शहरं
Join us  
Trending Stories
1
अनकॅप्ड मुकुल चौधरीची अविश्वसनीय खेळी! KKR च्या तोंडचा घास हिसकावत LSG ला जिंकून दिली मॅच
2
मुंबईला भारतातील पहिली नॉन-एसी ‘बंद दरवाजांची’ लोकल ट्रेन; उपनगरीय सेवेत होणार दाखल  
3
कोण आहे Mukul Choudhary? ‘आर्मी मॅन’च्या भूमीतला २१ वर्षीय ‘जवान’ बिग हिटरच्या रुपात कसा घडला?
4
Wife Killed Husband: पतीची हत्या, पत्नीचा आक्रोश; प्रियंकाच दुःख बघून सगळे हेलावले, पण तिच निघाली मास्टरमाईंड
5
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
6
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
7
Latest Marathi News LIVE: इराणने हल्ला केला, तर आम्हीही निष्ठुरपणे उत्तर देऊ; इस्रायलच्या संरक्षण मंत्र्याचा इशारा
8
बॉलिंगसाठी 'ग्रीन' सिग्नल! तब्बल २५ कोटींचा ऑलराउंडर अखेर गोलंदाजीला आला; पहिल्याच षटकात रिषभ पंतची शिकार
9
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
10
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
11
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
12
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
13
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
14
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
15
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
16
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
17
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
18
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
19
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
20
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
Daily Top 2Weekly Top 5

पिंपरी: आरटीओ नोंदणीपूर्वी वाहने पळविणारे चोरटे जेरबंद, चार वाहनांसह मराठवाड्यातून आरोपींना अटक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2017 17:29 IST

कंपनीच्या गोदामात उभी केलेली वाहने आरटीओची नोंदणी होण्यापुर्वी पळवून बीड परिसरात वाहनांची विक्री करणारे चोरटे संघटीत गुन्हेगारी विरोधी पथकाने जेरबंद केले.

ठळक मुद्देकंपनीच्या गोदामात उभी केलेली वाहने आरटीओची नोंदणी होण्यापुर्वी पळवून बीड परिसरात वाहनांची विक्री करणारे चोरटे संघटीत गुन्हेगारी विरोधी पथकाने जेरबंद पिंपरी,भोसरी, एमआयडीसी आणि चाकण परिसरातून सुमारे ४१ लाख ४४ हजार ६४६ रूपये किंमतीची वाहने पळवून नेल्याचे उघडकीस

पिंपरी, दि. 23 - कंपनीच्या गोदामात उभी केलेली वाहने आरटीओची नोंदणी होण्यापुर्वी पळवून बीड परिसरात वाहनांची विक्री करणारे चोरटे संघटीत गुन्हेगारी विरोधी पथकाने जेरबंद केले. त्यांनी पिंपरी,भोसरी, एमआयडीसी आणि चाकण परिसरातून सुमारे ४१ लाख ४४ हजार ६४६ रूपये किंमतीची वाहने पळवून नेल्याचे उघडकीस आले आहे. अटक करून न्यायालयात हजर केले असता, २४ ऑगस्टपर्यंत त्यांना पोलीस कोठडी देण्यात आली आहे. संघटित गुन्हेगारी विरोधी पथकाने दिलेल्या माहितीनुसार रफिक उमर जमादार (वय ३०, चिंचवड),विष्णू भागुजी शिंगाडे (वय ४७,अजंठानगर),युनुस शौकत शेख (३५,पाचेगाव,गेवराई), अक्रम बिस्मिल्ला शेख (वय ४८,जालना), चंद्रकांत सुनील आठवले (वय २३, जालना),शब्बीर मुनीर शेख (वय ३५,जालना) अशी आरोपींची नावे आहेत. त्यांनी १३ लाखांच्या दोन, एक आठ लाखाची आणि एक साडेसहा लाख रूपये किंमतीची नवीकोरी मोटार कंपनीच्या गोदामातून पळवून नेली. टेहळणी करून गोदामाच्या रखवालदाराची नजर चुकवुन चोरट्यांनी मोटारी बीड,गेवराई येथे विक्रीस नेल्या. तेथे या चोरीच्या मोटारी खरेदी करण्याची तयारी ठेवलेला जालना येथील रहिवासी मजहर खान पोलिसांना गुंगारा देऊन पसार झाला आहे. यातील प्रमुख आरोपी रफिक जमादार हा पिंपरी चिंचवडमधील रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. दुसरा विष्णू भागुजी शिंगाडे हा आरोपी निगडीतील राहणारा आहे. पिंपरी चिंचवड, भोसरी,चाकण परिसरातून चोरून नेलेली वाहने बीड, गेवाराई येथे विक्रीस नेल्याची माहिती संघटित गुन्हेगारी विरोधी  पथकातील ब्रम्हानंद नाईकवडी यांना मिळाली. त्यांनी वरिष्ठांची परवानगी घेऊन आरोपींच्या शोधार्थ पथक मराठवाड्यात पाठवले. तेथे मुद्देमालासी चोरट्यांना जेरबंद केले. अप्पर पोलीस आयुक्त प्रदीप देशपांडे, पोलीस उपायुक्त (गुन्हे ) पंकज डहाणे, सहायक पोलीस आयुक्त संजय निकम यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरिक्षक नाईकवडी, सहायक पोलीस निरिक्षक गणेश पवार, पोलीस उपनिरिक्षक पडी डी गायकवाड, पोलीस हवालदार हजरत पठाण,भालचंद्र बोरकर,दिपक भुजबळ, राज देशमुख यांच्यासह विठ्ठल बंडगर, शितल शिंदे, दत्ता फुलसुंदर यांच्य पथकाने ही कामगिरी केली. 

टॅग्स :Crimeगुन्हाPoliceपोलिसPolice Stationपोलीस ठाणे