शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

पुण्याच्या भारत इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने पटकाविला ‘वनराई करंडक’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 17, 2018 17:19 IST

शिवाजीनगर येथील भारत इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने सादर केलेल्या ‘आता तरी जागा हो मानवा’ या नाटिकेने प्रथम क्रमांक पटकावत ‘वनराई करंडक’वर आपले नाव कोरले आहे. 

ठळक मुद्देबालगंधर्व रंगमंदिर येथे पार पडला अंतिम फेरी आणि बक्षीस समारंभ ३६ शाळांनी घेतला होता सहभाग, अंतिम फेरीत १० नाटिका आणि १० नृत्य-गीत सादरीकरण

पुणे : शिवाजीनगर येथील भारत इंग्लिश स्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाने सादर केलेल्या ‘आता तरी जागा हो मानवा’ या नाटिकेने प्रथम क्रमांक पटकावत ‘वनराई करंडक’वर आपले नाव कोरले आहे. वनराई करंडकाच्या नृत्य-गीत विभागात कात्रजच्या हुजूरपागा स्कूलने प्रथम क्रमांक मिळविला. पर्यावरणाचे संस्कार रुजविणार व्यासपीठ म्हणजेच ह्यवनराई पर्यावरण वाहिनीची आंतरशालेय पर्यावरण सांस्कृतिक स्पर्धा अर्थात ‘वनराई करंडक’ची नुकतीच बालगंधर्व रंगमंदिर येथे अंतिम फेरी आणि बक्षीस समारंभ पार पडला.बालसंभाजीची भूमिका साकारणारे बालकलाकार दिवेश मेदगे, मा. आ. उल्हास  पवार, वनराईचे अध्यक्ष रवींद्र धारिया, वनराईचे विश्वस्त आणि ज्येष्ठ उद्योजक नितीन देसाई, रोहिदास मोरे, इंदिरा बेहरे चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष अशोक बेहरे यांच्या उपस्थितीत बक्षीस समारंभ झाला. यंदाच्या स्पर्धेत तब्बल ३६ शाळांनी सहभाग घेतला होता. त्यातील २० संघांची अंतिम फेरीसाठी निवड झाली होती. अंतिम फेरीत १० नाटिका आणि १० नृत्य-गीत सादरीकरण झाले.

टॅग्स :VanraiवनराईBal gandharva Rangmandirबालगंधर्व रंगमंदिरPuneपुणे