शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
4
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
5
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
6
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
7
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
8
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
9
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
10
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
11
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
12
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
13
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
14
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
15
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
16
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
17
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
18
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
19
VIDEO: सूर्याचा 'रहमान डकैत' स्टाईल FA9LA डान्स; Dhurandhar ची क्रेझ क्रिकेटच्या मैदानातही
20
'तू मरून जा, नाही तर तुला मारणार!' आरमोरीत हनी ट्रॅप, ब्लॅकमेलिंग अन् तरुणावर विषप्रयोग, तरुणीसह दोघांवर गुन्हा दाखल 
Daily Top 2Weekly Top 5

व्हॅक्युम क्लिनरमुळे महिलेच्या डोक्याचे केस उपटले, डोक्याला १६५ टाके, मेंदूत झाले पाणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2018 19:44 IST

येथील औद्योगिक कंपनीत काम करताना व्हॅक्युम क्लिनरच्या पंख्याच्या हवेने एका कामगार महिलेच्या डोक्याचे केस उपटून निघाले असून या अपघातात महिलेच्या डोक्याला १६५ टाके पडून गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे

चाकण : येथील औद्योगिक कंपनीत काम करताना व्हॅक्युम क्लिनरच्या पंख्याच्या हवेने एका कामगार महिलेच्या डोक्याचे केस उपटून निघाले असून या अपघातात महिलेच्या डोक्याला १६५ टाके पडून गंभीर जखमी झाल्याची घटना घडली आहे. एक महिन्यापूर्वी घटना घडूनही कंपनीने महिलेवर उपचार करण्यास टाळाटाळ केली. अखेर याप्रकरणी कंपनीतील कामगारांना सुरक्षा विषयक कोणतीही साधने न पुरवता व सुरक्षेच्या दृष्टीने योग्य काळजी न घेतल्या बाबत काल ( दि. ११ ) रात्री दहाच्या नंतर उशिरा कंपनीचा व्यवस्थापक शर्मा, सुपरवायझर व सुरक्षा अधिकाऱ्यावर चाकण पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हि घटना दिनांक ८ डिसेंबर २०१७ रोजी सकाळी ८ वाजण्याच्या सुमारास घडली. चाकण एमआयडीसीतील नाणेकरवाडी ( ता.खेड ) हद्दीत ओ.बी.एस.जी. प्रा. लि. या कंपनीत आठ दिवसांपूर्वी कारखान्यात काम करताना घडली आहे. सीमा विश्वंभर राठोड ( वय २५, रा. यशवंत कॉलनी, नाणेकरवाडी, चाकण, मुळगाव मालेगाव, जि. वाशीम ) असे जखमी झालेल्या कामगार महिलेचे नाव आहे. या घटनेत कामगार महिलेच्या डोक्यावरील पुढील भागातील केस उपटून निघाले आहेत. कंपनीत उपचारासाठी उंबरठे झिजवूनही कंपनीने उपचारास टाळाटाळ केल्याचा आरोप महिलेने केला आहे. जखमी महिलेने कंपनीचे व्यवस्थापक, सुपरवायझर यांनी सुरक्षेची साधने न पुरवता काम करण्यास भाग पाडल्याबद्दल चाकण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.हि महिला कंपनीत कंत्राटदारामार्फत मदतनीस म्हणून काम करीत होती. कंपनीतील चार नंबरचे नट बोल्ट तयार होणाऱ्या यंत्राजवळ सफाईचे झाडूकाम करताना यंत्राजवळील पाईप साफ करण्यासाठी लागणाऱ्या व्हॅक्युम क्लिनरच्या हवेने डोक्याचे केस ओढले गेले. त्यात डोक्यावरचे केस निघून महिला जखमी झाली.  त्यानंतर उपचारासाठी ईएसआय रुग्णालयात उपचार करण्यात आले. त्यानंतर सदर महिलेस चाकण येथील जयहिंद हॉस्पिटल मध्ये अधिक उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. एक महिन्याचा कालावधी लोटल्यामुळे व वेळेवर उपचार न मिळाल्याने संबंधित महिलेच्या मेंदूत पाणी झाले असून शनिवारी प्लास्टिक सर्जन डॉ. वसंत गुळवे  शस्रक्रिया करणार असल्याचे रुग्णालय व्यवस्थापनाने सांगितले आहे. पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार सुभाष पवार पुढील तपास करीत आहेत.