शहरं
Join us  
Trending Stories
1
पूर्वनियोजित कट? शशी थरूर यांच्या ताफ्यावर हल्ला; अचानक कार थांबवली, सुरक्षा रक्षकाला मारहाण
2
PPF गुंतवणुकीसाठी ५ तारीख का आहे महत्त्वाची? जाणून घ्या व्याजाचं संपूर्ण गणित, परताव्यावर होतो परिणाम
3
आजचे राशीभविष्य, ०४ एप्रिल २०२६: सर्वत्र लाभ, हरवलेली वस्तू मिळेल; मनासारखा दिवस
4
अरे देवा… कोकण रेल्वे जनशताब्दी, तेजस, कोकणकन्या-मांडवी पनवेलपर्यंतच धावणार; प्रवाशांचे हाल
5
नाशिक हादरले! दिंडोरीत विहिरीत कार कोसळून एकाच कुटुंबातील ९ जणांचा मृत्यू; लहान मुलांचाही समावेश
6
युजवेंद्र चहलच्या मांडीवर बसली तरूणी? IPL 2026 दरम्यान व्हायरल झालेल्या व्हिडिओमुळे खळबळ
7
'रामायणम्'मध्ये रणबीर कपूरचा डबल रोल! प्रभू श्रीरामासोबतच 'या' भूमिकेतही दिसणार अभिनेता
8
पार्थ पवारच्या निवडीत अडचण येत असल्याने 'ते' पत्र मागे घेणार; पटेल आणि तटकरे काहीसे शांत
9
खरातच्या मोबाइलमधून हवाला रॅकेटचे कनेक्शन समोर; सीएकडील पुजेतून समोर आला दुबईचा सराफा व्यापारी
10
सुमारे एक हजार कोटींच्या निविदा रद्द; मुंबईकरांचे हकनाक खर्च होणारे पैसे वाचवल्याचा दावा
11
मध्य रेल्वेवर आज, उद्या खोळंबा; प्रभादेवी पुलासाठी सीएसएमटी-दादर सेवा खंडित
12
टोल प्लाझावर आता 'कॅश'ला 'नो एन्ट्री'! १० एप्रिलपासून व्यवहार पूर्णपणे डिजिटल होणार
13
'लोकांचे प्रश्न घेऊन लढणारा पक्ष अशी प्रतिमा तयार करा': राज ठाकरे
14
युद्ध चिघळले, इराणने पाडले अमेरिकेचे विमान; इस्रायलचे तेहरान, इस्फहान शहरांवर तुफान हल्ले
15
सीबीएसई शाळांमध्ये इयत्ता सहावीपासून त्रिभाषा सूत्राची अंमलबजावणी; या वर्षापासूनच निर्णय लागू
16
श्रेयस अय्यरचं अर्धशतक, पंजाबकडून चेन्नईचा ५ विकेट्सनं पराभव, आयुषच्या मेहनतीवर फेरलं पाणी!
17
अफगाणिस्तानला भूकंपाचा भीषण धक्का; जम्मू-काश्मीर आणि दिल्लीतही जमीन हादरली
18
"ही वृत्ती संपुष्टात आणण्याची शिवसेनेची भूमिका"; अशोक खरातचे एकनाथ शिंदेंना फोनच्या दाव्यावर उदय सामंतांची प्रतिक्रिया
19
इराणने आमचे लढाऊ विमान पाडले, वैमानिकही बेपत्ता; अमेरिकेने दिली कबुली
20
Mumbai Indias: मुंबई इंडियन्सची ताकद वाढली, स्टार ऑलराउंडरची संघात एन्ट्री, दिल्लीविरुद्ध खेळण्याची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

वैष्णवी हगवणे प्रकरणामुळे शस्त्र परवाना वाद गाजला; पोलिसांकडून १४० पिस्तुल परवाने रद्द

By किरण शिंदे | Updated: June 4, 2025 23:20 IST

पिस्तुलाचा परवाना असलेल्या यातील काही व्यक्तीविरोधात गुन्हे दाखल आहेत तर काहींनी नूतनीकरण न केल्यामुळे हे परवाने रद्द करण्यात आलेत

किरण शिंदे

पुणे - वैष्णवी हगवणे मृत्यू प्रकरणातील आरोपी निलेश चव्हाण याचा शस्त्र परवाना सध्या वादात सापडला आहे. गुन्हेगारी पार्श्वभूमी असतानाही निलेश चव्हाणला शस्त्र परवाना मिळालाच कसा असा प्रश्न उपस्थित केला जातोय. गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या या निलेश चव्हाणला शस्त्र परवाना मिळवून देण्यासाठी पोलीस दलातूनच मदत झाली असल्याची कुजबूज सध्या सुरू आहे. त्यामुळे पुणे पोलिसांच्या कारभाराकडे सध्या संशयाने पाहिले जात आहे. असे असतानाच पुणे पोलिसांकडून आता एक महत्त्वाची माहिती समोर आली आहे.

पुणे पोलिसांनी मागील काही दिवसात तब्बल १४० पिस्तुलांचे परवाने रद्द केल्याचे समोर आले आहे. पिस्तुलाचा परवाना असलेल्या यातील काही व्यक्तीविरोधात गुन्हे दाखल आहेत तर काहींनी नूतनीकरण न केल्यामुळे हे परवाने रद्द करण्यात आलेत.  राज्याचे सांस्कृतिक राजधानी आणि विद्येचे माहेरघर अशी खरंतर पुणे शहराची ओळख आहे.  कधीकाळी राहण्यासाठी सर्वाधिक सुरक्षित शहर म्हणूनही पुण्याची ओळख आहे. मात्र आता येथील नागरिकही स्वतःच्या सुरक्षिततेसाठी सतर्क झाले आहेत. कारण मागील काही वर्षात  बंदुकीचा परवाना घेण्यासाठी अनेकांनी पोलिसांकडे अर्ज केले आहेत. स्वतःच्या सुरक्षिततेचे कारण देत अनेकांनी पिस्तूल परवान्यासाठी अर्ज केला आहे. दुसरीकडे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पदभार स्वीकारल्यानंतर पिस्तूल परवाना देण्यासाठी कडक धोरणाची अंमलबजावणी सुरू केली. एकदा तर पुढे पोलिसांनी अवघ्या १९ परवाने दिले आहेत. याउलट अनेक पिस्तूल प्रमाणे रद्द करण्यात आले आहेत. 

अमितेश कुमार यांनी  आयुक्तपदाचा पदभार स्वीकारल्यानंतर य१ जानेवारी २०२४ पासून ३ जून २०२५ पर्यंतच्या कालावधीत ५७२ अर्जांपैकी फक्त २८ अर्जांना परवानगी दिली. तब्बल ४०४ अर्ज नाकारले. त्यात गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या ४३ जणांना दिलेले परवाने रद्द केले, तर नूतनीकरण न केल्यामुळे ९७ परवाने रद्द करण्यात आले. एकूण १४० परवाने रद्द/रद्दबातल केले आहेत. दरम्यान, अनेक अर्जदारांनी ‘स्वसंरक्षणासाठी परवाना हवा’ असे कारण दिले होते. मात्र, पोलिसांनी विनाकारण किंवा किरकोळ कारणांसाठी पिस्तुल परवाना देण्यास नकार दिला.

नवीन पोलीस आयुक्तांनी नाकारलेले परवाने

परवाण्यासाठी दाखल अर्ज नाकारले—४०४

दिलेले परवाने रद्द—४३ (गुन्हे नोंद असल्याने)

परवाना नुतनीकरण न केल्याने--- ९७

नवीन दिलेले परवाने- १९ (१०- वारसा हक्का व ९ स्पोर्ट्समधून मंजूर)

टॅग्स :Vaishnavi Hagawane Death Caseवैष्णवी हगवणेPoliceपोलिस