सासवड : पुरंदर तालुक्यामध्ये ग्रामपंचायतीच्या निवडणुका सुरूआहेत. मौजे नावळी येथील निवडणूक निर्णय अधिका:याने उमेदवाराचा जातपडताळणी अर्ज छाननीच्या वेळी स्वीकारला, म्हणून काही गावक:यांनी आक्षेप घेतला. परंतु, निवडणूक निर्णय अधिका:यांनी त्यांच्या आक्षेपाला उत्तर दिले नाही. म्हणून, नावळी येथील काही ग्रामस्थांनी सासवड येथील तहसील कार्यालयात सायंकाळी 6 र्पयत ठिय्या मांडला होता.
नावळी येथील निवडणूक प्रक्रिया सुल असून, काल (दि. 1क्) उमेदवारी अर्जांची छाननी होती. नावळी येथील प्रभाग क्र. 2 मधील उमेदवार नीता शांताराम गिरमे यांनी जातपडताळणी दाखला छाननीच्या प्रसंगी दिला. निवडणूक निर्णय अधिकारी संजय बधे यांनी तो स्वीकारला. जातपडताळणी दाखला उमेदवारी अर्जासोबतच देणो आवश्यक होते. त्यामुळे छाननीच्या वेळी तो स्वीकारू नये, असा आक्षेप दुस:या उमेदवार सविता धनंजय चौरे यांनी घेतला. परंतु, निवडणूक निर्णय अधिकारी यांनी तो आक्षेप तोंडी अमान्य केला. यामुळे नावळीच्या काही ग्रामस्थांनी याबाबत तक्रार अर्जही दाखल केला. परंतु, त्याकडेही दुर्लक्ष करण्यात आले.
निवडणूक निर्णय अधिका:यांनी तक्रार अर्जाला साधे उत्तरही दिले नाही. याचा निषेध म्हणून या नागरिकांनी तहसील कार्यालयातच ठिय्या आंदोलन केले. या वेळी नावळीचे उपसरपंच शिवाजी साळुंके यांनी सांगितले, की उमेदवारी अर्जाबरोबर जातपडताळणी दखल द्यावा, अशा लेखी सूचना अर्ज भरतानाच दिलेल्या होत्या. असे असतानासुद्धा छाननीच्या वेळी जातपडताळणी कसा स्वीकारला असे अधिका:यांना विचारले असता, त्यांनी जिल्हाधिकारी यांच्या तोंडी सूचनेनुसार दाखला स्वीकारल्याचे सांगितले.
तसेच हेच उत्तर लेखी स्वरूपात मागितले असता, त्यांनी नकार दिला व कोणतीही पूर्वसूचना न देता ते कार्यालयातून वेळेपूर्वीच निघून गेले, त्यामुळे आम्हाला ठिय्या आंदोलन करावे लागले.