शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
7
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
8
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
9
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
10
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
11
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
12
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
13
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
14
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
15
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
16
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
17
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
18
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
19
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
20
Fastest Delivery In IPL 2026 : भारताची नवी स्पीडगन! Ashok Sharma चा १५४.२ kmph वेग, Nortje चा रेकॉर्ड मोडला
Daily Top 2Weekly Top 5

लॉकडाऊनबाबत शासकीय आदेश देताना इंग्रजी भाषेचा वापर; शिस्तभंगाच्या कारवाईची राज्यपालांकडे मागणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 29, 2020 22:21 IST

राज्य शासनाची सर्व कार्यालयांमार्फत सर्वसामान्य जनतेशी करण्यात येणारे सर्व पत्रव्यवहार व इतर कार्यालयीन कामकाज मराठी भाषेतून करणे अनिवार्य आहे.

बारामती : लॉकडाऊन चे आदेश देताना मराठी भाषेचा वापर टाळण्यात आल्याची तक्रार करण्यात आली आहे. याप्रकरणी राज्य शासनाचे नियम पाळण्याबाबत उदासिनता दाखवल्याबद्दल मुख्य सचिव मेहता यांच्यावर शिस्तभंगाची कारवाई करण्याची मागणी येथील अखिल भारतीय ग्राहक संरक्षण परिषदेचे सद्स्य अ‍ॅड. तुषार झेंंडेपाटील यांनी केली आहे.

याप्रकरणी राज्यपाल कोश्यारी यांच्याकडे राज्याचे मुख्य सचिव अजोय मेहता यांनी शासन निर्णयाचे पालन करण्यात कसूर केल्याची तक्रार करीत शिस्तभंग विषयक कारवाई करण्याची मागणी अ‍ॅड. झेंडे पाटील यांनी केली आहे.

महाराष्ट्र राजभाषा अधिनियम,१९६४ अनव्ये दि.२६ जानेवारी १९६५ पासूनमहाराष्ट्र राज्याची राजभाषा ही देवनागरी लिपीतील मराठी भाषा आहे.शासनव्यवहारात राजभाषा मराठीचा वापर करण्याबाबत उपरोक्त संदर्भीय शासन निर्णयक्र.(१) अन्वये राज्य शासनाची सर्व कार्यालये यांचेमार्फत सर्वसामान्य जनतेशी करण्यात येणारे सर्व पत्रव्यवहार व इतर कार्यालयीन कामकाज मराठी भाषेतून करणे अनिवार्य असताना देखील मुख्य सचिव मेहता यांनी लॉकडाउन चेआदेश इंग्रजी भाषेतून काढले आहेत. तसेच संबंधित आदेश/ पत्र हे संदर्भीय शासन निर्णयानुसार शासकीय पत्राचा नमुना, बोधचिन्ह व घोषवाक्य नमुना - अ चे देखील उल्लंघन करणारे आहे. राज्याचे मुख्य सचिव शासन निर्णयाचे पालन करण्यात कसूर करीत असतील तर ही खेदाची बाब आहे. याबाबत आपण मुख्य सचिव यांना लेखी ताकीद देण्यात यावी,  शिस्तभंग विषयक कारवाई करावी,अशी मागणी करण्यात आली आहे.

टॅग्स :BaramatiबारामतीState Governmentराज्य सरकारadvocateवकिलbhagat singh koshyariभगत सिंह कोश्यारीmarathiमराठी