शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
3
"धड भाषणही देता न येणाऱ्या, कुटुंबीयांच्या पुण्याईवर खासदार झालेल्या मुलाने...", काँग्रेसने पार्थ पवारांना सुनावले
4
अर्शदीप सिंग 'या' अभिनेत्रीला करतोय डेट? क्रिकेटरने चेहरा लपवला, पण टॅटूमुळे नेटकऱ्यांनी तिला ओळखलं
5
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
6
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
7
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
8
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
9
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
10
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
11
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
12
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
13
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
14
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
15
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
16
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
17
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
18
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
19
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
20
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
Daily Top 2Weekly Top 5

त्या निवेदनातून माझे नाव वगळा, दुसरे नाव टाका;पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकरांची ऑडिओ क्लिप व्हायरल

By विश्वास मोरे | Updated: May 25, 2025 19:21 IST

या प्रकरणात आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही सुपेकर यांच्याबाबत गंभीर आरोप केले आहेत.

पिंपरी :पिंपरी-चिंचवडमधील वैष्णवी कस्पटे-हगवणे हिच्या आत्महत्या प्रकरणात मामे-सासरे पोलिस महानिरीक्षक जालिंदर सुपेकर यांनी हगवणे कुटुंबास मदत केल्याचा आरोप दोन दिवसांपूर्वी झाला. या घटनेच्या निमित्ताने सुपेकर यांचा आणखी एक कारनामा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उघड केला आहे. त्यांनी माध्यमांसमोर सादर केलेली ऑडिओ क्लिप समाजमाध्यमांवर व्हायरल होत आहे. त्यावर गृहमंत्रालय काय निर्णय घेणार? सुपेकरांची चौकशी होणार का? अशी चर्चा होऊ लागल्या आहेत.

सासरच्या छळाला कंटाळून वैष्णवी हगवणे हिने आपलं आयुष्य संपवले. या प्रकरणात पोलिसांनी वैष्णवीचा पती, दीर, सासरा, नणंद आणि सासू यांना अटक केली आहे. वैष्णवीचा सासरा राजेंद्र हगवणे याची राष्ट्रवादीतून हकालपट्टी केली आहे. या प्रकरणात आता सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनीही सुपेकर यांच्याबाबत गंभीर आरोप केले आहेत.

त्यावर ‘आत्महत्येशी आणि पिस्तूल परवाना देण्यासंदर्भात माझा कोणताही संबंध नाही’, असे सुपेकर यांनी माध्यमांना सांगितले होते. त्यानंतर दमानिया यांनी पत्रकार परिषदेत ‘कारागृह साहित्य खरेदी प्रकरणातून नाव वगळावे,’ या संदर्भातील क्लिप ऐकविली. ‘याची सत्यता मी तपासली नाही, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना ती पाठविली आहे. त्यांनी तपासून कारवाई करावी’, अशी मागणी दमानिया यांनी केली आहे. या आवाजाची पुष्टी ‘लोकमत’नेही केली नाही.

ऑडिओ क्लिपही बनावटमाझे कोणात्यातरी अज्ञात व्यक्तीबरोबर संभाषण असलेली ऑडिओ क्लिप काही माध्यमातून प्रसारित केली जात आहे. याबाबत माझे म्हणणे आहे की, संबंधित ऑडिओ क्लिपही बनावट असून, आमची बदनामी करण्याच्या दृष्टीने हेतुपूर्वक प्रसारित केली जात आहे. त्यामुळे  अशा छेडछाड केलेल्या ऑडिओ क्लिपद्वारे माझी बदनामी करणाऱ्या  संबंधिताविरुद्ध अब्रू नुकसानीचा दावा दाखल करणार आहे.-डॉ. जालिंदर सुपेकर,  विशेष पोलीस महानिरीक्षक (कारागृह सेवा सुधार विभाग, महाराष्ट्र)

टॅग्स :pimpari-chinchwadपिंपरी-चिंचवडMaharashtraमहाराष्ट्रPuneपुणेVaishnavi Hagawane Death Caseवैष्णवी हगवणे