शहरं
Join us  
Trending Stories
1
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
2
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
3
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
4
करोडपती होण्याचा 'सुपर हिट' फॉर्म्युला! १०X१२X३० च्या जोरावर उभा करा ३ कोटींचा फंड; निवृत्तीचे नो टेन्शन
5
SRH vs LSG : २६ धावांवर ४ विकेट्स! संघ अडचणीत असताना नितीशकुमार रेड्डी अन् हेन्री क्लासेन जोडीनं दाखवला क्लास अन्...
6
VIDEO: पायलटला वाचवण्यासाठी आलेले अमेरिकेचे विमान पाडले; इराणचा मोठा दावा
7
अचानक अकाशातून कोसळली वीज, क्षणात संपूर्ण गाव जळून खाक, माय-लेकीचा दुर्दैवी मृत्यू!
8
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
9
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
10
Video: ढोल-ताशावर डान्स, लोकांना लाडू वाटले; घटस्फोटानंतर मुलीचं वडिलांनी असं केलं स्वागत
11
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
12
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
13
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
14
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
15
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
16
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
17
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
18
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
19
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
20
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
Daily Top 2Weekly Top 5

उरुळीत आमदाराकडून खासगी रुग्णालयाला सहकार्य, दिले ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 30, 2021 18:07 IST

सध्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची कमतरता

ठळक मुद्देहातभार लावण्याच्या दृष्टीने दिली ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर सारखी आधुनिक उपकरणे

उरुळी कांचन: कोरोना संसर्गाच्या महामारीपासून सर्वसामान्य जनतेला वाचवण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नांची पराकाष्ठा करत आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज उरुळी कांचन परिसरातील खासगी हॉस्पिटलला आमदार अशोक पवार यांनी तीन ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर भेट दिले आहेत. रुग्णालयाने याचा वापर गोरगरीब जनतेसाठी करण्यात यावा. असे त्यांनी यावेळी सांगितले आहे.                     सद्यस्थितीत ऑक्सिजनची कमतरता भासत आहे. त्याला पर्याय म्हणून हवेतील ऑक्सिजन शोषून घेऊन तो रुग्णाला पाच लिटर ताशी क्षमतेनेे पुरवठा करता येणारे ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर मिळवण्यात आले आहे.  औद्योगिक वसाहतीमधील कंपन्यांच्या सी.एस.आर फंडातून त्याचे वितरण जिल्ह्यातील वेगवेगळ्या रुग्णालयांना करण्यात येत आहे. याचा एक भाग म्हणून आज उरुळी कांचन येथील सिद्धिविनायक हॉस्पिटलला आमदार अशोक पवार यांच्या हस्ते २ ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर व लोणी काळभोर येथील सुयश हॉस्पिटलला एक ऑक्सिजन कॉन्सनट्रेटर देण्यात आला आहे. याप्रसंगी हवेलीचे उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर , शिरूरचे उपविभागीय अधिकारी सुभाषकुमार देशमुख, हवेलीचे अप्पर तहसीलदार विजयकुमार चोबे, वाघोलीचे मंडलाधिकारी किशोर शिंगोटे आदी उपस्थित होते.                    पवार म्हणाले की, सध्या रुग्णालयांमध्ये ऑक्सिजनची सातत्याने कमतरता भासत असून प्रशासन ही कमतरता दूर करण्याचा प्रयत्न करीत आहे. परंतु ऑक्सिजन निर्मितीसाठी लागणारा कच्चा माल मागणीप्रमाणे मिळत नाही. तसेच ऑक्सिजन निर्मिती करणाऱ्या प्लांटची क्षमता कमी असल्याने गरजेइतका ऑक्सिजन उत्पादन होत नाही. त्यामुळे उत्पादित होणाऱ्या ऑक्सिजनचे वाटप करताना प्रशासनाला नको इतका ताण घ्यावा लागत आहे, त्याला थोडा हातभार लावण्याच्या दृष्टीने अशा प्रकारची आधुनिक उपकरणे भेट देऊन रुग्णालयांना दिलासा देण्याचा प्रयत्न केला जात आहे. 

टॅग्स :Puneपुणेuruli kanchanउरुळी कांचनcorona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसhospitalहॉस्पिटल