शहरं
Join us  
Trending Stories
1
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
2
Mumbai Rain: मुंबईत उद्या अतिवृष्टीचा इशारा; कामाशिवाय घराबाहेर पडू नका, BMC च्या सूचना
3
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
4
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
5
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
6
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
7
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
8
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
9
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले
10
“आई कृपा कर, सरकारला बुद्धी दे!”; बाळासाहेब थोरातांचे मोहटादेवी चरणी साकडे, नुकसानीची पाहणी
11
“सोनू सूद पंजाबच्या मदतीला धावला, मराठी कलावंतांनी मराठवाड्याला मदत करावी”: अमोल मिटकरी
12
“भाजपाला प्रशासन चालवता येत नाही, CM सहायता फंडाबाबत फडणवीसांनी बोलू नये”; ठाकरेंचा पलटवार
13
महाराष्ट्रावर प्रचंड मोठे संकट असताना पंतप्रधान का फिरकले नाहीत? काँग्रेसचा सवाल
14
कंटाळा आला म्हणून मुलींनी मागवले ऑनलाइन जेवण; मद्यधुंद आईला राग अनावर, लेकींना बेदम मारहाण
15
३० सेकंदात रुग्णवाहिका तिथून निघून गेली; आरोपी गगनप्रीत कौरला जामीन मंजूर, कोर्टाने काय म्हटले?
16
१ ऑक्टोबरपासून लागू होणार ट्रेन तिकीट बुकींगचा नवा नियम, झटपट आटोपून घ्या हे काम, अन्यथा...
17
“पूरग्रस्तांचे संसार पुन्हा उभे करण्यासाठी सर्वस्व पणाला लावू”; अजित पवारांचा VCद्वारे संवाद
18
नवरात्रात सोनं खरेदी करणं झालं अवघड! सर्वकालीन उच्चांकी पातळीच्या अगदी जवळ जाऊन पोहोचलं; चेक करा 'लेटेस्ट रेट'
19
“PM केअर फंडात महाराष्ट्राचाही पैसा, ५० हजार कोटींची मदत जाहीर करावी”; उद्धव ठाकरेंची मागणी
20
“संकट आले तेव्हा आम्ही पंचांग काढून बसलो नाही, सरकारने सरसकट कर्जमाफी द्यावी”: उद्धव ठाकरे

मास्कचा योग्य वापर करा अन‌् संसर्गजन्य आजारांना दूर ठेवा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 26, 2021 04:09 IST

हवामानातील बदल, पावसाळ्यात हवेतील आर्द्रता, विविध विषाणूचा प्रादुर्भाव यामुळे दरवर्षी जून महिन्यात सर्दी, खोकला, डोकेदुखी, ताप, अंगदुखी, अशक्तपणा अशा ...

हवामानातील बदल, पावसाळ्यात हवेतील आर्द्रता, विविध विषाणूचा प्रादुर्भाव यामुळे दरवर्षी जून महिन्यात सर्दी, खोकला, डोकेदुखी, ताप, अंगदुखी, अशक्तपणा अशा तब्येतीच्या तक्रारी उद‌्भवू लागतात. त्यामुळे डॉक्टरांकडे येणाऱ्या रुग्णांचे प्रमाणही या काळात वाढते. बाह्यरुग्ण विभागात रुग्णांची मोठ्या प्रमाणात गर्दी पहायला मिळते. यंदा मात्र रुग्णांचे प्रमाण कमी झाले असल्याचे डॉक्टरांचे म्हणणे आहे. मास्कचा वापर आजारांचे प्रमाण कमी करण्यास कारणीभूत ठरत आहे.

जनरल फिजिशियन डॉ. नलिनी भोसले म्हणाल्या, ''मास्कचा वापर हा आपल्या जीवनशैलीचा अविभाज्य भाग झाला आहे. लोकांनाही मास्कच्या वापराचे फायदे आणि महत्व बऱ्यापैकी समजले आहे. कोणत्याही विषाणूचा शरीरात शिरकाव सर्वसाधारणपणे नाक किंवा तोंडातून येतो. एखाद्या आजाराचा प्रादुर्भावही खोकला, शिंक, थुंकी इत्यादी माध्यमातून होतो. मास्कच्या वापरामुळे तोंड आणि नाक कायम झाकलेले राहत आहे. त्यामुळे धूलिकण अथवा विषाणू कमी प्रमाणात शरीरात प्रवेश करतात. म्हणूनच कोरोना काळात इतर संसर्गजन्य आजारांचे रुग्ण कमी प्रमाणात पहायला मिळत आहेत. भारतासारख्या कोट्यावधी लोकसंख्या असलेल्या देशात सोशल डिस्टन्सिंग काटेकोरपणे पाळले जात नाही. अशा परिस्थितीत किमान दर्जेदार मास्कचा योग्य वापर अत्यंत आवश्यक आहे.''

''कोरोनाच्या भीतीने नागरिकांच्या आहारशैलीत, जीवनशैलीतही बदल झाला आहे. व्यायाम आणि आहाराच्या माध्यमातून आरोग्य उत्तम राखण्याकडे लोकांचा कल दिसून येत आहे. त्यामुळे रोगप्रतिकारकशक्ती वाढण्यास मदत झाली आहे. आयुर्वेदिक उपायांचा घरोघरी नियमितपणे अवलंब केला जात आहे. त्यामुळेही दर वर्षीच्या तुलनेत यंदा संसर्गजन्य आजारांच्या तक्रारी कमी प्रमाणात पाहायला मिळत आहेत. लोकांनी कोरोनाची साथ ओसरली आहे, या भ्रमात न राहता मास्क, सोशल डिस्टन्सिंग, सॅनिटायझर या नियमांचे कायमस्वरूपी पालन करायला हवे, असे आवाहन कन्सलटिंग फिजिशियन डॉ. अनिकेत देशपांडे यांनी केले.

----

कसा वापरावा मास्क ?

- दररोजच्या वापरातला मास्क किमान तीन पदरी आणि जास्तीत जास्त पाच पदरी असावा.

- आपल्याकडे अनेक लोकांना अद्याप मास्क वापरण्याचे तंत्र कळलेले नाही. अनेकदा लोक एकटे असताना, एकट्याने प्रवास करताना नाक आणि तोंड झाकले जाईल अशा योग्य पद्धतीने मास्क वापरतात. मात्र दुकानात गेल्यावर अथवा कोणालाही भेटल्यावर तोंडावरचा मास्क हनुवटीवर घेऊन बोलायला सुरुवात करतात. अशाने कोरोनाच्या संसर्गाची शक्यता वाढते.

- मास्कने कायम आपले नाक आणि तोंड पूर्ण झाकलेले असले पाहिजे. मास्कचा दर्जाही चांगल्या पद्धतीचा असावा.

- दोन मास्क वापरताना एक नाका-तोंडावर आणि दुसरा हनुवटीवर अशा पद्धतीने घातलेला असेल तर त्याचा काहीही उपयोग होणार नाही.

- सर्जिकल मास्क आणि एन नाईंटी फाईव्ह मास्क वापरण्याने बराच फायदा होतो. खूप गर्दी असलेल्या ठिकाणी जाताना दुहेरी मास्क वापरणे बंधनकारक मानले पाहिजे.

- एकमेकांच्या संपर्कात येणाऱ्या दोन व्यक्तींपैकी एकाने मास्क लावला नसेल तरीही संसर्गाचा धोका वाढतो. याउलट दोन्ही व्यक्तींनी दुहेरी मास्क लावले असतील तर संसर्गाची शक्यता अनेक पटींनी कमी होते.