शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाकटात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
4
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
5
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
6
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
7
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
8
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
9
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
10
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
11
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
12
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
13
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
14
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
15
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
16
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
17
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
18
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
19
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
20
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”

शिक्षित, पुढारलेल्या अनेक घरांमध्ये असंख्य वैष्णवींचा श्वास गुदमरतोय

By विश्वास मोरे | Updated: May 31, 2025 12:26 IST

मागील वर्षी छळाच्या २०४ घटना, यावर्षी ७२ घटनांची नोंद; वर्षभरात २१ विवाहित महिलांनी आत्महत्या करून संपविला जीवनप्रवास

पिंपरी : सुधारणेचे, शिक्षणाचे माहेर घर असणाऱ्या पुण्यालगत आणि संत ज्ञानोबा- तुकोबांच्या भूमीची वाटचाल मेट्रो सिटीकडे सुरू आहे. श्रीमंतीचे दर्शन आणि प्रदर्शन घडविण्याची मानसिकता वाढत आहे. वैष्णवी हगवणे आत्महत्येच्या घटनेच्या निमित्ताने छळाच्या विळख्यात सापडलेल्या अगणिक वैष्णवींचा प्रश्न पुढे येत आहे. स्थानिक, शिक्षित, पुढारलेल्या अनेक घराघरांत असंख्य वैष्णवींचा श्वास गुदमरतो आहे. वर्षभरात २१ विवाहित महिलांनी आत्महत्या करून जीवन संपविले आहे. त्यामुळे स्त्री-पुरुष समानता कागदावरच आहे.

गाव ते महानगर आणि आता मेट्रोसिटी, स्मार्ट सिटी असा लौकिक प्राप्त करीत असताना अजूनही नागर संस्कृतीत महिलांना समान वागणूक दिली जात नाही, हे वास्तव आहे. याचे कारण कुटुंबाची विस्कटलेली घडी आणि संपत्तीतून आलेला उन्माद आहे.

जमिनीना भाव आल्याने श्रीमंतीचे दर्शनश्रीमंती वाढल्याने छळवणुकीचे प्रकारही वाढले आहेत. वर्षात छळाच्या घटना २०४ घटना घडल्या आहेत, तर आजपर्यंत ७२ घटनांची नोंद आहे. गेल्या वर्षी विवाहिता आत्महत्येच्या २१ घटना घडल्या. 

शहराची प्रगती झाली मानसिकता तशीचशहराची आर्थिक प्रगती झाली. मात्र, स्थानिकांमध्येच नव्हे तर शिक्षण घेतलेल्यामध्येही पुरुषी मानसिकता तशीच आहे. अजूनही असंख्य घरांत महिलांचा छळ होत आहे. छळले जात आहे. तिला बोलू दिले जात नाही, व्यक्त होऊ दिले जात नाही, पोलिसांच्या दप्तरी त्याची नोंद होत नाही.

खरंच, आपल्या भागातील आजची महिला सबल झाली आहे का? तिला कुटुंबात समानतेची वागणूक दिली जाते का? याबाबत विचार करण्याची गरज आहे. अजूनही चूल आणि मूल या फेऱ्यात महिलांना अडकवले गेले आहे. खरे तर, संस्कृतीमध्ये महिलेला, मातेला देव्हाऱ्यात स्थान आहे. शक्ती देवता आहे. आजच्या युगामध्ये सुनेला मुलीप्रमाणे वागणूक देतो का? दुर्दैवाची बाब म्हणजे आजकाल संपत्ती पाहून लग्न सोहळे आयोजित केले जातात. विवाहबंध संस्कृती आणि संस्कार पाहून करायला हवेत, असे वाटते.- पुरुषोत्तम महाराज पाटील, प्रसिद्ध कीर्तनकार, आळंदी 

टॅग्स :PuneपुणेVaishnavi Hagawane Death Caseवैष्णवी हगवणेMaharashtraमहाराष्ट्रpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड