शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
5
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
6
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
7
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
8
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
9
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
10
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
11
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
12
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
13
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
14
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
15
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
16
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
17
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
18
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
19
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
20
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
Daily Top 2Weekly Top 5

पालेभाज्या, फळभाज्या झाल्या स्वस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 23, 2018 02:04 IST

शेवगा, आले, पावट्याच्या दरात मोठी घट

पुणे : संपूर्ण राज्यासह जिल्ह्यात झालेल्या चांगल्या पावसाने व गेल्या तीन-चार दिवसांपासून दिलेली उघडीपी यामुळे सध्या शेतीमालासाठी अत्ंयत पोषक वातावरण तयार झाले आहे. यामुळे रविवार (दि.२२) रोजी गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केटयार्डात फळभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात वाढली. यामुळे गेल्या अनेक महिन्यांनंतर प्रथमच सर्वच प्रकारच्या फळभाज्या व पालेभाज्या स्वस्थ झाल्या आहेत. दरम्यान, आषाढी एकादशीसाठी बाजारात रताळ्यांची आवक वाढली असून, गतवर्षीच्या तुलनेत चांगले दर मिळत आहे. तर मालवाहतूकदारांच्या वतीने पुकारण्यात आलेल्या बेमुदत संपाचा आवक व भाववाढीवर कोणताही परिणाम झाला नसल्याचे दिसून आले.गुलटेकडी येथील श्री छत्रपती शिवाजी मार्केट यार्डामध्ये रविवारी १६० ते १७० ट्रक शेतमालाची आवक झाली. यात मागणीच्या तुलनेत आवक वाढल्याने आले, शेवगा आणि पावट्याच्या दरात मोठी घट झाली आहे. तर, आवक घटल्याने गाजराच्या भावात दहा टक्क्यांनी वाढ झाली आहे. उर्वरित सर्व फळभाज्यांचे भाव स्थिर आहेत. मार्केट यार्डामध्ये परराज्यातून प्रामुख्याने कर्नाटकमधून ६ टेम्पो मटार, कर्नाटक आणि गुजरात येथून चार ते पाच ट्रक कोबी, तमिळनाडू, आंध्र प्रदेश आणि गुजरात येथून १४ ते १५ टेम्पो हिरवी मिरची, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक येथून ७ ते ८ टेम्पो शेवगा, इंदोर येथून २ टेम्पो गाजर, कर्नाटकातून तोतापुरी कैरी २ टेम्पो, म्हैसूर येथून रताळी २२ ते २५ ट्रक, मध्य प्रदेश आणि गुजरातमधून लसणाची साडेचार ते पाच हजार गोणी इतकी आवक झाली. स्थानिक भागातून सातारी आले २५०० ते २६०० पोती, टॉमेटो साडेचार ते पाच हजार पेटी, फ्लॉवर १४ ते १५ टेम्पो, कोबी ८ ते १० टेम्पो, तांबडा भोपळा १० ते १२ टेम्पो, गवार ८ ते १० टेम्पो, भेंडी १० ते १२ टेम्पो, ढोबळी मिरची १० ते १२ टेम्पो, हिरवी मिरची ४ ते ५ टेम्पो, भुईमूग २०० पोती, रताळी १४ ते १५ ट्रक, गाजर ४ ते ५ टेम्पो, पावटा ७ ते ८ टेम्पो, काकडी १० ते १२ टेम्पो, कांद्याची ६० ते ७० ट्रक, आग्रा, इंदौर आणि तळेगाव येथून नवीन बटाट्याची ४० ते ४५ ट्रक इतकी आवक झाली.

टॅग्स :vegetableभाज्याPuneपुणे