शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
2
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
3
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
4
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
5
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
6
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
7
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
8
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
9
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
10
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
11
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
12
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
13
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
14
रिक्षा परमिट हवे, तर मग मराठी येणे अनिवार्य; परवाने पुनर्तपासणीचे प्रताप सरनाईकांचे निर्देश
15
मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्याबाबत ११४७ एकरचा दावा चुकीचा, बदनामी प्रकरणी FIR दाखल
16
लक्ष्मी ऑरगॅनिक विरोधातील संघर्षाला व्यापक स्वरूप; आंदोलकांनी मुंबईत घेतली राज ठाकरेंची भेट
17
'ना पारसी ना मुंबईकर', Tata Trust मध्ये नवा वाद! मेहली मिस्त्रींचं श्रीनिवासन-विजय सिंग यांच्या नियुक्तीला आव्हान, प्रकरण काय?
18
'धुरंधर'चं तुफानी यश, रणवीर सिंहसोबत पुन्हा काम करणार आदित्य धर? पुढील प्रोजेक्ट्सची चर्चा
19
“ती बोलत नाही, बेशुद्ध...”; ७ वर्षांनी मोठ्या लिव्ह-इन पार्टनरची हत्या, २० दिवसांनी सत्य समोर
20
Petrol ४५८ रुपये तर Diesel ५२० पार! भारताच्या शेजारील देशात महागाईचा विस्फोट; आपल्याकडे काय आहेत दर?
Daily Top 2Weekly Top 5

मराठमोळ्या पुणेकरानं कमाल केली, 'हायपरलूप'ची मानवी चाचणी यशस्वी झाली!

By दीपक अविनाश कुलकर्णी | Updated: November 10, 2020 14:42 IST

'लास वेगास' येथील केंद्रावर 'व्हर्जिन हायपरलूप'च्या वतीने 'हाय स्पीड पॉड सिस्टीम' ची रविवारी पहिली यशस्वी मानवी चाचणी..

ठळक मुद्देपुणे- मुंबई दरम्यानच्या प्रस्तावित 'हायपरलूप' प्रकल्पाबाबत पुन्हा एकदा सकारात्मक आशा पल्लवित...

पुणे : ‘हायपरलूप' प्रकल्पाला चालना मिळण्याच्या दिशेने अमेरिकेने एक महत्वपूर्ण पाऊल टाकले आहे. 'लास वेगास' येथील केंद्रावर 'व्हर्जिन हायपरलूप'च्या वतीने 'हाय स्पीड पॉड सिस्टीम' ची पहिली यशस्वी मानवी चाचणी रविवारी घेण्यात आली. आणि सोमवारी घेण्यात आलेल्या दुसऱ्या मानवी चाचणीत भारतासह पुण्यासाठी अभिमानाची व गौरवास्पद अशी गोष्ट घडली. ती म्हणजे मूळ पुणेकर असलेला तनय मांजरेकर हा इंजिनियर तरुण दुसऱ्या मानवी चाचणीत सहभागी झाला होता. या दोन मानवी चाचण्यांना मिळालेल्या यशामुळे पुणे- मुंबई दरम्यानच्या प्रस्तावित 'हायपरलूप' प्रकल्पाबाबत पुन्हा एकदा सकारात्मक आशा पल्लवित झाल्या आहेत. 

 अमेरिकेतील नामवंत व्यावसायिक रिचर्ड ब्रँनसन यांच्या 'व्हर्जिन हायपरलूप' च्या वतीने हायपरलूप प्रकल्पाच्या अनुषंगाने जवळपास आजपर्यंत चारशे मानव विरहित चाचण्या पूर्ण केल्या आहेत. त्यानंतर रविवारची चाचणी 'व्हर्जिन हायपरलूप' सह सर्वांचेच लक्ष लागून होते. कारण ती पहिली मानवी चाचणी होती. पहिल्या मानवी चाचणीचे पहिले प्रवासी होण्याचा मान हायपरलुपचे टेक्नॉलॉजी अधिकारी जोश गेगल आणि संचालक सारा लुशियन यांना मिळाला. दुसऱ्या मानवी चाचणीत पुण्याच्या तनय मांजरेकरसह हायपरलुपच्या सर्व अधिकाऱ्यांना प्रवास करण्याची संधी देण्यात आली होती. सलग दोन मानवी चाचण्यांना मिळालेले यश वाहतूक क्षेत्रात क्रांतिकारी बदल घडवण्याच्या दृष्टीने आशेचा किरण जागविणारे आहे.

 'लास वेगास' येथील केंद्रावर साधारण पाच मीटर लांब आणि ३.३ मीटर रुंद ट्रॅकवर ही मानवी चाचणी पार पडली.

या महत्वाच्या प्रकल्पात सहभागी झालेला तनय मांजरेकर याने सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठामधून इलेक्ट्रॉनिक्स अँड टेलिकम्युनिकेशन शाखेची पदवी प्राप्त केली आहे. त्याचप्रमाणे तनयने हायपरलूप तंत्रज्ञान विकसनात विद्युत अभियांत्रिकी म्हणून काम पाहिले आहे.तसेच युनिव्हर्सिटी ऑफ सदर्न कॅलिफोर्नियातून विद्युत अभियांत्रिकी शाखेत त्याने पदव्युत्तर पदवी प्राप्त केली. २०१६ पासून तन्मय 'व्हर्जिन हायपरलूप' मध्ये काम करतो आहे. 

 या अद्वितीय अनुभवाबद्दल तनय म्हणाला, हायपरलूपसाठी काम करायला मिळणे आणि त्याचसोबत प्रवासाची संधी माझ्या जीवनातली फार नाविन्यपूर्ण आणि भाग्याची गोष्ट आहे. माझे स्वप्नच सत्यात उतरल्याची भावना यावेळी मनात आहे. त्याचप्रमाणे आपला भारत देश सुद्धा नवीन क्रांतिकारी तंत्रज्ञानाच्या दिशेने आपला प्रवास सुरु ठेवेल. आणि भविष्यातील नवनवीन अभूतपूर्ण संधीची गरज ओळखून त्या प्रत्यक्षात आणण्यासाठी प्रयत्नशील राहील. पुणे-मुंबई हायपरलूप प्रस्तावित प्रकल्पाकडे सकारात्मक पद्धतीने काम करत सुरु ठेवेल. 

.......आमची कंपनी मागील अनेक वर्ष अद्वितीय आणि क्रांतिकारी टेक्नॉलॉजी सत्यात उतरवण्यासाठी अपार परिश्रम घेत आहे.आम्ही यशाच्या अगदी जवळ असून आगामी काळात जागतिक पातळीवर नागरिकांच्या जीवनशैलीत खूप काही परिवर्तन घडणार असल्याचे या मानवी चाचणीमार्फत सिद्ध केले आहे. - रिचर्ड ब्रॅन्सन, संस्थापक, व्हर्जिन हायपरलूप. 

टॅग्स :PuneपुणेHyperloopहायपर लूपAmericaअमेरिकाtechnologyतंत्रज्ञान