शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताने ५ फायटर जेट पाडले'; पाकिस्तानचा थयथयाट, संरक्षण मंत्री आसिफ म्हणाले...
2
वैष्णो देवी दर्शनाचा मार्ग आणखी सुकर होणार; तर महाराष्ट्राला मिळणार आणखी एक वंदे भारत, 'या' मार्गावर धावणार?
3
महाराष्ट्रातील 'या' नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून हटवले; निवडणूक आयोगाची कारवाई कुणावर?
4
नागपूर: महालक्ष्मी मंदिराच्या प्रवेशद्वाराचे छत कोसळले, अनेक मजूर जखमी; NDRF कडून शोध कार्य सुरू
5
'निघालो तेव्हा बाजार होता, परतलो तेव्हा स्मशान'; धरालीतील ढगफुटीनंतर लोकांनी सांगितला थरारक अनुभव
6
ती आली अन् पाहुणेही आले... हार, तोरणं, पताका आणि फुलांनी भव्य सभामंडपही सज्ज
7
कबुतरांना कारवर ट्रे ठेवून खाद्य, महेंद्र संकलेचाला पोलिसांचा दणका; गाडीही केली जप्त
8
'आधी तक्रार करायला सांगितलं नाही'; माजी मुख्य निवडणूक आयुक्त रावतांचं मोठं विधान, आयोगाबद्दल काय म्हणाले?
9
धक्कादायक! डोनाल्ड ट्रम्प यांनी फायद्यासाठी पहिल्या पत्नीला गोल्फ कोर्समध्ये पुरलं? केला जातोय असा दावा
10
निवडणूक आयोगाचा मोठा निर्णय, देशभरातील तब्बल ३३४ पक्षांना दिला दणका   
11
महान तपस्वी, ऋषिमुनीसारखा तो २३३ वर्षांपासून देतो आहे आसरा
12
हा निर्णय सोपा नाही; त्यात संघातून बाहेर फेकले जाण्याचीही जोखीम! रहाणेचं बुमराहसंदर्भात मोठं वक्तव्य
13
जीर्ण पाईप फुटून आण्विक कचरा समुद्रात पडला, नौदलाच्या चुकीमुळे या देशात हाहाकार
14
'अजिबात तडजोड स्विकारणार नाही', डोनाल्ड ट्रम्प-पुतीन भेटीआधीच युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष झेलेन्स्कींचा इशारा
15
"देशात इंग्रजांच्या राजवटीपेक्षा भयंकर परिस्थिती, लोकशाही आणि संविधान गिळंकृत करू पाहणाऱ्या प्रवृत्तींनो चले जाव’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा इशारा
16
रिंकूच्या प्रॅक्टिस वेळी खासदार मॅडम प्रिया सरोज यांची थेट ग्राउंडमध्ये एन्ट्री, व्हिडिओ व्हायरल
17
मिस्टर इंडियाप्रमाणे तुरुंगातून गायब कैदी झाला, बाहेर गेला की आतच लपला? काही कळेना, झाडांपासून, गटारांपर्यंत पोलीस घेताहेत शोध  
18
भाजप खासदार निशिकांत दुबे आणि मनोज तिवारी यांच्या विरोधात गुन्हा, वैद्यनाथ मंदिर प्रकरण काय?
19
'शरद पवारांवर राहुल गांधींच्या भेटीचा परिणाम' निवडणूक आयोगाबाबत केलेलं वक्तव्य फडणवीसांना खटकलं
20
१५ दिवस चहा प्यायला नाहीत तर काय होईल? तुम्हाला आवडतील शरिरातील 'हे' ५ पॉझिटिव्ह बदल

उजनी जलाशयाच्या पात्रात होतोय बेसुमार वाळूउपसा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 26, 2018 00:40 IST

कुंभारगाव (ता. इंदापूर) येथील उजनी जलाशयाच्या पात्रात दररोज रात्रीच्या वेळी बेसुमार वाळूउपसा होत आहे. रात्री बारा वाजता या ठिकाणी बोटीद्वारे वाळू उपसणयास सुरुवात होते.

पळसदेव : कुंभारगाव (ता. इंदापूर) येथील उजनी जलाशयाच्या पात्रात दररोज रात्रीच्या वेळी बेसुमार वाळूउपसा होत आहे. रात्री बारा वाजता या ठिकाणी बोटीद्वारे वाळू उपसणयास सुरुवात होते. मात्र याकडे महसूल प्रशासनाने तसेच तहसीलदारही दुर्लक्ष करीत आहेत, अशा चर्चा सध्या सुरू आहेत. कुंभारगाव गाव हे फ्लेमिंगो पक्ष्यांच्या माध्यमातून संपूर्ण महाराष्ट्रात पोहोचले आहेत. या ठिकाणी आजमितीला पाच हजार फ्लेमिंगो पक्षी आहेत. मात्र या पक्ष्यांच्या सारंगगारजवळच वाळूउपसा जोरात सुरू आहे. त्यामुळे पक्ष्यांचे वास्तव्य धोक्यात आले आहे. दररोज या ठिकाणी हजारो पर्यटक पक्षी पाहण्यासाठी येत आहेत. परंतु बोटीच्या आवाजामुळे पक्षी सैरभैर फिरताना दिसतात. मध्यरात्रीच्या सुमारास वाळूउपसा करणयास सुरुवात होते. हा वाळूउपसा पहाटे पाच वाजेपर्यंत सुरू असतो. कुंभारगाव येथून भरलेल्या वाळूच्या ट्रक डाळज क्रमांक २ मार्गे पुण्याकडे जातात. डाळज गावामध्ये पहाटेच्या वेळी रस्त्यावर पाणीच पाणी दिसते. मात्र याकडे कोणीच लक्ष देत नाही. यापूर्वीचे तहसीलदार श्रीकांत पाटील असताना इंदापूर तालुक्यातील वाळूउपसा बंद झाला होता. याची धास्ती वाळूमाफिया यांनीसुद्धा घेतली होती. परंतु तहसीलदारांच्या बदलीनंतर वाळूमाफियांनी पुन्हा तोंड वर काढले आहे.याबाबत काही ग्रामस्थांनी सांगितले, की दररोज या ठिकाणी बेसुमार वाळूउपसा सुरू आहे. परंतु याकडे तलाठी, मंडलाधिकारी, तसेच महसूल खात्याचे वरिष्ठ अधिकारी दुर्लक्ष करीत आहेत. उजनी धरण हे पक्ष्यांचे माहेरघर आहे.वाळूच्या गाडीला ‘पेट्रोलिंग’उजनी जलाशयातून ट्रकमध्ये वाळू भरल्यानंतर पुढे मोटारसायकलवर तरुणअसतात. प्रत्येक ठिकाणी ‘लोकेशन’नुसार वाळू भरलेल्या गाड्या जातात. त्यामुळे खरच महसूल प्रशासनातील अधिकारी वाळूउपसा बंद करण्याबाबत ‘तत्परता’ दाखवतात का? प्रश्न निर्माण झाला आहे.वाळूउपशामुळे पक्ष्यांचे वास्तव्य धोक्यात आले आहे. उजनीच्या काळ्या सोन्यावर अनेकांचा डोळा आहे. परंतु महसूलमधील काही अधिकारी यांच्या मिलीभगतमुळे वाळूमाफिया किंग बनले आहेत. याकामी जिल्हाधिकाऱ्यांनी लक्ष देण्याची मागणी पक्षीप्रेमींनी केली आहे.उजनी धरणात दरवर्षी हजारो फ्लेमिंगो पक्षी येत असतात. त्यांना पाहण्यासाठी पर्यटकांचीही गर्दी असते.

टॅग्स :Puneपुणे