शहरं
Join us  
Trending Stories
1
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
2
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
3
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
4
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
5
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
6
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
7
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
8
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
9
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलरचा ट्रेंड; ब्लू, रेड, गोल्डन केसांवरुन जाणून घ्या व्यक्तिमत्वाचं रहस्य
10
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
11
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
12
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
13
सख्ख्या आतेभावानेच बहिणीवर केला अत्याचार; नराधम मुलाला धडा शिकवण्यासाठी आईनेच गाठले पोलीस स्टेशन
14
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
15
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
16
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
17
धोक्याची घंटा! तुम्हीही जेवताना फोन वापरताय? एका चुकीमुळे आतड्यांचं होतं गंभीर नुकसान
18
Travel : हिमालयातील निळ्याशार पाण्याचा स्वर्ग! 'चंद्रताल'ला जाण्याचा प्लॅन करताय तर 'हे' नक्की वाचा
19
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
20
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठाचा अभियांत्रिकीचा पेपर फुटला 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 23, 2018 20:01 IST

पेपर फुटला नाही, मात्र काही विद्यार्थ्यांनी खोडसाळपणा केला असल्याची शक्यता असून यासंदर्भात आवश्यकता भासल्यास पोलिसांत तक्रार देण्यात येणार आहे, असे स्पष्टीकरण विद्यापीठाकडून देण्यात आले आहे. 

ठळक मुद्देसायंकाळी उशिरापर्यंत याप्रकरणाची चौकशी सुरू महाविद्यालयाकडून हलगर्जीपणा झाला असल्याचे स्पष्ट झाल्यास कडक कारवाई

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा वेबमेल हॅक करून पेपर फोडल्याचे प्रकरण ताजे असतानाच बुधवारी पुन्हा एका आभियांत्रिकीच्या पहिल्या वर्षाचा ‘इंजिनिअरींग मेकॅनिक्स’ या विषयाचा पेपर फुटला आहे. सातत्याने पेपर फुटत असल्याने हे प्रकार दडपण्याचे प्रयत्न विद्यापीठ प्रशासनाकडून केले जात असून पेपर फुटीची अफवा असल्याचे स्पष्टीकरण त्यांच्याकडून देण्यात आले आहे.  अभियांत्रिकी शाखेच्या पहिल्या वषार्चा ‘इंजिनिअरींग मेकॅनिक्स’ या विषयाचा सकाळी १० ते १२ या वेळेत पेपर होता. काही महाविद्यालयांमधून हा पेपर दहाच्या सुमारास व्हायरल झाला. विद्यापीठाच्या परीक्षा विभागाचे संचालक अशोक चव्हाण यांनाही त्या पेपरची प्रत पाठविण्यात आली होती. त्यानंतर विद्यापीठाच्या अधिकाऱ्यांचे पथक कोथरूडमधील एमआयटी महाविद्यालयामध्ये पाठविण्यात आले. सायंकाळी उशिरापर्यंत या प्रकरणाची चौकशी सुरू आहे. इंजिनिअरींग मेकॅनिक्स या विषयाचा पेपर फुटला नाही, मात्र काही विद्यार्थ्यांनी खोडसाळपणा केला असल्याची शक्यता असून यासंदर्भात आवश्यकता भासल्यास पोलिसांत तक्रार देण्यात येणार आहे. तसेच, यामध्ये महाविद्यालयाकडून हलगर्जीपणा झाला असल्यास त्यांच्यावरही कडक कारवाई करण्यात येईल स्पष्टीकरण विद्यापीठाकडून देण्यात आले आहे. हा गैरप्रकार करणाऱ्या विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचण्याचे विद्यापीठाने ठरवले आहे. त्यासाठी आवश्यकता भासल्यास पोलिसांमध्ये तक्रार देण्यात असून खोडसाळपणा करणाऱ्यांना शोधण्यासाठी पोलिसांची मदत घेण्यात येणार आहे. तसेच, याबाबत महाविद्यालयाकडून हलगर्जीपणा झाला असल्याचे स्पष्ट झाल्यास त्यांच्यावरही कडक कारवाई करण्यात यईल असे विद्यापीठाने स्पष्ट केले आहे. विद्यापीठाचे वेबमेल हॅक करून पेपर फोडण्यात आल्यानंतर तरी पेपर फुटीच्या घटनांना आवर घातला जाण्याची अपेक्षा व्यक्त केली जात होती. मात्र ती फोल ठरल्याचे दिसून येत आहे. 

टॅग्स :Puneपुणेuniversityविद्यापीठexamपरीक्षाStudentविद्यार्थी