाबदार, सपोर्टमध्ये वीर दास म्हणाला - "कमतरता आहे, पण..."
17
एकदा, दोनदा नव्हे तर ७ वेळा दिला मृत्यूला चकवा; 'हा' आहे जगातील सर्वात लकी माणूस
18
संजय कपूर यांनी करिश्माला म्हटलं होतं 'गोल्ड डिगर', घटस्फोटानंतर पोटगीमध्ये मिळालेली इतकी रक्कम
19
Ahemdabad Plane Crash: विमान दुर्घटनेला २४ तास उलटल्यावर बिग बींनी केली पोस्ट, नेटकरी भडकले
20
मंदिरासमोर फेकले मांस, मुख्यमंत्री संतापले; समाजकंटकास पाहताच गोळ्या घालण्याचे आदेश

गप्पागोष्टी, खेळ आणि सांस्कृतिक कार्यक्रमातून पुण्यात रंगला ज्येष्ठ कलाकारांचा स्नेहमेळावा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 18, 2018 15:00 IST

एकमेकांशी सुखदु: ख शेअर करीत जुन्या आठवणींना उजाळा देत गप्पागोष्टी, मैदानी खेळ, स्पर्धा आणि संगीत रजनी अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून ज्येष्ठ कलाकारांनी एक अविस्मरणीय दिनु अनुभवला.

ठळक मुद्देअखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजनसंगीत रजनीने जिंकली कलाकारांची मने

पुणे : एकमेकांशी सुखदु: ख शेअर करीत जुन्या आठवणींना उजाळा देत गप्पागोष्टी, मैदानी खेळ, स्पर्धा आणि संगीत रजनी अशा विविध कार्यक्रमांच्या माध्यमातून ज्येष्ठ कलाकारांनी एक अविस्मरणीय दिनु अनुभवला. कलाकारांसाठी एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता तोही भेटीगाठीचा...निमित्त होते, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषदेच्या पुणे शाखेच्या वतीने कर्वेनगर येथील राजेंद्रबन येथे आयोजित ज्येष्ठ कलाकारांच्या स्नेहमेळाव्याचे. रंगभूमी, चित्रपट आणि मालिकेमधील तारका मेळाव्यात अवतरले होते. ज्येष्ठ अभिनेत्री ज्योती चांदेकर, सुहासिनी देशपांडे, जयमाला इनामदार, आशु, रजनी भट, भारती गोसावी, स्वरूपकुमार,भाग्यश्री देसाई, आसावरी तारे, विजय पटवर्धन, श्रीराम रानडे, दिलीप आव्हाळ आदी विविध कलाकार मेळाव्यात सहभागी झाले होते. सकाळी नऊ वाजता हास्यक्लबपासून मेळाव्याला प्रारंभ झाला. पपीचंद श्रीश्रीमाळ आणि गंगासागर यांनी मैदानी खेळातून कलाकारांना दमवले. चैताली माजगावकर हिने कलाकारांसाठी खास खेळ घेऊन रंगत आणली. वाहतूक शाखेचे सहाय्यक पोलीस आयुक्त राजेंद्र भामरे यांनी पुण्याच्या प्रदूषणाची माहिती देण्याबरोबरच वाहतुकीसंदर्भात कोणत्या समस्या आहेत या कलाकारांकडून जाणून घेतल्या.

ज्योती चांदेकर, जयमाला इनामदार, भाग्यश्री देसाई, रेश्मा मुसळे, पराग चौधरी, वर्षा संगमनेरकर यांनी एकपात्री अविष्कारांचे सादरीकरण केले. मेलडी मेकर्स, सरगम, रश्मी नाईक यांनी एकत्र येऊन आॅर्केस्ट्रा सादर केला. या संगीत रजनीने कलाकारांची मने जिंकली. या स्नेहमेळाव्याला ज्येष्ठ गायक पं. चंद्रकांत लिमये, श्रद्धानंद भोसले, अखिल भारतीय चित्रपट महामंडळाचे अध्यक्ष मेघराज राजे भोसले, नाट्य परिषद पुणे शाखेचे अध्यक्ष सुरेश देशमुख आणि प्रमुख कार्यवाह दीपक रेगे उपस्थित होते. 

टॅग्स :Puneपुणे