शहरं
Join us  
Trending Stories
1
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
2
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
3
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
4
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
5
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
6
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
7
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
8
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
9
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
10
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
11
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
12
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
13
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
14
सावधान! तुमच्या आधार कार्डवर भलत्याच व्यक्तीचं सिम कार्ड? एक चूक आणि थेट पोलीस कोठडी
15
'दृश्यम' पाहून खतरनाक प्लॅनिंग; बायकोनेच घेतला नवऱ्याचा जीव, पण 'QR कोड'मुळे पर्दाफाश
16
Gmail युजर्ससाठी गुड न्यूज! आता हवा तसा बदलता येणार जीमेल आयडी; २२ वर्षांनंतर गुगलचा मोठा निर्णय
17
Suryakumar Yadav Fifty : कॅप्टन्सीची तिसरी संधी! MI चा संघ अडचणीत असताना सूर्याची बॅट तळपली
18
महागड्या क्रीम कशाला? उन्हाळ्यात 'ही' फळं देतील चेहऱ्यावर नॅचरल ग्लो, दिसाल अतिसुंदर
19
Ravindra Erande: खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
20
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
Daily Top 2Weekly Top 5

योगेश समसी यांना उस्ताद मेहबूब खानसाहेब मिरजकर पुरस्कार जाहीर; २३ डिसेंबरला पुण्यात सन्मान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 18, 2017 16:06 IST

संगीत क्षेत्रात आपल्या तबला वादनाने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या कलाकारांना ताल विश्वच्या वतीने गौरविण्यात येते. यावर्षी प्रसिद्ध तबला वादक पं. योगेश समसी यांना ‘उस्ताद मेहबूब खानसाहेब मिरजकर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

ठळक मुद्देतबलावादक पं. योगेश समसी व त्यांचेच शिष्य यशवंत वैष्णव यांची रंगणार जुगलबंदीउस्ताद मोहम्मद हनीफ खान मिरजकर यांच्या तिसऱ्या स्मृतीप्रित्यर्थ ‘संगीत विरासत’

पुणे : संगीत क्षेत्रात आपल्या तबला वादनाने वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या कलाकारांना ताल विश्वच्या वतीने गौरविण्यात येते. यावर्षी प्रसिद्ध तबला वादक पं. योगेश समसी यांना ‘उस्ताद मेहबूब खानसाहेब मिरजकर’ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार असून, ‘संगीत विरासत’ या कार्यक्रमाचे आयोजन २३ डिसेंबर २०१७ रोजी सायंकाळी साडे-पाच वाजता आबासाहेब गरवारे महाविद्यालय हॉल येथे करण्यात आले आहे, अशी माहिती तालविश्वचे नवाझ मिरजकर यांनी पत्रकार परिषदेमध्ये दिली. यावेळी रिजवान मिरजकर, केतन बडवे, श्रीकांत मेस्त्री आदी मान्यवर उपस्थित होते.उस्ताद मेहबूब खानसाहेब मिरजकर यांच्या ५२व्या तर गुरु उस्ताद मोहम्मद हनीफ खान मिरजकर यांच्या तिसऱ्या स्मृतीप्रित्यर्थ ‘तालविश्व’च्या वतीने ‘संगीत विरासत’ या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमात प्रसिद्ध तबलावादक पं. योगेश समसी व त्यांचेच शिष्य यशवंत वैष्णव यांची जुगलबंदी रंगणार आहे तर, पं. शौनक अभिषेकी आपल्या स्वरांनी रसिकांना भिजवणार असून त्यांना नवाझ मिरजकर तबल्यावर साथ देणार आहेत.

टॅग्स :Puneपुणे