शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणला एका रात्रीत नष्ट करू शकतो आणि ती रात्र मंगळवारची रात्रही असू शकते; ट्रम्प यांच्या विधानाने जगात खळबळ
2
इराणच्या सर्वात मोठ्या पेट्रोकेमिकल प्लांटवर हवाई हल्ला; इस्रायलचे संरक्षण मंत्री म्हणाले, पूर्ण ताकदीने हल्ले करणार
3
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
4
सांगली जिल्ह्यात दोन खासदार, नऊ आमदार होतील; चंद्रकांत पाटील यांचे सूचक वक्तव्य 
5
IPL 2026 : PBSK विरुद्धही अजिंक्य रहाणे चुकला! पण पावसाच्या बॅटिंगमुळे वाचला! KKR नं मॅच न जिंकता उघडले खाते
6
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
7
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
8
१,८९८ कोटींची थकबाकी, ‘पीडब्ल्यूडी’ची देणी थकल्याने रस्ते-पूल कामे ठप्प होणार? ठेकेदारांचे कामबंद आंदोलन
9
IPL 2026 : शाहरुख खानची खास झलक! सुहानाचा स्टायलिश लूकही ठरला लक्षवेधी; इथं पाहा व्हिडिओ
10
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
11
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
12
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
13
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
14
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
15
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
16
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
17
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
18
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
19
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
20
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
Daily Top 2Weekly Top 5

विजयस्तंभाला भेट देण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करा : जिल्हाधिकारी नवल किशोर राम

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 14, 2019 19:26 IST

विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे येतात लाखो नागरिक

ठळक मुद्देकोरेगाव-भीमा परिसराला भेट देऊन कामांची केली पाहणीया काळात अहमदनगर येथून येणारी वाहतूक वळविण्यात येणार वाहतूक समस्यांचा घेतला आढावा

पुणे : पेरणे फाटा येथील विजय स्तंभाला १ जानेवारी रोजी भेट देणाऱ्या व्यक्तींनी येथे येण्यासाठी सार्वजनिक वाहतुकीचा वापर करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केले आहे. तसेच, या काळात अहमदनगर येथून येणारी वाहतूक वळविण्यात येणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. विजयस्तंभास अभिवादन करण्यासाठी दरवर्षीप्रमाणे लाखो नागरिक येतात. त्यांना पुरविण्यात येणाऱ्या सोयी-सुविधांची पाहणी जिल्हाधिकारी राम आणि पोलिस अधीक्षक संदीप पाटील यांनी शनिवारी केली. तसेच, ग्रामस्थांसमवेत नियोजन कामांचा आढावा घेतला. प्रशासनाच्या सर्व विभागांचे प्रमुख अधिकारी यावेळी उपस्थित होते.‘अभिवादन कार्यक्रम सुरळीत पार पाडण्यासाठी प्रशासनाच्यावतीने आवश्यक ती सर्व तयारी करण्यात येत आहे. स्थानिक नागरिक, प्रशासन यांच्यामध्ये सकारात्मक भूमिका आहे. सर्व संबंधितांच्या  गाठीभेटी घेण्यात आल्या आहेत. आरोग्य, स्वच्छता, पिण्याचे पाणी, वैद्यकीय सेवा यांचे नियोजन उत्तम पद्धतीने करण्यात येत आहे. गतवर्षी विजयस्तंभ कार्यक्रमास नागरिकांनी सहकार्य केल्यामुळे कार्यक्रम सुरळीत पार पडला. यावर्षी देखील त्याच धर्तीवर नियोजन करण्यात आले आहे. नागरिकांनी समाज माध्यमांवर समाजविघातक संदेश आल्यास त्याकडे दुर्लक्ष करावे. कोणत्याही प्रकारच्या अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन जिल्हाधिकारी राम यांनी केले.पोलिस अधीक्षक पाटील म्हणाले, समाज माध्यमांवर पोलीस यंत्रणा विशेष लक्ष ठेवणार आहे. सर्वांच्या सहकार्याने अभिवादन कार्यक्रम शांततेत पार पडेल. -------------वाहतूक समस्यांचा घेतला आढावावाघोली येथील सातत्याने होणाऱ्या वाहतूक कोंडीवर मार्ग काढण्याची सूचना जिल्हाधिकारी नवल किशोर राम यांनी केली. तसेच, पुणे-अहमदनगर मार्गावरील कामांची पाहणीही त्यांनी केली. रखडलेली कामा मुदतीत पूर्ण करण्याची सूचना त्यांनी सार्वजनिक बांधकाम विभाग आणि पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना केली. पोलीस अधीक्षक संदीप पाटील, आमदार अशोक पवार, सरपंच वसुंधरा उबाळे, पीएमआरडीएचे नगररचनाकार विवेक खरवडकर या वेळी उपस्थित होते. ग्रामस्थांनीही बायपास, कचरा आणि वाहतुकीच्या संदर्भात भेडसावणाऱ्या समस्यांची माहिती दिली. --------

टॅग्स :Bhima-koregaonकोरेगाव-भीमा हिंसाचारNavalkishor Ramनवलकिशोर रामTrafficवाहतूक कोंडी