शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी चेकपोस्ट बंद, पाक नागरिकांचे व्हिसा रद्द, ४८ तासात देश सोडण्याचे आदेश; भारताची कठोर भूमिका
2
पहलगाम हल्ल्यातील दहशतवाद्यांची माहिती देणाऱ्यांना 'इतक्या' लाखांचे बक्षीस; काश्मीर पोलिसांची घोषणा
3
पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभे राहिले हे मुस्लीम देश, काय म्हणतोय पाकिस्तान?
4
पहलगाम हल्ल्यानंतर PM मोदींच्या नेतृत्वात CCSची अडीच तास बैठक, पाकिस्तानला मोठा दणका
5
पहलगाम हल्ला: पाकिस्तानी क्रिकेटरनेच काढली पाकिस्तानची लक्तरं, म्हणाला- लाज वाटते...
6
"तू बाहर आ..."; दहशतवाद्यांनी आयत म्हणायला सांगितली, मग व्यावसायिकावर गोळ्या झाडल्या, मुलीनं सांगितला भयावह प्रसंग
7
पहलगाम हल्ल्यानंतर काश्मीरमध्ये मोठी कारवाई; 1500 लोकांना घेतले ताब्यात, चौकशी सुरू...
8
Pahalgam Terror Attack: मॅच आधी खेळाडूंनी दहशतवादी हल्ल्यातील मृत पर्यटकांना वाहिली श्रद्धांजली
9
बिल क्लिंटन भारतात येण्यापूर्वी झाली होती ३६ शीखांची हत्या; २५ वर्षांनी पहलगाममध्येही तेच घडलं
10
Pahalgam Terror Attack : सुट्टी घेऊन अमेरिकेहून काश्मीर फिरण्यासाठी आला अन् दहशतवादी हल्ल्यात जीव गमावला
11
पहलगाम हल्यामुळे काश्मीरच्या अर्थव्यवस्थेला फटका; पर्यटकांनी रद्द केल्या बुकिंग्स...
12
पहलगाम हल्ला: २४ तासांनंतर बांगलादेशची पहिली प्रतिक्रिया आली; मोहम्मद युनूस म्हणाले...
13
कुलगाममध्ये मोठी चकमक सुरु; पहलगाममध्ये हल्ला करणाऱ्या टीआरएफच्या कमांडरला घेरले
14
"निष्पाप भारतीयांना मारणं हाच पाकिस्तानचा राष्ट्रीय खेळ, आता..."; भारतीय क्रिकेटरला राग अनावर
15
“पंतप्रधानांनी खंबीर भूमिका घ्यावी, २६चा बदला २६०ने घेतला पाहिजे”; शिंदेसेनेचे नेते संतापले
16
"हे सरकार हिंदुत्वाबद्दल बोलतंय, त्यामुळे मुस्लिमांना कमकुवत झाल्यासारखं वाटतंय"; 'पहलगाम'बाबत रॉबर्ट वाड्रा यांचं विधान चर्चेत
17
"यांचा सामना कसा करायचा? भारताला चांगलं ठाऊक, आम्हीही सोबत...!"; पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या खास मित्राचं आश्वासन
18
बीडची लेक अन् जावयाची काश्मीरमध्ये पर्यटकांना मदत; दहशतवाद्यांविरोधात आंदोलनही केलं
19
सर्जिकल स्ट्राईकपेक्षा मोठा हल्ला; अजित डोभाल कामाला लागले, पाकिस्तावर मोठी कारवाई होणार?
20
पहलगाम हल्ला: मृतांच्या कुटुंबीयांना ५ लाख रुपयांची मदत देणार; CM देवेंद्र फडणवीसांची घोषणा

वढू बुद्रुकला कडेकोठ पोलीस बंदोबस्त, २७ जणांवर गुन्हा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 31, 2017 02:55 IST

वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे शुक्रवारी (दि. २९) नामफलकावरून झालेल्या वादातून बेकायदा जमाव गोळा करून दमदाटी व शिवीगाळ केल्याप्रकरणी नऊ जणांसह १५ महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर गावात शांतता प्रस्थापित करण्यासाठी तैनात असलेल्या उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश मोरे यांच्या वाहनावर दगडफेक केल्यावरून...

कोरेगाव भीमा : वढू बुद्रुक (ता. शिरूर) येथे शुक्रवारी (दि. २९) नामफलकावरून झालेल्या वादातून बेकायदा जमाव गोळा करून दमदाटी व शिवीगाळ केल्याप्रकरणी नऊ जणांसह १५ महिलांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे, तर गावात शांतता प्रस्थापित करण्यासाठी तैनात असलेल्या उपविभागीय पोलीस अधिकारी गणेश मोरे यांच्या वाहनावर दगडफेक केल्यावरून शासकीय कामात अडथळा आणल्याप्रकरणीही ७ जणांसह इतर २० जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गावातील सर्व दुकाने शनिवारी बंद ठेवण्यात आली होती.याबाबत शिक्रापूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार : रमाकांत विठ्ठल शिवले (वय ४०, रा. वढू बुद्रुक) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून शुक्रवारी (दि. २९) सकाळी अकराच्या सुमारास ग्रामपंचायत शेजारी कोणीतरी संभाजीमहाराज यांच्याविषयी लिहिलेला फ्लेक्स चिकटवला होता. हा फलक गावातील काही व्यक्तींनी वाचल्यानंतर काढून टाकला.या कारणावरून संदीप शंकर गायकवाड, सनी कांबळे, अशोक ऊर्फ पांडा बाळू गायकवाड, बळीराम गायकवाड, निखिल गायकवाड, सचिन बनसोडे, कुमार काळे, संदीप शंकर गायकवाड, शैलेश शंकर गायकवाड (सर्व रा. वढू बुद्रुक ता. शिरूर) व इतर १० ते १५ महिलांनी बेकायदा जमाव गोळा करून फिर्यादीसह सरपंच व इतर ग्रामस्थांना दमदाटी व शिवीगाळ केल्याप्रकरणी वरील व्यक्तींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा तपास सहायक पोलीस निरीक्षक अतुल भोसले करत आहेत.दरम्यान, पोलीस हवालदार पुनाजी जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीवरून वढू बुद्रुक येथे तणाव निर्माण झाल्यानंतर पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. शुक्रवारी (दि. २९) रात्री संभाजीमहाराजांच्या समाधी स्थळासमोर असलेल्या मोकळ्या जागेत दौंडचे उपविभागीय अधिकारी गणेश मोरे यांची सरकारी गाडी उभी केली होती.या वेळी स्वप्निल गायकवाड, निखिल गायकवाड, सचिन बनसोडे, कुमार काळे, पांडुरंग गायकवाड, संदीप गायकवाड, सनी कांबळे, शैलेश गायकवाड व इतर १५ ते २० जणांनी जमाव जमा करीत आरडाओरडा केला. तसेच पोलीस पथकाच्या दिशेने स्वप्निल गायकवाड याने दगड फेकला.यामध्ये उपविभागीय अधिकाºयांच्या गाडीची काच फुटली. आरोपींनी घोषणाबाजी करीत पोलिसांच्या कामात अडथळा आणला व गाडी फोडली, म्हणून पोलिसांनी वरील आरोपींच्याविरोधात सरकारी कामात अडथळा आणला, म्हणून गुन्हा दाखल केला आहे. या घटनेचा तपास पोलीस उपनिरीक्षक गणेश वारुळे करीत आहेत.शनिवारी दिवसभर गावातील दुकाने बंदगोविंद गोपाळ यांच्या समाधीवरील छत व माहितीफलक काढल्याप्रकरणी शुक्रवारी दाखल झालेल्या अ‍ॅट्रॉसिटीच्या गुन्ह्यातील ४९ पैकी ९ जणांना अटक करण्यात आली. शनिवारी दिवसभर गावातील दुकाने बंद ठेवण्यात आली होती. गावामध्ये शांतता प्रस्थापित करण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक रमेश गलांडे, राजेंद्र कुंटे, अमर वाघमोडे यांनी केले. दरम्यान, वढू बुद्रुक येथे शिक्रापूर, शिरूर व रांजणगाव पोलिसांसह राज्य राखीव दल, दंगल नियंत्रक पथक गावामध्ये तैनात करण्यात आले आहे.

टॅग्स :newsबातम्याPoliceपोलिस