शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान मोदी आणि अमेरिकेचे उपाध्यक्ष जेडी वेन्स यांची भेट, 'या' महत्वाच्या मुद्द्यांवर झाली चर्चा
2
"जो हाल तेरे बाप का हुआ, वही तेरा होगा...!"; झिशान सिद्दीकी यांना जिवे मारण्याची धमकी 
3
पंतप्रधान मोदींनी दिलं खास गिफ्ट, खुश झाली अमेरिकन उपाध्यक्षांची मुलं! बघा VIDEO
4
"राज ठाकरे यांना झुकवून युती होऊ शकते, असे मला वाटत नाही, कारण..."; उदय सामंत स्पष्टच बोलले 
5
सरपंच संतोष देशमुख यांचे नाव देऊन शाळेत पुतळाही उभारणार; शिक्षण संस्थेचा मोठा निर्णय
6
काँग्रेसविरोधात भाजयुमोचे आंदोलन, संवेदनशील भागात तणाव
7
'यंदा कर्तव्य आहे' वाटतं? टॉस वेळी शुबमन गिलला बाउन्सर; हँडसम क्रिकेटरनं असा दिला रिप्लाय (VIDEO)
8
"राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांची युती झाल्यास हत्तीवरून पेढे वाटणार"; ठाकरे गटाच्या नेत्याचा निर्धार
9
GT चा 'ब्लॉकबस्टर शो' जारी; घरच्या मैदानावर खेळणाऱ्या गत चॅम्पियन KKR वर पडले भारी!
10
भाजपला कधी मिळणार नवीन अध्यक्ष? RSS आणि पक्षाच्या उच्च नेतृत्वात विचारमंथन सुरू...
11
40 वर्षांचे प्रेम अन् 80 व्या वर्षी बांधली लगीनगाठ; अनोख्या लग्नाची सर्वत्र चर्चा...
12
IPL 2025 KKR vs GT : रिंकूनं घेतला जबरदस्त कॅच! शुबमन गिलचं शतक हुकलं (VIDEO)
13
"यात मनी लाँडरिंगचा गुन्हा कुठे आहे?"; सोनिया- राहुल गांधींवरील कारवाईवरुन पी. चिदम्बरम यांचा सवाल
14
पत्नीने का उचलले टोकाचे पाऊल? पाहा माजी डीजीपींच्या हत्येची Inside Story...
15
लॉकडाऊन एक फालतू निर्णय होता; व्हाईट हाऊसने कोरोनाची वेबसाईट बदलली, ट्रम्प अन् लॅब लीक...
16
टॅरिफनंतर ट्रम्प यांचा नवा आदेश, ८ मुद्द्यांची 'नॉन-टॅरिफ फ्रॉड' यादी जाहीर
17
राजस्थानचं टेन्शन वाढलं, संजू सॅमसनला दुखापत, आरसीबीविरुद्ध खेळणार नाही!
18
खरी ठरली नॅस्ट्रोडॅमसची भविष्यवाणी? काही शतकांपूर्वी व्हॅटिकन सिटी अन् पोप संदर्भात केलं होतं असं भाकीत
19
'कामाचं बोला' म्हणणाऱ्या एकनाथ शिंदेंना राजू पाटलांनी डिवचलं; पाठवली रखडलेल्या कामांची यादी
20
कौतुकास्पद! रोज फक्त १२० रुपये खर्च करुन कोट्यवधींची बचत; एक, दोन नव्हे तर घेतली ३ घरं

Vikram Gokhale Death: मराठी रंगभूमीवरचे 'बॅरिस्टर', ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले काळाच्या पडद्याआड; पुण्याच्या हॉस्पिटलमध्ये अखेरचा श्वास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2022 14:44 IST

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन झाले आहे.

मराठी आणि हिंदी चित्रपटसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते विक्रम गोखले यांचे निधन झाले आहे. पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात त्यांची प्राणज्योत मालवली. ते ७७ वर्षांचे होते. गेल्या १५ दिवसांहून अधिक काळापासून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू होते, परंतु त्यांची प्रकृती खालावत गेली आणि आज त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विक्रम गोखले यांच्या निधनाची माहिती रुग्णालय प्रशासनानं पत्रकार परिषद घेऊन दिली. 

पुण्यातील बालगंधर्व रंगमंदिर येथे विक्रम गोखले यांचे पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवलं जाणार असून आज सायंकाळी ६ वाजता वैंकुठभूमी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. 

विक्रम गोखले यांना घरातूनच अभिनयाचा वारसा मिळाला होता. त्यांच्या पणजी दुर्गाबाई कामत या भारतीय चित्रपट सृष्टीतल्या पहिल्या अभिनेत्री होत्या. तर त्यांच्या आजी कमलाबाई गोखले पुर्वीच्या कमलाबाई कामत या पहिल्या बाल-अभिनेत्री होत्या. १९१३ मध्ये दुर्गाबाईंनी दादासाहेब फाळके यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या 'मोहिनी भस्मासुर' नावाच्या चित्रपटात पार्वतीची आणि कमलाबाईंनी मोहिनीची भूमिका साकारली होती. विक्रम गोखले यांचे वडील चंद्रकांत गोखले यांनी ७१ हून जास्त हिंदी-मराठी चित्रपटांतून भूमिका केल्या होत्या. विक्रम गोखले यांच्या पत्‍नीचं नाव वृषाली आहे.

विक्रम गोखले मालिका,नाटक आणि चित्रपट अशा तिन्ही माध्यमात कार्यरत होते. विक्रम गोखले यांनी इंडस्ट्रीत स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली होती. त्यांनी त्यांच्या कारकिर्दीत अनेक सुपरहिट चित्रपट दिले होते. संजय लीला भन्साळी यांच्या 'हम दिल दे चुके सनम' या चित्रपटात तो ऐश्वर्याच्या वडिलांच्या भूमिकेत दिसला होते. याशिवाय ते 'भूल भुलैया', 'दिल से', 'दे दना दान', 'हिचकी', 'निकम्मा', 'अग्निपथ', 'मिशन मंगल' या हिंदी चित्रपटात त्यांनी काम केले होते. भिंगरी, माहेरची साडी, लपंडाव, वासुदेव बळवंत फडके, सिद्धान्त हे त्यांचे गाजलेले चित्रपट आहेत. अभिनयासोबतच त्यांनी लेखन आणि दिग्दर्शन देखील केले आहे. त्यांनी दिग्दर्शित केलेल्या 'आघात' हा चित्रपटाचे समीक्षकांनी विशेष कौतुक केले. २०१३ मध्ये प्रदर्शित झालेल्या 'अनुमती' या चित्रपटातील अभिनयासाठी त्यांना राष्ट्रीय पुरस्काराने गौरवण्यात आले होते. विक्रम गोखले यांची महत्त्वाची भूमिका असलेला गोदावरी हा चित्रपट याच महिन्यात प्रदर्शित झाला. 

खरी ओळख मिळाली 'बॅरिस्टर' नाटकातूनविक्रम गोखलेंनी सुद्धा आयुष्यात अनेक भूमिका केल्या पण त्यांची खरी ओळख आहे ती बॅरिस्टर. जयवंत दळवी लिखित हे नाटक मराठी नाटकांमधील एक दर्जेदार नाटक म्हणून मानलं जातं. मानवी नातेसंबंधांची अनोखी बाजू या नाटकाने मांडली. बॅरिस्टर या नाटकात विक्रम गोखले आणि त्यांचे वडील चंद्रकांत गोखले यांनी एकत्र काम केले होते. याशिवाय कथा, कमला, के दिल अभी भरा नही, छुपे रुस्तम, नकळत सारे घडले, दुसरा सामना,सरगम, स्वामी अशा अनेक नाटकात त्यांनी काम केले होते. मात्र घशाच्या त्रासामुळे त्यांनी नाटकातील अभिनय संन्यास घेतला होता.

बऱ्याच वर्षांनंतर मालिकेतून केलं होतं कमबॅकविक्रम गोखले यांनी टेलिव्हिजनमध्येही एक वेगळी ओळख निर्माण केली होती. १९८९ ते १९९१ या काळात दूरदर्शनवर चाललेल्या 'उडान' या प्रसिद्ध मालिकेतही त्यांनी काम केले होते. याशिवाय त्यांनी अग्निहोत्र, या सुखानों या, संजीवनी आणि सिंहासन या मालिकेत काम केले होते. अग्निहोत्री मालिकेत विक्रम गोखलेंनी मोरेश्वर गोखलेंचे पात्र साकारले होते. त्यांची ही भूमिका खूप लोकप्रिय झाली होती. या मालिकेनंतर अनेक वर्षांनंतर ते अलीकडेच ते छोट्या पडद्यावर गाजत असलेल्या 'तुझेच मी गीत गात आहे' या मालिकेत दिसले होते. विक्रम गोखलेंनी मालिकेत गुरु पंडित मुकूल नारायण यांचे पात्र साकारले होते.

टॅग्स :Vikram Gokhaleविक्रम गोखले