शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्तृत्वशून्य लोकांकडूनच जाती-धर्माच्या नावे राजकारण केले जाते: नितीन गडकरींचा टोला
2
अजित पवार गटाच्या आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाचा भिवंडीजवळ महामार्गवरील अपघातात मृत्यू
3
कोलकाता नाईट रायडर्स अव्वल स्थानी! LSG ला नमवून प्ले ऑफची जागा जवळपास केली पक्की 
4
रक्तानं आपलं चित्र रेखाटणाऱ्या कलाकाराचं आधी फडणवीसांकडून कौतुक अन् नंतर दिला प्रेमळ सल्ला!
5
निवडणूक रोख्यांमुळे पंतप्रधान कार्यालय वसुलीचे कार्यालय बनल्याचे स्पष्ट- प्रकाश आंबेडकर
6
महायुतीचे उमेदवार उज्ज्वल निकम यांच्यासाठी मुलगा अनिकेत निकम यांचा घरोघरी जाऊन प्रचार
7
लोकसभा निवडणुकीतील तिसऱ्या टप्प्याचे मतदान जवळ येताच सोशल मीडियावर रायगड पोलिसांची करडी नजर
8
डॉक्टर प्रविण अग्रवाल विरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल; रुग्ण महिलेसोबत अश्लील वर्तनाचा आरोप
9
अपघात की..? वांद्रे येथे नारळाचे झाड अचानक कोसळले! रिक्षाचालक जखमी, दुकानही जमीनदोस्त
10
मागील दोन महिन्यात झपाट्याने वाढलेल्या सोने-चांदीच्या किंमती घसरल्या, जाणून घ्या भाव
11
ठाण्यात अजब घटना! धक्का लागल्याचा जाब विचारल्याने मद्यपीचा वृद्धावर चाकूने हल्ला
12
धक्कादायक घटना! दहा लाखांमध्ये घराचे आमिष दाखवून एक कोटी ४८ लाखांची फसवणूक
13
Sharad Pawar Health Update: शरद पवारांचे उद्याचे सर्व कार्यक्रम, सभा रद्द! घसा बसला, प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
14
दारूची वाहतूक अन् वाटपावर 'एक्साईज'ची करडी नजर; रात्रंदिवस सोलापुरात पथके राहणार तैनात
15
ठाणे जिल्ह्यातील निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी गांभीर्यपूर्वक काम करण्याचे अधिकाऱ्यांना धडे
16
कर्तव्यावर असलेले पोलीस अंमलदार ३८ वर्षीय बाळासाहेब नंदुर्गे यांचा पिंपरीत हृदविकाराने मृत्यू
17
रामललाचे दर्शन घेऊन पंतप्रधान नरेंद्र मोदींचा अयोध्येत रोड शो! रॅलीला आला मोठा जनसमुदाय
18
सोलापुरात भाजपा, काँग्रेस, बसपाच्या  प्रचाराबद्दल आचारसंहिता भंगचे गुन्हे 
19
अजितदादांना वेळ मिळाला, प्रचार फिरवला, 'अजेंडा' दिला; 'सुनेत्रा वहिनीं'ना फायदा होणार?
20
युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्की यांचा रशियाच्या Most Wanted यादीत समावेश; अहवालात करण्यात आलाय दावा

कृत्रिम बुद्धिमत्तेचा व्हावा ‘इंटिलिजंट’ वापर- नंदन नीलेकणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 02, 2019 2:46 AM

एचके फिरोदिया फाउंडेशनतर्फे पुरस्कार वितरण

पुणे : कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे रोजगारनिर्मितीवर विपरीत परिणाम होत आहे. स्वयंचलित तंत्रज्ञानामुळे नोकऱ्यांचे प्रमाण कमी होत आहे. डिजिटल युगात कृत्रिम बुद्धिमत्तेचा सकारात्मकतेने वापर व्हायला हवा. छोट्या कंपन्या, लघुद्योजक एकत्र येऊन रोजगारनिर्मितीला हातभार लावू शकतात आणि तरुणांचे भवितव्य उज्ज्वल राहू शकते, असा आशावाद इन्फोसिसचे सहसंस्थापक डॉ. नंदन नीलेकणी यांनी व्यक्त केला.एचके फिरोदिया मेमोरियल फाउंडेशनतर्फे टीआयएफआरचे संचालक प्रा. संदीप त्रिवेदी यांना विज्ञानरत्न पुरस्काराने गौरविण्यात आले. नॅशनल सेंटर फॉर बायोलॉजिकल सायन्सेस अँड इन्स्टेमचे संचालक प्रा. सत्यजित मेयर यांना विज्ञानभूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. इन्फोसिसचे सहसंस्थापक आणि संचालक नंदन नीलेकणी यांच्या हस्ते पुरस्कार सोहळा पार पडला. नीलेकणी यांना जीवनगौैरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी ज्येष्ठ शास्त्रज्ञ गोविंद स्वरूप, डॉ. रघुनाथ माशेलकर, ज्येष्ठ उद्योजक अरुण फिरोदिया, जयश्री फिरोदिया उपस्थित होते.माशेलकर म्हणाले, ‘‘स्पर्धेच्या युगात अडथळे आले तरी ते पार करण्याची तयारी, मेहनत, जिद्द असायला हवी. झटपट यशाला काहीच महत्त्व नसते. प्रयत्नांमध्ये सातत्य असायला हवे. भारतात तंत्रज्ञान युगात क्रांती घडत आहे. करिअरच्या संधी इतर देशांपेक्षा भारतात मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहेत. तरुणांनी आपल्या क्षमतेचा, हुशारीचा वापर करून उज्ज्वल भविष्यासाठी झटायला हवे.’’ प्रा. संदीप त्रिवेदी म्हणाले, ‘‘कोणतीही गोष्ट सखोल पद्धतीने जाणून घ्यायला हवी, हे वडिलांनी शिकविले. क्वाँटम फिजिक्स हा क्लिष्ट विषय असला तरी त्या क्षेत्रात तरुणांना खूप मोठ्या संधी उपलब्ध आहेत. तरुणांनी स्वत:च्या आणि देशाच्या प्रगतीसाठी झटले पाहिजे.’’सत्यजित मेयर म्हणाले, ‘‘जीवशास्त्र हे या शतकाचे विज्ञान आहे. जीवनाचे विविध टप्पे आपण कशा प्रकारे जाणून घेतो, यावर आपले भविष्य अवलंबून आहे. या क्षेत्रात तरुणांना खूप मोठ्या संधी उपलब्ध आहेत. जिनोमचे स्वरूप समजून घेण्यासाठी मोठ्या माहितीचा खजिना आपल्याकडे उपलब्ध झाला आहे. त्याचा वापर आपण कसा करतो, यावर भविष्यातील यशापयश अवलंबून आहे. सध्याच्या काळात रसायनशास्त्र, भौतिकशास्त्र आणि गणिताचा उपयोग करून जीवशास्त्र नेमकेपणाने समजून घेता येते. स्टेम सेल तंत्रज्ञान सध्याच्या काळात खूप चर्चिले जात आहे. यामध्ये संशोधनाला व्यापक वाव आहे.’’

टॅग्स :Artificial Intelligenceआर्टिफिशिअल इंटेलिजन्सNandan Nilekaniनंदन निलेकणी