शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

उत्तरा-पूर्वा, हस्त नक्षत्रांत पाऊस पडेल

By admin | Updated: February 16, 2017 02:56 IST

यंदा उत्तरा-पूर्वा, हत्तीचा पाऊस चार खंडांत पडेल, जनतेचे समाधानकारक होईल, बाजरीचे पीक येईल, तर गाईगुरे, शेळीमेंढी

खळद : यंदा उत्तरा-पूर्वा, हत्तीचा पाऊस चार खंडांत पडेल, जनतेचे समाधानकारक होईल, बाजरीचे पीक येईल, तर गाईगुरे, शेळीमेंढी यांच्यामागची रोगराई हटेल; पण माणसाला मात्र साधारण रोगराईला सामोरे जावे लागेल, अशी भाकणूक (भविष्यवाणी) आज पंचामीच्या दिवशी श्रीक्षेत्र वीर येथे श्रीनाथ म्हस्कोबा व माता जोगेश्वरी यांच्या वार्षिक यात्रेत देवाचे मानकरी तात्या बुरुंगले यांनी केली. श्रीक्षेत्र वीर येथे शुक्रवार (दि. १०) माघ शु. पौर्णिमेपासून श्रीनाथ म्हस्कोबा व माता जोगेश्वरी यांच्या दहा दिवसांच्या वार्षिक यात्रेला सुरुवात झाली. आजपासून पंचमीच्या दिवशी भाकणुकीला, नवसाचे व कुळाचाराप्रमाणे गज-गोपाळ (जेवण) घालण्यास सुरुवात झाली. तर, उद्यापासून मारामारीपर्यंत तात्या बुरुंगले, दादा बुरुंगले, लक्ष्मण शिंगाडे यांची भाकणूक होईल.आज पहाटे ४ वाजता पूजा होऊन मुख्य गाभारा बंद करण्यात आला. सकाळी ६ वाजता दर्शनासाठी पुन्हा तो खुला करण्यात आला. ११ वाजता विश्रांतीसाठी पुन्हा बंद करण्यात आला. ११.३० वाजता दर्शनासाठी पुन्हा खुला करण्यात आला. एक वाजण्याच्या सुमारास मानाच्या कोडीत, कण्हेरी, राजेवाडी, भोंडवेवाडी, पुणे, वीर, वाई, सोनवडी या पालख्या व २२ काठ्या देऊळवाड्यात आल्या. एका कोपऱ्यात सव्वा महिन्याचा खडा पडेल, एका कोपऱ्यात एक महिन्याचा खडा पडेल, एका कोपऱ्यात पाऊण महिन्याचा खडा पडेल तर एक ा कोपऱ्यात बळीच्या घासाला पुरणार नाही. एका कोपऱ्यात सव्वा शेर उत्पन्न निघेल, एका कोपऱ्यात एक शेर उपन्न निघेल, एका कोपऱ्यात पाऊण शेर उपन्न निघेल. तर, एका कोपऱ्यात दुष्काळ पडेल व ज्याची गादी त्याला मिळेल. गादीचा मालक गादीवर येईल. गाईगुरांना, शेळ्यामेंढ्यांची रोगराई हटेल व मनुष्याच्या मागे मात्र खातापिता आटापिटा राहील, अशी भविष्यवाणी या वेळी करण्यात आली.मंगळवार (दि.२१) माघ वद्य दशमी (मारामारी) हा यात्रेचा शेवटचा मुख्य दिवस आहे. या दिवशी राज्याच्या कानाकोपऱ्यातून लाखो भाविकांची मोठी गर्दी होते. त्या दृष्टीने सर्व तयारी केल्याचे देवस्थानाचे अध्यक्ष बाळासाहेब धुमाळ, सचिव तय्यद मुलाणी, उपाध्यक्ष संभाजी धुमाळ, विश्वस्त दिलीप धुमाळ, मंगेश धुमाळ, ज्ञानेश्वर धुमाळ, नामदेव जाधव, बबन धसाडे, अशोक वचकल, सुभाष समगीर यांनी सांगितले.