शहरं
Join us  
Trending Stories
1
"दादांचं स्वप्न, बारामतीचा ध्यास... दुःख तळघरात कोंडलं अन्...!"; उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी सुनेत्रा पवार भावुक, दिलं मोठं वचन
2
इराणच्या होर्मुझमधून निघालं भारताचं ८वं जहाज, २० हजार टन LPG घेऊन 'ग्रीन आशा' मायदेशात येणार!
3
लग्नाच्या पहिल्याच रात्री नववधूला...! नवरदेवाने थेट गाठले पोलीस स्टेशन; आग्र्यातील धक्कादायक घटना
4
अमेरिका-इराणमध्ये आजच युद्धविराम?, ४८ तास महत्त्वाचे; पाकिस्तानचा पुढाकार, रातोरात सूत्रे हलली
5
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या 'तृप्तबाला'वर लक्ष ठेवण्यासाठी समर्थकांची खतरनाक 'मोडस ऑपरेंडी'
6
गोरेगावात तुफान राडा, पोलिसांची थेट बुलडोझर कारवाई; सोमय्या घटनास्थळी 'हनुमान चालीसा' पठण करणार
7
सोन्या-चांदीच्या दरात मोठी तेजी; Gold २ हजारांपेक्षा, तर Silver ६ हजारांपेक्षा अधिकनं महागलं; टेक करा नव्या किमती
8
टोयोटा 'इनोव्हा क्रिस्टा' कायमची बंद होणार? डिझेल MPV प्रेमींना मोठा धक्का; खरेदीसाठी शेवटची संधी!
9
हात-पाय गमावले, जिद्द सोडली नाही; 18 वर्षीय पायल नागने वर्ल्ड पॅरा आर्चरी सीरिजमध्ये जिंकले 'गोल्ड'
10
राष्ट्रवादी काँग्रेस विलीनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम! खासदार अमर काळे यांनी स्पष्ट केली भूमिका; विलीनीकरणाचा विषय आता बंद?
11
"तू फक्त माझाच आहेस, पत्नीला घटस्फोट दे"; प्रेयसीचा हट्ट, कंटाळून शिक्षकाने केली आत्महत्या
12
Ashok Kharat : राजकारण तापलं! भोंदू अशोक खरातचे कॉल डिटेल्स कसे काय बाहेर आले?
13
Reliance Industries च्या शेअर्समध्ये जोरदार घसरण, गुंतवणूकदारांना ३५ हजार कोटींचा फटका; कारण काय?
14
"स्वतःची काळजी घ्या बाबा"; हातावर 'ते' शब्द लिहून लेकीने आयुष्य संपवलं! नेमकं काय घडलं?
15
युद्धादरम्यान इराणला जबर धक्का, अमेरिका-इस्राइलच्या हल्ल्यात गुप्तचर संघटनेचे प्रमुख माजिद खादेमी यांचा मृत्यू
16
सामान्य अमेरिकनही होरपळले...! ट्रम्प यांनी इराणवर नाही जगावर युद्ध लादले...
17
बँकेत जाण्याची कटकट संपली! UPI वर मिळणार PF चा बॅलन्स; ५ लाखांपर्यंतचे क्लेम आता झटपट निकाली
18
"निवडणूक लादली तर शप्पथ सांगतो की..."; बारामतीत सुनेत्रा पवारांसाठी सुनील तटकरेंचा ऐतिहासिक संकल्प
19
कोण आहे प्रिया पटेल? जिच्या एका विधानानं अमेरिकेत माजला गदारोळ; सोशल मीडियावर होतेय ट्रोल
20
Lunch Box Recipe: प्रोटीन रिच सोया दाल पराठा; चवीला भारी आणि आरोग्यासाठी गुणकारी!
Daily Top 2Weekly Top 5

ससूनमध्ये अद्ययावत यकृत प्रत्यारोपण केंद्र

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 6, 2019 13:12 IST

ससून रुग्णालयामध्ये अद्ययावत यकृत प्रत्यारोपण केंद्राची उभारणी करण्यात आली आहे.

ठळक मुद्देयकृत प्रत्यारोपण झालेल्या दोन रुग्णांच्या हस्ते या केंद्राचे रविवारी लोकार्पण

पुणे : ससून रुग्णालयामध्ये अद्ययावत यकृत प्रत्यारोपण केंद्राची उभारणी करण्यात आली आहे. यकृत प्रत्यारोपण झालेल्या दोन रुग्णांच्या हस्ते या केंद्राचे रविवारी लोकार्पण करण्यात आले. फिनोलेक्स व मुकुल माधव फाउंडेशनच्या अर्थसहाय्यातून हे केंद्र उभारण्यात आले आहे. फिनोलेक्स इंडस्ट्रीजचे संस्थापक प्रल्हाद छाब्रिया यांच्या तिसऱ्या स्मृतीदिनानिमित्त फिनोलेक्स व मुकुल माधव फाउंडेशनने दिलेल्या एक कोटी ३० लाख रुपयांच्या अर्थसहाय्यातून अद्ययावत केंद्र तयार करण्यात आले आहे. केंद्राच्या लोकार्पणप्रसंगी न्युरोफिजिशियन डॉ. आर. एस. वाडिया, फिनोलेक्सचे अध्यक्ष प्रकाश छाब्रिया, फाउंडेशनच्या व्यवस्थापकीय विश्वस्त रितु छाब्रिया, होप फाउंडेशनच्या अध्यक्षा अरुणा कटारा, जे. जे. रुग्णालयाचे अधिष्ठाता व ससून रुग्णालयाचे माजी अधिष्ठाता डॉ. अजय चंदनवाले, ससून रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. सुधीर नणंदकर, डॉ. शीतल धडफळे, डॉ. कमलेश बोकील, डॉ. संजीव ठाकूर यांच्यासह प्रल्हाद छाब्रिया यांचा मित्रपरिवार आदी उपस्थित होते. केंद्रामध्ये अत्याधुनिक उपकरणे आणि शस्त्रक्रिया कक्ष उभारण्यात आला आहे.प्रकाश छाब्रिया म्हणाले, सामान्य रुग्णांसाठी ससून रुग्णालयातील आरोग्यसुविधा उच्च दर्जाच्या व्हाव्यात, या प्रेरणेने आम्ही गेली ३-४ वर्षांपासून सातत्याने काम करीत आहोत. वडिलांच्या दातृत्वपणामुळे भविष्यातही ससूनला सामान्य रुग्णांसाठी लागेल ती मदत करण्यास आम्ही कटिबद्ध आहोत.ससून रुग्णालयाला अत्याधुनिक आणि दर्जेदार आरोग्य सेवांचे केंद्र बनविण्यासाठी छाब्रिया कुटुंबासारखे अनेक दानशूर लोक पुढे येत आहेत. ‘ससून फॉर कॉमनमॅन’ हे सत्यात उतरविण्यासाठी फिनोलेक्स इंडस्ट्रीज व मुकुल माधव फाउंडेशनच्या देणगीचा वाटा मोठा आहे, असे डॉ. चंदनवाले यांनी सांगितले. --------------------------आणखी एक कोटीची देणगीयकृत प्रत्यारोपण केंद्राच्या उद्घाटनप्रसंगी प्रकाश छाब्रिया यांनी ससूनला आणखी एक कोटी रुपयांची देणगी जाहीर केली. पुढील ९० दिवसात त्या एक कोटीच्या देणगीचा विनियोग करावा, असे त्यांनी सूचित केले. ही देणगी यकृत प्रत्यारोपण केंद्राच्या रिकव्हरी कक्षाच्या उभारणीसाठी वापरली जाणार असल्याचे रितू छाब्रिया यांनी सांगितले. नवजात शिशू अतिदक्षता विभाग, एन्डोस्कोपी केंद्र, लेझर डेंटल युनिट, विश्रांतीकक्ष अशा सुविधा उपलब्ध केल्यानंतर आता हे केंद्र उभारले आहे. यामुळे गरजू रुग्णांना अल्पदरात यकृत प्रत्यारोपण करणे शक्य होणार असल्याचे छाब्रिया यांनी नमुद केले.

टॅग्स :Puneपुणेsasoon hospitalससून हॉस्पिटलHealthआरोग्य