शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

वैष्णवांचा मेळा सराटीत विसावला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 21:35 IST

पंढरपूरकडे वाटचाल करणारा संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखीतील लाखो वैष्णवांचा मेळा मंगळवारी सायंकाळी सराटी गावी नीरा नदीकाठी विसावला. 

ठळक मुद्देपुणे जिल्ह्यातील आजचा हा शेवटचा मुक्काम उद्या सकाळी पालखी सोलापूर जिल्ह्यातील अकलूजमध्ये प्रवेश करणार

बावडा : पांडुरंगदर्शनाच्या ओढीने ज्ञानोबा माऊली तुकारामाचा गजर व विठ्ठलनामाच्या जयघोषात व टाळ-मृदंगाच्या गजरात पंढरपूरकडे वाटचाल करणारा संतश्रेष्ठ तुकाराम महाराज पालखीतील लाखो वैष्णवांचा मेळा मंगळवारी सायंकाळी सराटी गावी नीरा नदीकाठी विसावला. अवघीच तीर्थे घडली, एक वेळा चंद्रभागा डोळा देखिलिया!अवघीच पापे गेली, दिगंतरी वैकुंठपंढरी देखिलिया!! पांडुरंगाच्या भेटीसाठी ओढ लागलेला वैष्णव  विठुनामाचा धावा करीत सराटीत दाखल झाला. त्यावेळी इंदापूर बाजार समितीचे सभापती अप्पासाहेब जगदाळे, पंचायत समितीचे सदस्य प्रदीप जगदाळे, हनुमंतराव कोकाटे, महेश जगदाळे, सरपंच, उपसरपंच, ग्रामसेवक व ग्रामस्थांनी तोफांच्या सलामीत पालखीचे स्वागत केले. त्यानंतर पालखी खांद्यावर वाहून नेऊन मुक्कामी ठिकाणी स्थानापन्न करण्यात आली.यावेळी इंदापूरचे तहसीलदार श्रीकांत पाटील, गटविकास अधिकारी माणिकराव बिचकुले, तालुका वैद्यकीय अधिकारी सारिका पोळ, बावड्याचे वैद्यकीय अधिकारी कपिलकुमार वाघमारे, पोलीस निरीक्षक श्री. पवार, सहायक पोलीस निरीक्षक अजित जाधव आदी उपस्थित होते.पुणे जिल्ह्यातील आजचा हा शेवटचा मुक्काम असून उद्या सकाळी पालखी सोलापूर जिल्ह्यातील अकलूजमध्ये प्रवेश करणार आहे. तत्पूर्वी सकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास तुकारामांच्या पादुकांना नीरा नदीमध्ये स्नान घालण्यात येणार आहे.

टॅग्स :IndapurइंदापूरSant Tukaram Maharaj palkhi Sohalaसंत तुकाराम महाराज पालखी सोहळा