शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
2
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
3
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
4
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
5
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
6
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
7
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
8
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
9
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
10
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
11
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
12
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
13
जगातून कम्युनिस्ट अन् देशातून काँग्रेस हद्दपार..; गृहमंत्री अमित शाहांची जोरदार टीका
14
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
15
Suzuki Burgman: डिझाईनपासून ते फीचर्सपर्यंत; लोकप्रिय स्कूटर सुझुकी बर्गमॅनमध्ये अनेक बदल, जाणून घ्या किंमत!
16
₹१.४ लाख स्टायफंड अन् नोकरी...; भारतीय विद्यार्थ्यांना जपानमध्ये संशोधनाची मोठी संधी
17
SRH vs LSG : प्रिन्सच्या अप्रतिम इनस्विंगवर ईशान किशन क्लीन बोल्ड! संजीव गोयंका यांचा 'तो' फोटो झाला व्हायरल
18
अमूलने इतिहास रचला! भारतापासून अमेरिका आणि युरोपपर्यंत जबरदस्त मागणी; वार्षिक उलाढाल १ लाख कोटींच्या पार
19
Crime News: २५ वर्षाची महिला, १६ वर्षाचा युवक; इन्स्टाग्रामवर मैत्री, हॉटेलवर बोलावलं आणि...
20
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
Daily Top 2Weekly Top 5

समृद्ध जीवनची मालमत्ता खेरदी-विक्री : वैशाली मोतेवार घ्यायच्या निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2018 02:51 IST

समृद्ध जीवन समूहातील मालमत्ता खेरदी-विक्रीचे निर्णय कंपनीचे सर्वेसर्वा महेश मोतेवार यांची पत्नी वैशाली मोतेवार घेत. कंपीनीच्या आत्तापर्यंत ३६५ मालमत्ता तपासात निष्पन्न झाल्या आहेत. त्याच्या चौकशीसाठी वैशाली यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याचा युक्तिवाद सोमवारी सरकारी पक्षाने केला.

पुणे  - समृद्ध जीवन समूहातील मालमत्ता खेरदी-विक्रीचे निर्णय कंपनीचे सर्वेसर्वा महेश मोतेवार यांची पत्नी वैशाली मोतेवार घेत. कंपीनीच्या आत्तापर्यंत ३६५ मालमत्ता तपासात निष्पन्न झाल्या आहेत. त्याच्या चौकशीसाठी वैशाली यांच्या पोलीस कोठडीत वाढ करण्याचा युक्तिवाद सोमवारी सरकारी पक्षाने केला.दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकून घेऊन विशेष न्यायाधीश आर. एन. सरदेसाई यांनी समृद्ध जीवन फूड्स इंडिया लिमिटेडच्या माध्यमातून विविध योजनांद्वारे ग्राहकांना कोट्यवधी रुपयांचा गंडा घालणाऱ्या वैशाली महेश मोतेवार (वय ४३, रा. पाटीलनगर, धनकवडी) यांच्या पोलीस कोठडीत १२ जुलैपर्यंत वाढ करण्याचा आदेश दिला.वैशाली यांना न्यायालयाने २०१६मध्ये फरारही घोषित केले होते. कंपनीच्या मिळालेल्या अहवालानुसार वैशाली यांना पगार स्वरूपात १ कोटी १० लाख रुपयेदेखील मिळाले आहेत. महेश मोतेवार यांनी मुलगा अभिषेक याला पॉवर आॅफ अ‍ॅटर्नीचे अधिकार दिले असून, आतापर्यंत किती मालमत्तांची विल्हेवाट लावली, याचा तपास करायचा आहे. इलेगन्स इंटरटेन्मेट प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे सुमारे ५ कोटी ते १५ कोटी रुपये किंमत असलेली म्युझिक सिस्टीम विक्री केल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे.संचालक म्हणून कार्यरत असल्यामुळे अपहार केलेल्या पैशांबाबत वैशाली यांच्याकडे तपास करायचा आहे. फरार कालावधीत त्यांनी मालमत्ताविक्रीचाही प्रयत्न केला आहे. त्यामुळे गुन्ह्याचा अधिक तपास करण्यासाठी विशेष सरकारी वकील अ‍ॅड. प्रवीण चव्हाण यांनी वैशाली यांच्या पोलीस कोठडीची मागणी केली.समृद्ध जीवन कंपनीच्या आॅक्टोबर २००९पासून वैशाली या संचालक होत्या. २०१३मध्ये कंपनीच्या त्या दुसºया क्रमांकाच्या शेअरधारक आहेत. त्यांच्या नावावर १७ हजार शेअर असून, हा वाटा एकूण १७.८९ टक्के आहे. व्यवहाराबाबत त्यांची महत्त्वाची भूमिका आहे. कंपनीने ३ हजार ५०० कोटींहून अधिकची फसवणूक केली आहे

टॅग्स :Crimeगुन्हाnewsबातम्या