शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: कबुतरांना खायला घातलं, वांद्र्यात एका महिलेसह चार जणांविरोधात गुन्हा दाखल!
2
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
3
कर्जाच्या ओझ्याखाली महाराष्ट्र? विरोधकांच्या आरोपानंतर अजित पवारांनी सांगितला आकडा!
4
१ वर्षात ₹१ लाखांचे झाले ₹७४ लाख, कोणता आहे जबरदस्त शेअर ज्याला सातत्यानं लागतंय अपर सर्किट?
5
सूर्यकुमार यादवने पाकिस्तानच्या जखमेवर चोळलं मीठ, सुपर ४ मधील लढतीबाबत म्हणाला...
6
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
7
जीएसटी कपातीचा फायदा थेट जनतेला! खर्चासाठी वाढणार हातातली रोकड; एमएसएमई उद्योगांना बळ मिळणार
8
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
9
पाक-सौदीसोबत आता इतर अरब राष्ट्रेही एकत्र? पाकिस्तानचे संरक्षण मंत्री ख्वाजा आसिफ यांचा दावा
10
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
11
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
12
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
13
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
14
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
15
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
16
आयोग नव्हे, मतदारच राजा !
17
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
18
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
19
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
20
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश

‘व्हॅलेंटाइन वीक’ला सुरुवात : तरुणाईचा उत्साह शिगेला

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 7, 2019 01:27 IST

प्रेमाचं जाळं विणण्यासाठी हिवाळा म्हणजे प्रेमवीरांसाठी समृद्धीचा काळ आणि त्यात सोने पे सुहागा म्हणजे फेब्रुवारीमधला व्हॅलेंटाइन डे! प्रेमाची कोरी पाटी असलेल्या प्रेमवीरांच्या यशकीर्तीचे नवनवे किरण गाठण्याचा सुवर्णदिन.

- प्रीती जाधव-ओझापुणे  - प्रेमाचं जाळं विणण्यासाठी हिवाळा म्हणजे प्रेमवीरांसाठी समृद्धीचा काळ आणि त्यात सोने पे सुहागा म्हणजे फेब्रुवारीमधला व्हॅलेंटाइन डे! प्रेमाची कोरी पाटी असलेल्या प्रेमवीरांच्या यशकीर्तीचे नवनवे किरण गाठण्याचा सुवर्णदिन. व्हॅलेंटाइन सप्ताहाची सुरुवात रोझ डे याच दिवसाने होते. या सप्ताहातील पहिला दिवस गुरुवारी आहे. वर्षापासून हृदयात साठवून ठेवलेले प्रेम या दिवसाच्या निमित्ताने फुलांच्या सुगंधाने दरवळणार आहे.प्रेमाचे प्रतीक असणारे गुलाब !पांढरा गुलाब : आपल्या आयुष्यात कोणीतरी येणार असा संदेश देतो. या रंगाचे गुलाबाचे फूल वडील आपल्या मुलीस आणि मुले आपल्या आईला देतात. हा रंग निर्मळ पे्रमाचे प्रतीक मानला जातो.लाल गुलाब : लाल गुलाब प्रेमाचे प्रतीक आहे. हे ‘माझे तुझ्यावर प्रेम आहे’ हा संदेश गुलाब देतो. हा रंग प्रेमाचा रंग मानला जातो. या रंगाचे गुलाब देऊन प्रियकर-प्रेयसी एकमेकांवरील प्रेम प्रकट करतात.पिवळा गुलाब : माझ्याशी मैत्री करशील काय? हे जणू हा गुलाब विचारतो. हा गुलाब मैत्रीचे संकेत देतो. यात आनंद सामावलेला असतो. हे फूल देणे म्हणजे तू माझा जिवलग होतास, होतीस आणि कायमस्वरूपी राहशील. अनोळखी व्यक्तीला हा गुलाब दिलात तर ही मैत्रीची सुरुवात मानली जाते.गुलाबी गुलाब : हा रंग प्रतिष्ठेचे प्रतिनिधित्व करतो. एखाद्या व्यक्तीचा स्वभाव आवडत असेल तर त्याला हा गुलाब दिला जातो. तू मला आवडतोस, आवडतेस हा संकेत हे गुलाब देतो.७ फेब्रुवारी, रोज डेमन जोडणारे फूल!प्रियकर-प्रेयसीसाठी तसा प्रत्येक दिवस प्रेमाचाच असतो. पण तरीदेखील व्हॅलेंटाइन डेचे एक वेगळे महत्त्व आहे. आपल्या जोडीदाराला या दिवशी फूल दिले तर मग काय बहार येते. प्रेमाची आठवण म्हणून या दिवशी फूल दिले जाते. फुले मन जोडतात.म्हणून तर एखाद्या रूग्णालाही भेटण्यासाठी जाताना फूलच का देतात? फूल देण्यामागचाअर्थ काय? यातून काय संदेश मिळतो? हेजाणून घेऊ आणि आपणही रंगीबेरंगी गुलाबांसोबत व्हॅलेंटाइन डे साजराकरू या.८ फेबु्रवारी : प्रपोज डे : फर्स्ट इम्प्रेशन इज दी लास्ट इम्प्रेशनकाय? तुम्हाला कुणाला प्रपोज करायचंय! मग 'व्हॅलेंटाइन डे' ची वाट बघताय? अरे हो, तो तर जागतिक प्रेम दिन! नाही का? तोपर्यंत थांबलात तर चला ठीक आहे. पण ती तोपर्यंत थांबली पाहिजे ना! अरे घाईघाईत कुठे चाललात? 'प्रपोज' करायला? अरे थांबा थांबा, अभ्यास न करता कुठे देताय परीक्षा! तुम्ही म्हणत असाल, प्रपोज करण्यासाठी अभ्यासाची काय गरज? तुमचा हा अतिउत्साह महागात पडू शकतो. 'उचलली जीभ अन् लावली टाळ्याला' असं प्रेमात करून चालत नाही! प्रत्येक शब्द तोलून मोलून वापरावा लागतो. गोंधळून चालत नाही. 'फर्स्ट इम्प्रेशन इज दी लास्ट इम्प्रेशन' हे तत्त्व लक्षात ठेवा.९ फेब्रुवारी, चॉकलेट दिवस (चॉकलेट डे)काही गोड होऊन जाऊ दे, कारण कोणतेही चांगले काम सुरू करण्यापूर्वी तोंड गोड केले पाहिजे म्हणूनच चॉकलेट डे साजरा केला जात असावा. चॉकलेट डे व्हॅलेंटाइन आठवड्याचा तिसरा दिवस असतो, जो प्रत्येक वर्षी ९ फेब्रुवारीला फारच जुनून आणि आनंदाने सर्व वयाचे लोक खास करून युवा, युगल आणि मित्रांसोबत संपूर्ण जगभरात साजरा करण्यात येतो. चॉकलेट डे सर्वांचा आवडता दिवस असतो. कारण प्रत्येक व्यक्ती आपल्या प्रियजन, मित्र, व्हॅलेंटाइन इत्यादींसोबत चॉकलेटचा डब्बा देणे आणि घेणे पसंत करतो. या देशातील युवा एकमेकांना चॉकलेट देऊन हा दिवस साजरा करतात.१० फेब्रुवारी : टेडी डेजोडपे आणि युवा व्हॅलेंटाइन आठवड्याच्या या सणाला फारच सुंदररीत्या साजरा करतात. या दिवशी लोक आपल्या आवडत्या लोकांना सुंदर टेडी गिफ्ट करून आपल्या प्रेमाची जाणीव करून देतात. आपल्या प्रेमाची जाणीव करून देणारा टेडी आपली बायको, पार्टनर, नवरा आणि इतर आवडीच्या लोकांना देऊ शकतो. तसे तर मुलींना टेडी फार पसंत असतात आणि मुलांना देखील लोक टेडी बिअर गिफ्ट म्हणून देतात.११ फेब्रुवारीला : प्रॉमिस डेप्रेम नेम ही जबाबदारी आणि प्रॉमिसने केला जातो. या दिवशी एक नवीन प्रॉमिस करा आणि जुने प्रॉमिस पूर्ण करण्याचा प्रयत्न करा. या दिवशी आपल्या पार्टनरला तेच प्रॉमिस करा जे तुम्ही पूर्ण करू शकता.१२ फेब्रुवारीला : हग डेप्रेमाने आपल्या आवडत्या व्यक्तीच्या कुशीत सामावून जाणे, याहून अधिक सुख काय असेल. त्याच्या कुशीत सर्व संसाराचे सुख, आनंद, आपुलकी, विश्वास, अतूट बंधन आणि सुरक्षेची भावना येते. परंतु या सर्व भावना व्यक्त होण्यासाठी पार्टनरला हग करण्यापूर्वी या टिप्स अमलात आणाव्या :आधी नजरा मिळवून जरा स्मित करा आणि मग हग करा.हग अधिक टाईट किंवा लूज नसावे.हग अधिक वेळासाठी असावे.आधी स्वत: हग लूज करण्याची पुढाकार घेऊ नये.मुलींनी गळ्यात हात टाकून हग केले पाहिजे.मुलांनी कंबरेत हात टाकून हग केले पाहिजे.१३ फेब्रुवारी : किस डेव्हॅलेंटाइनच्या एक दिवस आधी किस डे येतो. हा डे जगभरात वेगवेगळ्या पद्धतीने साजरा करण्यात येतो. या दिवशी आपल्या जोडीदाराला किंवा ज्या व्यक्तीला तुम्ही प्रेम करता त्याला किस करा. पण हो, त्याच्यासाठी माउथ फ्रेशनर खाणे विसरू नका.१४ फेब्रुवारी : व्हॅलेंटाइन डेआता येतो एक स्पेशल दिवस, ज्या दिवशी तुम्ही तुमच्या प्रियकर किंवा प्रेयसीला आपले प्रेम प्रदर्शित करता. या दिवशी त्यांच्यासोबत वेळ घालवा आणि प्रेमाच्या गोष्टी करा.

टॅग्स :Valentine Weekव्हॅलेंटाईन वीकPuneपुणे