शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
2
नेपाळमध्ये इंधनाचा हाहाकार! आठवड्यातून २ दिवस सुट्टी जाहीर; युद्धामुळे पुरवठा साखळी विस्कळीत!
3
"विनम्र रहा आणि...", इराणने स्वत: होर्मुझ संकटावर सांगितला उपाय; अमेरिकेला दिला इशारा
4
४८ तासांचा अल्टिमेटम, ९३० किमी रेंज असणाऱ्या JASSM-ER मिसाइल सज्ज; अमेरिका इराणमध्ये गेम बदलणार?
5
इराणचा खळबळजनक दावा! अमेरिकेची १ नव्हे ४ विमाने पाडली; ट्रम्पना रेस्क्यू मिशन कितीला पडले...
6
₹६.२५ लाखांच्या कारचा धुमाकूळ...! ५-स्टार सेफ्टी अन् ३३ किमी मायलेज, विक्रीत ठरली नंबर-१
7
IPL 2026 : Ex टीम विरुद्ध मोहम्मद शमीचा रुबाब! अभिषेक शर्मासह टॅविस हेडचा अचूक टप्प्यावर ‘करेक्ट कार्यक्रम’
8
अजितदादांच्या अपघाताचा ‘तो’ रिपोर्ट मान्य नाही; चौकशीवर सुनील तटकरे यांनी व्यक्त केला असंतोष
9
CNG Car: देशातील सर्वात परवडणारी सीएनजी कार, क्रॅश टेस्टमध्ये मिळाले ५ स्टार सेफ्टी रेटिंग!
10
कच्च्या तेलाची शंभरी, पण भारतात 'जैसे थे' दर! सरकारी तेल कंपन्यांची तोटा भरून काढण्यासाठी नवी रणनीती
11
खरातचे सीडीआर बाहेर आलेच कसे? कोणाला टार्गेट करण्यासाठी हे सर्व सुरू आहे?"; शशिकांत शिंदेंचे गंभीर आरोप
12
बारामतीत उमेदवार देणार का? शरद पवारांसोबत काय चर्चा झाली?; शशिकांत शिंदेंनी सगळे सांगितले
13
युद्धातून ट्रम्प पुत्रांची मोठी कमाई? इराणच्या भीतीचा फायदा घेत खाडी देशांना ड्रोन्स विकल्याचा आरोप
14
'नवरत्न' होण्याच्या दिशेने हिंदुस्तान कॉपरची मोठी झेप! 'हा' दर्जा मिळाल्यानंतर नेमकं काय होतं?
15
BSNL ग्राहकांसोबत मोठा गेम खेळली; रिचार्ज वाढविले नाही, हळूच प्लॅनची व्हॅलिडिटी कमी केली
16
“अशोक खरात विकृत, जलदगती न्यायालयात प्रकरण चालवून फाशी द्या”; सुनील तटकरेंनी केली मोठी मागणी
17
Gold Price Today: महिनाभरात सोन्याच्या दरात 26293 रुपयांची घट, चांदी 36393 रुपयांनी घसरली; पटापट चेक करा लेटेस्ट रेट
18
इराणपेक्षा हा अरब देशच जास्त होरपळतोय; वीज, पाणी अन् ऑईल डेपो, सरकारी इमारतीही नेस्तनाभूत...
19
देशात वादळी वाऱ्यासह मुसळधार पावसाचा इशारा; कोणकोणत्या राज्यांना हवामान खात्याने दिला अलर्ट?
20
भारतीय वायुसेना आणखी मजबूत होणार; १,००० किलो वजनी बॉम्ब खरेदी करण्यास सरकारची मंजुरी
Daily Top 2Weekly Top 5

उरुळी कांचन ग्रामपंचायत : सरपंचावरील अविश्वास ठराव मंजूर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 8, 2018 00:47 IST

उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या इतिहासात पहिल्यांदाच सरपंचावर अविश्वास ठराव मंजूर झाला आहे. १७ सदस्यीय ग्रामपंचायतीत सरपंच अश्विनी राजेंद्र कांचन यांच्या विरोधात दाखल झालेला अविश्वास ठराव १४-० अशा फरकाने मंजूर झाल्याची माहिती पीठासीन अधिकारी तथा हवेलीचे तहसीलदार प्रशांत पिसाळ यांनी दिली.

उरुळी कांचन - उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या इतिहासात पहिल्यांदाच सरपंचावर अविश्वास ठराव मंजूर झाला आहे. १७ सदस्यीय ग्रामपंचायतीत सरपंच अश्विनी राजेंद्र कांचन यांच्या विरोधात दाखल झालेला अविश्वास ठराव १४-० अशा फरकाने मंजूर झाल्याची माहिती पीठासीन अधिकारी तथा हवेलीचे तहसीलदार प्रशांत पिसाळ यांनी दिली.सरपंच अश्विनी राजेंद्र कांचन मात्र यावेळी गैरहजर राहिल्या, हे महत्त्वाचे आहे. ग्रामपंचायतीच्या १७ पैकी १३ सदस्यांनी सरपंचांविरोधात अविश्वास ठरावाचा प्रस्ताव तहसीलदार पिसाळ यांच्याकडे दिला होता. त्यानुसार पिसाळ यांनी ग्रामपंचायत कार्यालयात शनिवारी (ता. ७) विशेष बैठक बोलाविली होती. या बैठकीत गुप्त मतदान घेण्याची मागणी लेखी स्वरूपात एका सदस्याने केली होती.त्याला अनुसरून घेण्यात आलेल्या गुप्त मतदान प्रक्रियेत १६ सदस्य हजर होते, पैकी १४ सदस्यांनी ठरावाच्या बाजूने मतदान केले, तर दोन सदस्यांनी कोरी मतपत्रिका टाकून मतदानापासून अलिप्त राहणे पसंत केले. महिला सरपंच असल्याने नियमानुसार ३/४ सदस्यांचा म्हणजे, १२ सदस्यांचा अविश्वास ठरवाला पाठिंबा आवश्यक होता. तो १३ सदस्यांनी सह्या केल्याने पूर्ण झाला होता. आज प्रत्यक्षात १४ सदस्यांनी त्या बाजूने मतदान करून त्यांच्यावरील अविश्वास अधोरेखित केला.आजच्या अविश्वास ठरावावर निर्णय घेण्याची बैठक अतिसंवेदनशील वातावरणात झाली; मात्र सहायक पोलीस निरीक्षक श्रीकांत इंगवले यांनी आपल्या सहकाऱ्यांच्या मदतीने चोख बंदोबस्त ठेवत कोणताही अनुचित प्रकार घडू दिला नाही. मंडलाधिकारी दीपक चव्हाण व ग्रामविकास अधिकारी के. जी. कोळी यांनी पीठासीन अधिकारी प्रशांत पिसाळ यांना मदत केली.उरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच पदाची निवडणूक २४ आॅगस्ट २०१५ रोजी झाली होती. यामध्ये ठरल्याप्रमाणे इतर सदस्यांना भविष्यात या पदावर काम करण्याची संधी देण्याचे ठरले होते, अशी चर्चा नाराज सदस्यांमध्ये होती.प्रत्यक्षात तसे न घडल्याने मागील वर्षभरापासून सर्व सदस्यांमध्ये अंतर्गत गटबाजी, बंडाळी सुरू होती. याचाच परिपाक म्हणून संतोष हरिभाऊ कांचन या सत्ताधारी गटाच्या असंतुष्ट सदस्यांच्या नेतृत्वाखाली एकूण १७ पैकी १५ सदस्य म्हणजे सरपंच - उपसरपंच सोडून बाकीचे सर्व सदस्य एकत्र आले होते. त्यापैकी १३ सदस्यांनी सह्या करून सोमवार, दि. २ जुलै रोजी सरपंचांवर सदस्यांना विचारात न घेता एकतर्फी निर्णय घेणे, सदस्यांना तुच्छतेची वागणूक देणे, सरपंच पती राजेंद्र बबन कांचन यांची ग्रामपंचायत कारभारात ढवळाढवळ व सरपंचाच्या परस्पर निर्णय घेणे या कारणांसाठी अविश्वास ठराव दाखल केला होता. हा ठराव दाखल केलेल्या ग्रामपंचायत सदस्यांमध्ये संतोष हरिभाऊ कांचन, सुनील दत्तात्रेय कांचन, भाऊ कांचन, सागर कांचन, जितेंद्र बडेकर, राजेंद्र जगताप,रोहित ननावरे, राजश्री वनारसे, सारिका मुरकुटे, समता जगताप, सारिका लोणारी, कविता खेडेकर, ज्योती पाथरकर या सदस्यांचा समावेश होता.  यावेळी पिसाळ म्हणाले की, या निर्णयाविरुद्ध जिल्हाधिकारी यांच्याकडे अपिलात जाण्यासाठी ७ दिवसांची मुदत सदरच्या पदाधिकाºयाला मिळते, त्यावर ३० दिवसांच्या आत जिल्हाधिकारी यांनी निर्णय घेणे अपेक्षित असून, नंतरच नवीन पदाधिकारी निवडीची प्रक्रिया सुरू करावी लागते.

टॅग्स :Puneपुणेnewsबातम्या