शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

पिंपरी-चिंचवड पोलिसांना पाहताच उडाली भंबेरी; नीलेश चव्हाण म्हणाला,'साहेब मला अस्वस्थ वाटतंय...'

By नारायण बडगुजर | Updated: June 1, 2025 14:37 IST

त्याने पलायन काळात तीन मोबाइल फोनचा वापर केला आहे. या फोनवरून तो सोशल मीडियाद्वारे या प्रकरणातील माहिती जाणून घेत होता.

पिंपरी : पोलिस आपल्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीत, असे वाटत असल्याने वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणात फरार असलेला नीलेश चव्हाण निश्चिंत होता. मात्र, पोलिसांनी त्याचा ठावठिकाणा शोधून त्याला पकडले. पोलिसांना पाहताच त्याची भंबेरी उडाली. ‘साहेब, मला अस्वस्थ वाटतंय...’ असे त्याने पोलिसांना सांगितले.पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या विविध पथकांकडून नीलेशचा शोध सुरू झाला. गुन्हे शाखा, सायबर पोलिस यांच्यासह बावधन पोलिसही मागावर होते. त्याच्यावर यापूर्वीही काही गुन्हे दाखल आहेत. पोलिसांना चकवा देण्यासाठी विविध क्लृप्त्या वापरल्या. यात मोबाइल फोन बंद ठेवणे, कोणाशीही संपर्क न ठेवणे, सतत ठिकाण बदलत राहणे, असे तो करत होता.

सोशल मीडियावरून घेत होता माहिती

त्याने पलायन काळात तीन मोबाइल फोनचा वापर केला आहे. या फोनवरून तो सोशल मीडियाद्वारे या प्रकरणातील माहिती जाणून घेत होता. त्याच्यावर दाखल गुन्ह्याबाबतही तो माहिती घेण्याचा प्रयत्न करत होता. या प्रकरणाशी संबंधित यू-ट्यूबवरील व्हिडिओ तो पाहत होता.

विमानाने आणले शहरात

नीलेशकडे रोख स्वरूपात असलेली रक्कम तो खर्च करत होता. मात्र, ती जास्त दिवस रहावी म्हणून तो जपून खर्च करत होता. त्यासाठी कमी दर असलेल्या हाॅटेलमध्ये तो राहात होता. पोलिसांनी मुसक्या आवळल्यानंतर अस्वस्थ वाटत असल्यासारखे नीलेशने सांगितले. त्यामुळे पिंपरी-चिंचवड पोलिसांनी त्याला थेट विमानाने शहरात आणले.

नीलेश चव्हाणचा माग कसा काढला?

- २५ मे रोजी दिल्ली ते गोरखपूरदरम्यान नीलेशने खासगी बसने प्रवास केला. तांत्रिक तपासात हे लोकेशन ट्रेस झाले. बसच्या सीसीटीव्हीने यावर शिक्कामोर्तब केले.- गोरखपूरमध्ये जिथे उतरला, त्यापुढे तो कुठे गेला, हे सीसीटीव्हीद्वारे ट्रेस केले.- पुढचे दोन-तीन दिवस शेकडो सीसीटीव्ही तपासल्यानंतर तो नेपाळला गेल्याचे आढळले.- ३० मे रोजी पिंपरी-चिंचवड पोलिस भारत-नेपाळ सीमेवरील उत्तर प्रदेशच्या सोनोली येथे पोहोचले. तेथे त्याच्या मुसक्या आळवल्या.

टॅग्स :Maharashtraमहाराष्ट्रVaishnavi Hagawane Death Caseवैष्णवी हगवणेPuneपुणेpimpari-chinchwadपिंपरी-चिंचवड