शहरं
Join us  
Trending Stories
1
अस्तनीतला साप...! UAE ने ३ अब्ज डॉलर्सचे कर्ज परत मागताच पाकिस्तानी खासदार भडकले; चक्क 'अखंड भारता'ची भीती दाखवली
2
मुंबईच्या बाहेर जाणारी पहिली मेट्रो! आता अंधेरी ते मिरा भाईंदर थेट प्रवास, तिकीट किती? स्थानकं किती? A टू Z माहिती...
3
वेळ संपत चालली! इराणच्या भीतीने सौदीने बहारिनला जोडणारा पूल बंद केला; रात्री काय घडणार... 
4
Middle East War: "होर्मुझ सामुद्रधुनी उघडा नाही तर, गंभीर परिणाम भोगा" अमेरिकेचा इराणला शेवटचा अल्टिमेटम!
5
पाकच्या धमकीनंतर बंगालच्या सागरात भारताचं मोठं पाऊल; NOTAM जारी, ११-१२ एप्रिलला काय घडणार?
6
Monsoon Forecast 2026: यावर्षी सरासरीपेक्षा कमी पाऊस, जूनमध्ये स्थिर, तर जुलै ते सप्टेंबरदरम्यान...., स्कायमेटचा अंदाज 
7
"काँग्रेसचा डाऊनफॉल सुरु"; पार्थ यांच्या टीकेवर सुप्रिया सुळे म्हणाल्या; "मोठ्यांनी एकदा सांगितल्यावर..."
8
दोन वरिष्ठ महिला पोलीस अधिकारी 'भोंदू बाबा' अशोक खरातच्या संपर्कात; धक्कादायक खुलासे होण्याची शक्यता
9
इराणचा वेळ संपत आला! अमेरिकेकडे अजूनही शिल्लक आहेत 'हे' ५ महाविनाशक शस्त्रे; ट्रम्प यांचा पुढचा वार ठरणार निर्णायक?
10
'भूषणा'वह गगनभरारी! केवळ 'आदेश' देणारा नव्हे, तर 'मार्गदर्शन' करणारा अधिकारी
11
चमत्कार, वशीकरण नाही तर ‘हे’ तंत्र वापरून केलं महिलांचं शोषण, SITसमोर खरातने दिली कबुली
12
Video - घनदाट जंगलात रस्ता चुकली, ३ दिवस पाण्यावर जगली; ट्रेकरने 'अशी' दिली मृत्यूशी झुंज
13
ट्रम्पच्या धमकीला बधला नाही इराण, आणखी जोरदार हल्ले केले सुरू; सौदीवर मिसाईल हल्ले, कुवेतमध्ये १५ जखमी
14
अमरावती-अकोला महामार्गावर भीषण अपघात; चहा पिऊन परतणाऱ्या ४ तरुणांचा जागीच मृत्यू
15
एफडी करणार आहात? खाजगी आणि सरकारी बँकांचे लेटेस्ट व्याजदर तपासा, कुठे मिळतोय सर्वाधिक फायदा?
16
घरगुती गॅस सिलिंडर स्वस्त होणार? एलपीजी आणि पीएनजी 'टॅक्स फ्री' करण्याची मागणी; किती दिलासा मिळेल?
17
खळबळजनक! डोसा खाल्ल्याने २ मुलींचा मृत्यू; आई-वडिलांची प्रकृती गंभीर, नेमकं काय घडलं?
18
सापाची कात, पक्ष्यांचे अवशेष अन् अश्लील व्हिडिओ; एरंडेच्या ऑफिसमध्ये सापडलं भोंदूगिरीचे साहित्य
19
IPL 2026: नाव मोठं दर्शन खोटं! आयपीएलच्या पहिल्याच आठवड्यात फ्लॉप ठरले 'हे' स्टार खेळाडू
20
TATA Group: टाटा समूहाचे ‘हुकुमाचे एक्के’ फेल? २९ हजार कोटींच्या प्रचंड तोट्याचा अंदाज, काय आहेत डिटेल्स?
Daily Top 2Weekly Top 5

valentine's Day | पुण्यात हवं प्रेमासाठी हक्काचं कपल्स गार्डन!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 14, 2023 14:50 IST

मनातील प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी एक सुंदरशी जागा असावी...

पुणे : प्रेम ही खूप सुंदर भावना आहे, असं अनेक कवी, शायर आपल्या लेखणीतून मांडत असतात; परंतु खरंच हे प्रेम व्यक्त करण्यासाठी तुमच्याकडे हक्काचं ठिकाण आहे का? शहरात अनेक ठिकाणी कपल्स सोबत गैरप्रकार होत असतात, प्रेम करणाऱ्या जोडप्यांना विनाकारण त्रास दिला जातो. त्यांना त्यांच्या मनातील प्रेमभावना व्यक्त करण्यासाठी एक सुंदरशी जागा असावी त्यांना समजून घेणार कोणीही नाही, हीच मागणी घेऊन पुण्यामध्ये राइट टू लव्ह ही चळवळ आठ वर्षांपासून काम करत आहे.

प्रेमीयुगुलांना लग्न करताना येणाऱ्या अडचणी दूर करणे, त्यांचे समुपदेशन करणे, आंतरजातीय, आंतरधर्मीय विवाहासाठी मदत करणे, याबाबत पालकांशी कसा संवाद साधला पाहिजे, याविषयी मार्गदर्शन केले जाते. ही चळवळ हळूहळू वेग घेत महाराष्ट्राबाहेर पाऊल टाकू पाहतेय. राजस्थान, बिहार, आसाम येथूनही प्रेमी जाेडपे आपले प्रश्न घेऊन येतात.

राइट टू लव्ह या संस्थेच्या माध्यमातून २०१८ पासून कपल्ससाठी स्वतंत्र गार्डन असले पाहिजे अशी मागणी केली जात आहे. त्या काळात कार्यरत असणाऱ्या अधिकाऱ्यांनी या संकल्पनेला सकारात्मक प्रतिसादही दिला होता. प्रत्यक्ष कृती मात्र झाली नाही. गेले अनेक वर्षे पुणे आणि पिंपरी चिंचवड महापालिकेकडे या मागणीचा पाठपुरावा करत आहे. नाना नानी पार्क असते, चिल्ड्रन्स पार्क असते त्याप्रमाणे कपलसाठी स्वतंत्र गार्डन का नको?, हा आमचा प्रश्न आहे.

कपल्सला बसण्यासाठी, प्रेमाच्या भावना व्यक्त करण्यासाठी एक हक्काची जागा हवी. ती नसल्यामुळे प्रेम करणारे जोडपी आज नदीपात्राजवळ बसतात. कुठेतरी प्रेम व्यक्त करण्यासाठी जागा शोधत असतात. हे चित्र फार दयनीय आहे. गुंडगिरी करणारे मुले, पोलिसांकडून त्यांना त्रास दिला जातो, अशा परिस्थितीत ही जोडपी कुठे जाणार.

‘राइट टू लव्ह’

झाडाझुडपात, नदी किनारी, बागेत, अंधाऱ्या आणि सुनसान जागेत, संध्याकाळच्या वेळी बसस्टॉप, रेल्वेस्थानक किंवा सिनेमागृह अशा विविध ठिकाणी, आसपासच्या जगाचा विसर पडलेला, एकमेकांमध्ये गुंग-मग्न होऊन प्रेमात आकंठ बुडालेले दोन जीव दिसले तर उत्स्फूर्तपणे बऱ्या-वाईट अनेक प्रतिक्रिया उमटतात. प्रेमीयुगुलांना बसण्यासाठी हक्काची जागा नसल्याने सार्वजनिक ठिकाणांचा आसरा घ्यावा लागतो. सोबतच अनेक वाईट प्रसंगांचा सामनाही करावा लागतो. अशा घटना टाळण्यासाठी प्रेमीयुगुलांना त्यांचा हक्क मिळवून देण्यासाठी "राइट टू लव्ह" या संघटनेद्वारे कपल गार्डन / पार्कची मागणी करण्यात येत आहे.

प्रिय व्यक्तीबरोबर निवांत वेळ घालवण्यासाठी एकांताची जागा आवश्यक आहे. त्याची कमतरता प्रकर्षाने भासते. पुण्यासारख्या शहरात आणि आसपास फिरण्यासाठी अनेक ठिकाण आहेत. या जागांवर प्रेमीयुगुलांनी कितीही हक्क सांगितला तरी यातल्या बहुतेक ठिकाणी प्रेमीयुगुलांखेरीज कुटुंब, तरुणांचे ग्रुप, प्रौढ नागरिक, विक्रेते असे कितीतरी लोक आसपास भटकत असतात. अशा वेळी एकांत हवा म्हणून बाहेर पडलेल्या प्रेमीयुगुलांसाठी या जागा सोयीच्या ठरत नाहीत. त्यामुळे शहरात कपल गार्डन हवे. त्याची जागा सुरक्षित आणि सुसज्ज हवी. तिथे येणाऱ्या प्रेमीयुगुलांनीसुद्धा स्वत:हून परिस्थितीच भान राखण गरजेचं असेल. एकांतासाठी ती जागा दिलेली असली तरी ती सार्वजनिक जागा आहे, याचं भान ठेवणार पार्क आपल्या शहरात असावे, अशी मागणी राइट टू लव्ह या संघटनेतर्फे करण्यात येत आहे.

- अभिजित कांबळे, टीम- राइट टू लव्ह

टॅग्स :PuneपुणेValentine Dayव्हॅलेंटाईन्स डे