शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

वैशाली मोतेवारांना अटक; ‘समृद्ध जीवन’ घोटाळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 1, 2018 05:13 IST

ठेवीदारांची कोट्यवधी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात चार वर्षांपासून फरार असलेल्या ‘समृद्ध जीवन’चे सर्वेसर्वा महेश मोतेवार यांच्या पत्नी वैशाली मोतेवार (वय ४३) यांना राज्य गुन्हे अन्वेषणच्या (सीआयडी) पथकाने अखेर शनिवारी अटक केली.

पुणे : ठेवीदारांची कोट्यवधी रूपयांची फसवणूक केल्याप्रकरणी दाखल असलेल्या गुन्ह्यात चार वर्षांपासून फरार असलेल्या ‘समृद्ध जीवन’चे सर्वेसर्वा महेश मोतेवार यांच्या पत्नी वैशाली मोतेवार (वय ४३) यांना राज्य गुन्हे अन्वेषणच्या (सीआयडी) पथकाने अखेर शनिवारी अटक केली.न्यायालयाने त्यांना फरार घोषित केले होते. वैशाली या निगडी येथे नातेवाइकांकडे राहत असल्याची माहिती सीआयडीच्या तपास पथकाला मिळाली होती. त्यानुसार पोलीस अधीक्षक ज्योती क्षीरसागर, उपअधीक्षक टी. वाय मुजावर, पोलीस निरीक्षक अमोल गवळी यांच्या पथकाने त्यांना अटक केली. समृद्ध जीवन कंपनीने गुंतवणुकीच्या आमिषाने देशभरातील ठेवीदारांची साडेतीन हजार कोटी रूपयांची फसवणूक केली आहे. याप्रकरणी २०१४ मध्ये चतु:श्रृंगी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता.समृद्ध जीवन कंपनीविरूद्ध आठ राज्यात फसवणुकीचे २७ गुन्हे दाखल आहेत. या प्रकरणात महेश मोतेवार याच्यासह संचालकांविरूद्ध गुन्हा दाखल झाला होता. वैशाली या कंपनीच्या संचालक होत्या. दरम्यान, मोतेवारची दुसरी पत्नी लीना यांना एका गुन्ह्यात जामीन मंजूर करण्यात आला आहे. मात्र, डेक्कन पोलीस ठाण्यात दाखल असलेल्या दुसऱ्या गुन्ह्यात त्यांना ताब्यात घेण्यात आले आहे. त्यांना २ जुलैपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहे. तर महेश मोतेवार यांचा मुलगा देखील या प्रकरणी कोठडीत आहे.वैशाली यांना रविवारी (१ जुलै) न्यायालयात हजर करण्यात येणार आहे.

टॅग्स :PuneपुणेCrimeगुन्हा