शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशात रस्त्यांना छावणीचं स्वरूप, मोहम्मद युनूस यांच्या घराबाहेर मोठा फौज फाटा; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
2
हत्येनंतर शीर अन् धड वेगळे केले, सुटकेसमध्ये मृतदेह लपवून फरार; अखेर १६ वर्षांनी आरोपीला अटक
3
'मी पुन्हा येईन! १४ नोव्हेंबरला विजय निश्चित'; बिहारच्या शेवटच्या सभेतून पंतप्रधान मोदींचा ठाम दावा
4
बँका, पतपेढ्यांमधून निघणारा पैसा निवडणूक आयोगाच्या रडारवर, स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीसाठी तयारी
5
शून्य रुपयांच्या विश्वासावर ३०० कोटींचा व्यवहार, रक्कम कशी केव्हा मिळेल याचा खरेदीखतात उल्लेखच नाही; एसआयटी करणार तपास
6
"मला पुढच्या जन्मी गोविंदा पती म्हणून नकोय...", सुनीता अहुजाचं वक्तव्य चर्चेत, म्हणाली- "हा एकच जन्म..."
7
लोक प्रवाशांच्या जीवावर कोण उठले? सँडहर्स्ट रोड अपघाताची चौकशी जीआरपीकडे
8
ट्रॉलरसह आठ मच्छीमारांचे पाकिस्तानकडून अपहरण?
9
विकृत इसमाने मांजरावर केला अतिप्रसंग; मुंबईतील धक्कादायक घटना
10
आजचे राशीभविष्य,०९ नोव्हेंबर २०२५: कुटुंबीयांशी मतभेद होतील; शक्यतो नवीन कार्याची सुरुवात करु नये
11
केवळ पत्नी रडायची, म्हणून पतीला क्रूरतेसाठी दोषी ठरवू शकत नाही: उच्च न्यायालय
12
संसदेचे हिवाळी अधिवेशन १ ते १९ डिसेंबरदरम्यान
13
आज 'कोंडीवार'; सेंट्रल लोकलने जाणाऱ्यांनो सावधान!
14
आफ्रिकेचे आणखी ८ चित्ते लवकरच येणार भारतात
15
बिहारमध्ये झालेले विक्रमी मतदान कोणाच्या बाजूने? एनडीए आणि महाआघाडीत रस्सीखेच, पहिल्या टप्प्यात ६१.७८% मतदान
16
मनोज जरांगे यांना मुंबई पोलिसांचे समन्स; सोमवारी हजर राहण्याचे निर्देश
17
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना लाभ, ६ राशींना अवघड काळ; उत्तम धनलाभ, पण पैसे उसने देऊ नका!
18
'मेक इन लातूर'; 'वंदे भारत'चा स्लीपर कोच जूनपासून रुळांवर धावणार, देखभाल दुरुस्ती राजस्थानला होणार
19
बिहार निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तेज प्रताप यांना वाय प्लस सुरक्षा, गृह मंत्रालयाने घेतला मोठा निर्णय
20
वादग्रस्त पोस्ट मास्तर जनरल मधाळे निलंबित, अधिनस्थ अधिकाऱ्याचा छळ, चिमटे अन् गुदगुल्या भोवल्या

यूटीटी स्पर्धा : जगातील २४ आॅलिम्पियन खेळाडूंचा स्पर्धेत सहभाग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 13, 2018 02:31 IST

या स्पर्धेत जगातील २४ आॅलिम्पिक खेळाडू सहभागी होणार असल्याची माहिती माजी आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू अर्जुन व छत्रपती पुरस्कार विजेते कमलेश मेहता यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.

पुणे -  ‘टेबल टेनिस फेडरेशन आॅफ इंडिया’च्या मान्यतेने (टीटीएफआय) होत असलेल्या अल्टिमेट टेबल टेनिस स्पर्धेत नुकत्याच गोल्ड कोस्ट येथे झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत निर्विवाद वर्चस्व गाजविलेल्या भारतीय संघातील मनिका बत्रा, मौमा दास, मधुरिका पाटकर, शरथ कमल, अ‍ॅँथनी अमलराज, साथियान गणासेकरन, हरमित देसाई, सनिल शेट्टी, पूजा सहस्रबुद्धे आणि सुतीर्था मुखर्जी यांचा खेळ पाहण्याची संधी पुण्यातील टेबल टेनिस खेळाडू, त्यांचे मार्गदर्शक आणि क्रीडाप्रेमींना मिळणार आहे. या स्पर्धेत जगातील २४ आॅलिम्पिक खेळाडू सहभागी होणार असल्याची माहिती माजी आंतरराष्ट्रीय टेबल टेनिस खेळाडू अर्जुन व छत्रपती पुरस्कार विजेते कमलेश मेहता यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. या वेळी टेबल टेनिस फेडरेशन आॅफ इंडियाचे उपाध्यक्ष व महाराष्ट्र टेटे संघटनेचे अध्यक्ष राजीव बोडस, सरचिटणीस प्रकाश तुळपुळे, क्रीडा समालोचक चारू शर्मा, पराग चितळे, हिरेन मोदी उपस्थित होते.म्हाळुंगे-बालेवाडी येथिल शिवछत्रपती क्रीडा संकुलातील टेबल टेनिस हॉलमध्ये होणाऱ्या या स्पर्धेच्या चषकाचे अनावरण स्पर्धेत सहभागी होणाºया सहा संघांचे कर्णधार अचंता शरथ कमल (वॉरियर्स), गनासेकरन सथियान ( दबंग स्मॅशर्स टीटीसी), लिआम पिचफोर्ड (फाल्कन्स टीटीसी), सिमोन गौझे (एमपावरजी चॅलेंजर्स), हरमित देसाई (आरपी-एसजी मेव्हरिक्स) आणि जाआओ मोंटेरिओ (महाराष्ट्र युनायटेड) यांच्या हस्ते करण्यात आले.या वेळी मेहता म्हणाले, या स्पर्धेचा फॉरमॅट या वेळी बदललेला आहे. नऊऐवजी सात सामन्यांच्या टायचा फॉरमॅट असणार आहे. नवीन फॉरमॅटमुळे भारतीय खेळाडूंना संधी मिळेल व त्यांना यामधून अनुभवदेखील मिळणार आहे. या स्पर्धेतील विजेत्या संघाला एक कोटी रुपयाचे पारितोषिक देण्यात येणार आहे. याचबरोबर उपविजेता संघास ७५ लाख आणि उपांत्य फेरीतील प्रत्येकी संघाला २५ लाख रुपये देण्यात येणार आहेत.या वेळी राजीव बोडस म्हणाले, की या स्पर्धेमुळे राज्यातील टेबल टेनिस खेळणाºया खेळाडूंच्या संख्येत वाढ झाली आहे. या वर्षी विविध राज्य स्पर्धांमध्ये सुमारे सहाशे खेळाडूंनी आपला सहभाग नोंदविला होता. त्यामुळे टेबल टेनिसबाबतची आवड खेळाडूंमध्ये निर्माण झाली आहे. या वेळी प्रकाश तुळपुळे म्हणाले, की भारतीय आणि आंतरराष्टÑीय खेळाडूंचा खेळ पाहण्यासाठी आम्ही राज्यातील जिल्हा संघटनेच्या माध्यमातून त्यांच्या, त्यांच्या जिल्ह्यातील खेळाडूंना पुण्यात आणणार आहे.

टॅग्स :PuneपुणेSportsक्रीडा