शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
4
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
5
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
6
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
7
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
8
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
9
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
10
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
11
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
12
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
13
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
14
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
15
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
16
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
17
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
18
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
19
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
20
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
Daily Top 2Weekly Top 5

बॅनरबाजीमुळे भिगवणचे विद्रूपीकरण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 29, 2018 00:47 IST

न्यायालयाच्या आदेशाला हरताळ : कारवाई होत नसल्याने नियमभंगाचे प्रमाण वाढले

भिगवण : भिगवण बाजारपेठेतील रस्ते बॅनरबाजी आणि दुकानाच्या जाहिरातींच्या बोर्डाने व्यापून गेलेले आहेत. वारंवार ठराव घेणारी ग्रामपंचायत प्रशासन आणि पोलीस प्रशासन बघ्याची भूमिका घेत असल्याने शहराच्या विद्रूपीकरणात भर पडत आहे. न्यायालयाचा आदेशाला हरताळ फासून अनधिकृत बॅनरबाजीला अभय दिले जात असल्याने अशा प्रकाराला प्रचंड उत आल्याचे दिसून येत आहे.

भिगवण बाजारपेठेत आसपासच्या ४० गावे आणि वाडीवस्त्यांवरील नागरिक रोज लागणाऱ्या वस्तूंच्या खरेदीसाठी येत असतात. त्यामुळे वाहतूककोंडी होण्याचे प्रकार बºयाच वेळा घडतात. या वाहतूककोंडीला बºयाच अंशी रस्त्यावर लागलेले बॅनर आणि दुकानाचे बोर्ड कारणीभूत ठरत असून यावर ग्रामपंचायत भिगवणमध्ये ठराव घेऊन पोलीस आणि ग्रामपंचायत प्रशासन यांची परवानगी असेल तरच बॅनर लावावेत, असा ठराव घेण्यात आला. तसेच जागामालकाची परवानगी घेत जितके दिवस बॅनर लागणार असेल त्याप्रमाणे भाडे ग्रामपंचायतकडेभरल्या नंतरच परवानगी दिली जाईल, असा ठराव मंजूर करण्यात आला. मात्र, या ठरावाला कचºयाची टोपली दाखवत हायस्कूल, मंदिर परिसर, बाजारपेठेतील रस्ते, इतकेच काय ग्रामपंचायत कार्यालयासमोरही बॅनरबाजी करीत शहराच्या विद्रूपीकरणास सुरुवात केली.महामार्गावरील जाहिरातबाजी धोकादायककाही जाहिरातदारांनी पुणे-सोलापूर महामार्गावर बॅनरबाजी सुरू केली. त्यामुळे अपघाताचा धोका संभवतो, याचे भान ग्रामपंचायत प्रशासन पोलीस प्रशासन तसेच दिवसभर महामार्गावर गस्त घालणाºया महामार्ग प्रशासनाच्या कर्मचाºयांना येत नाही. आपल्या व्यावसायाची जाहिरात झाल्यावर जनतेचे काहीही होवो, आपल्याला काहीही देणे-घेणे नाही, अशी व्यावसायिकांची भावनाच यातून समोर येत आहे. ठराव घेतल्यापासून बॅनरबाजी करणाºयांकडून ग्रामपंचायत प्रशासनाकडे किती भाडे जमा झाले, याची माहितीही सर्वसामान्य नागरिकांना मिळणे जरुरीचे आहे. तसेच महामार्गावरील बॅनरमुळे अपघात होवून काही जीवित हानी झाल्यावरच प्रशासन जागे होणार का? तसेच काही झाल्यास याची जबाबदारी निश्चित होणे हे महत्त्वाचे आहे.

टॅग्स :Puneपुणेdigitalडिजिटल