शहरं
Join us  
Trending Stories
1
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
2
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
3
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
4
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
5
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
6
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
7
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
8
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
9
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
10
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
11
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
12
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
13
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
14
महाकुंभमेळ्यातून चर्चेत आलेल्या IIT बाबाने बांधली लगीनगाठ; पत्नी काय करते? जाणून घ्या...
15
IPL 2026: "धोनीनं सांगूनही सीएसकेच्या गोलंदाजांनी त्याच चुका केल्या" आरसीबीविरुद्धच्या पराभवानंतर रायडू भडकला!
16
"IPL मुळे माझं करिअर संपलं, पण..." RCB च्या माजी शिलेदाराचा दावा, २००९ मध्ये तब्बल ७.५ कोटींची लागली होती बोली
17
कच्च्या तेलाबाबत सौदी अरेबियानं घेतला डोकेदुखी वाढवणारा निर्णय; पेट्रोल-डिझेलचे दर भडकणार?
18
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
19
Travel : खिशात फक्त १० हजार? टेन्शन सोडा! भारतातल्या 'या' ७ सुंदर जागांना द्या स्वस्तात भेट
20
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
Daily Top 2Weekly Top 5

Positive News! बारामती शहरात लवकरच सुरू होणार लहान मुलांचे लसीकरण; हॉस्पिटलमध्ये चाचण्यांची तयारी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 8, 2021 15:37 IST

कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक, या पार्श्वभूमीवर लसीकरणाच्या दृष्टीने आता देशभरात चाचण्या सुरु

ठळक मुद्देशहरातील बारामती हॉस्पिटलमध्येही १०० ते १५० मुलांवर या चाचण्या केल्या जाणार, २८ दिवसांच्या कालमयार्देत या मुलांना तीन डोस देण्यात येणार

बारामती: प्रौढांपाठोपाठ किशोरवयीन मुलांचे लसीकरण करण्याची गरज निर्माण झाली आहे. कोरोनाची तिसरी लाट लहान मुलांसाठी घातक असल्याची चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर लसीकरणाच्या दृष्टीने आता देशभरात चाचण्या सुरु झाल्या आहेत. बारामती शहरातील खासगी रुग्णालयाची या चाचण्यांसाठी निवड करण्यात आली आहे. बारामतीत तिस-या टप्प्यातील लसीची चाचणी केली जाणार आहे. येथील डॉक्टरांवर याबाबत प्रमुख जबाबदारी देण्यात आली आहे.

शहरातील बारामती हॉस्पिटलमध्येही १०० ते १५० मुलांवर या चाचण्या केल्या जाणार आहेत. २८ दिवसांच्या कालमयार्देत या मुलांना तीन डोस देण्यात येणार आहेत. त्यानंतर या मुलांमध्ये होणाऱ्या परिणामांचे आरोग्य निरीक्षण नोंदविले जाणार आहे. तसेच या लसीच्या परिणामांचा अभ्यास देखील केला जाणार आहे.

लसीकरण करण्यापूर्वी या मुलांच्या आरटीपीसीआर तपासणी तसेच त्यांच्यातील अँटी बॉडीजच्या तपासण्याही केल्या जाणार आहेत. बारामतीतील बालरोगतज्ज्ञ डॉ. भास्कर जेधे हे या प्रक्रीयेमध्ये प्रिन्सिपल इनव्हेस्टीगेटर म्हणून कार्यरत असतील. एका कंपनीच्या लसीची ही चाचणी होणार आहे. मुलांमध्ये लस देण्यापूर्वी व नंतरचे बदल याबाबतचे निरीक्षण बारकाईने नोंदविले जाणार आहे.

१२ ते १८ वर्षे वयोगटाच्या मुलांच्या लसीकरणाबाबत सध्या चाचण्या सुरु आहेत. बारामती शहरात या चाचण्या होणार आहे. त्या नंतर या मुलांना लसीकरणाबाबतचा अंतिम निर्णय घेतला जाणार आहे. संभाव्य तिसरी लाट व लहान मुलांना होणारा धोक्याच्या चर्चा पाहता पालकांना या लसीची मोठी प्रतिक्षा आहे.

टॅग्स :PuneपुणेBaramatiबारामतीcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसhospitalहॉस्पिटल