शहरं
Join us  
Trending Stories
1
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
2
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
3
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
4
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
5
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
6
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
7
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
8
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
9
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
10
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
11
बँक मॅनेजर जोडप्याचा हाय-प्रोफाइल घोटाळा; ८५ वर्षीय वृद्धेची ७६ लाखांची फसवणूक
12
मंत्री गणेश नाईक म्हणतात... ठाण्यातील शिवसेनेचा खरा इतिहास सांगितला जात नाही!
13
बेपत्ता वैमानिकासाठी अमेरिकेची धावपळ! शत्रूच्या पायलटला हवाली करण्यासाठी इराणकडून बक्षीस जाहीर
14
IPL New Record : नवा रेकॉर्ड! वैभव सूर्यवंशी-यशस्वी जैस्वाल जोडीनं रचला इतिहास
15
कनिष्ठ, वरिष्ठ अधिकारीही भोंगळ कारभाराला जबाबदार; उच्च न्यायालयाची कठोर टीका
16
राज्यातील निवासी डॉक्टरांची ड्युटी आठवड्याला ४८ तास? वैद्यकीय शिक्षण विभागात संभ्रम
17
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
18
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
19
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
20
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठ आवारात विद्यार्थीनींसाठी आता वाहनव्यवस्था

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 7, 2017 15:13 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आवारात रात्रीच्यावेळी ये-जा करणाºया विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वाहन व्यवस्था करण्यात आली आहे.

ठळक मुद्देही निशुल्क सेवा सायंकाळी साडे सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत मुख्य प्रवेशद्वारापासून मुलींच्या वसितगृहापर्यंत सुरू असणार आहे.सुरक्षा विभागाकडीलच हे वाहन आहे.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ आवारात रात्रीच्यावेळी ये-जा करणार्‍या विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वाहन व्यवस्था करण्यात आली आहे. ही निशुल्क सेवा सायंकाळी साडे सहा ते रात्री दहा वाजेपर्यंत मुख्य प्रवेशद्वारापासून मुलींच्या वसितगृहापर्यंत सुरू असणार आहे. विद्यापीठ आवारामध्ये यापूर्वी अनेकदा सुरक्षिततेचे प्रश्न उभे राहिले आहेत. खून, हाणामारी, विद्यार्थिनींची छेडछाड असे प्रकार घडल्याने सुरक्षिततेच्या दृष्टीने प्रशासनाकडून विविध उपाययोजना केल्या जातात. वाहनांच्या तोडफोडीच्या घटनाही घडल्या आहेत. तसेच विद्यार्थी संघटनांमधील वादावादी ही बाब तर नित्याचीच झाली आहे. त्यामुळे विद्यापीठाच्या सुरक्षा विभागाकडून याबाबत सातत्याने गस्त घालून त्यावर नियंत्रण ठेवण्याचा प्रयत्न केला जातो. याचाच एक भाग म्हणून सुरक्षा विभागाने विद्यार्थिनींच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने त्यांना ये-जा करण्यासाठी वाहनव्यवस्था केली आहे. सर्व विद्यार्थिनींनी विद्यापीठ आवारात ये-जा करण्यासाठी या चारचाकी वाहनाचा वापर करावा, असे आवाहन विद्यापीठ प्रशासनाने केले आहे.याविषयी माहिती देताना विद्यापीठाचे प्रभारी कुलसचिव डॉ. अरविंद शाळीग्राम म्हणाले, विद्यार्थिनींच्या सुरक्षेच्यादृष्टीने वाहन व्यवस्था करण्यात आली आहे. ही सेवा विद्यापीठाचे मुख्य प्रवेशद्वार ते मुलींचे वसितगृह या दरम्यान असेल. सायंकाळी साडे सहा वाजल्यानंतर रात्री साधरणपणे दहा वाजेपर्यंत याचा वापर करता येईल. सुरक्षा विभागाकडीलच हे वाहन आहे. ही सेवा सध्यातरी पूर्णपणे मोफत असणार आहे. वसतिगृहात राहणार्‍या विद्यार्थिनींची ये-जा यावेळेत असते. त्यामुळे प्रामुख्याने त्यांच्यासाठी ही सेवा उपलब्ध करून देण्यात आली आहे. यावेळेत इतर विद्यार्थिनींना ये-जा करण्यासाठीही हे वाहन वापरता येईल.

टॅग्स :Pune universityपुणे विद्यापीठPuneपुणे