शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्योग क्षेत्राला बूस्टर; ४० हजारांवर रोजगार, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत ९ कंपन्यांशी करार
2
आजचे राशीभविष्य, २० सप्टेंबर २०२५: भागीदारांशी संबंध बिघडतील, वाणीवर संयम ठेवा!
3
अजित पवारांची मंत्र्यांना तंबी, वेळ नसेल तर खुर्ची रिकामी करा; चिंतन शिबिरात सुनावले खडेबोल
4
परिणामांचा विचार करून बोला, गोपीचंद पडळकर यांना देवेंद्र फडणवीस यांची समज
5
‘निवडणूक आयोग जागा राहिला, चोरी पाहत राहिला...’, राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
6
राज्यात पीक पेरा नोंदणी ४७ टक्केच नोंदणीस दुसऱ्यांदा ३० पर्यंत मुदतवाढ
7
अमेरिकेत टिकटॉकचं गौडबंगाल! डोनाल्ड ट्रम्प यांनी टिकटॉकच्या बाबतीतही आता आपला निर्णय फिरवला
8
बदलापूरसारखी दुसरी घटना घडण्याची वाट बघताय का?; हायकोर्टाचा संतप्त सवाल
9
आधी जिल्हा परिषद निवडणुकांचा बार! याचिका निकाली निघाल्याने मार्ग जवळपास मोकळा
10
आयोग नव्हे, मतदारच राजा !
11
विमानतळासह एरोसिटीला जोडणाऱ्या कॉरिडॉरला मंजुरी; केंद्राच्या निर्णयाने सिडकोस दिलासा, तीन किमीच्या मार्गासाठी ४४.४८ कोटींचा खर्च
12
चौथ्या मजल्यावरून पडून चिमुकला वाचला; पण कोंडीत जीव गेला
13
मते चोरी हाेणार नाहीत, याची काळजी घ्या; राज ठाकरे यांच्या सूचना
14
सिडकोच्या कंपनीतील कामगारांचा ४० वर्षे प्रलंबित प्रश्न अखेर सुटला; ११ कामगारांना प्रत्येकी १० लाखांचा धनादेश
15
ऑलिम्पिक यजमानपदासाठी अहमदाबाद तयार आहे?
16
‘नॅनो बनाना’ची जादू, ‘रेट्रो’ फोटो, त्यामागचे धोके!
17
‘राजुरा’वर राहुल गांधींनी जाहीर आरोप केले, आता निवडणूक आयोगाने सत्य समोर आणले, पुरावेच दिले
18
आशिया कप स्पर्धेतील Super 4 लढती आधी ओमानच्या संघानं दाखवला ‘सावधान टीम इंडिया’ शो!
19
मणिपूर अशांतच! आसाम रायफल्सच्या ताफ्यावर गोळीबार; दोन जवानांना हौतात्म्य, अनेक जखमी
20
Arshdeep Singh: अर्शदीपनं रचला इतिहास; T-20I मध्ये 'शतक' साजरे करणारा ठरला पहिला भारतीय गोलंदाज

‘वर्ल्ड क्लास’साठी विद्यापीठाची मोर्चेबांधणी , आयक्यूएसीची बैठक, शिक्षणतज्ज्ञ, उद्योजकांची घेणार मदत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 20, 2017 03:11 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा केंद्र शासनाच्या २० ‘वर्ल्ड क्लास युनिव्हर्सिटी’मध्ये समावेश व्हावा; या उद्देशाने विद्यापीठ प्रशासनाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विद्यापीठाच्या इंटर्नल क्वालिटी अ‍ॅसेसमेंट सेलच्या (आयक्यूएसी) माध्यमातून हा अहवाल तयार केला जाणार आहे.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा केंद्र शासनाच्या २० ‘वर्ल्ड क्लास युनिव्हर्सिटी’मध्ये समावेश व्हावा; या उद्देशाने विद्यापीठ प्रशासनाने मोर्चेबांधणी सुरू केली आहे. विद्यापीठाच्या इंटर्नल क्वालिटी अ‍ॅसेसमेंट सेलच्या (आयक्यूएसी) माध्यमातून हा अहवाल तयार केला जाणार आहे. त्यामुळे जगातील पहिल्या १०० विद्यापीठांमध्ये पुणे विद्यापीठाचा समावेश व्हावा यासाठीची योजना तयार करून लवकरच केंद्र शासनाच्या मनुष्यबळ विकास मंत्रालयास सादर करण्यात येईल.गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात देशातील विद्यापीठांना जागतिक दर्जाचे बनविण्यासाठी निधीची तरतूद करण्यात आली होती. मात्र, केंद्रीय पातळीवरून या विषयाला चालना मिळत नव्हती. गेल्या आठवड्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील २० विद्यापीठांना दहा हजार कोटी रुपये निधी उपलब्ध करून देण्याची घोषणा केली. त्यासाठी देशातील १० शासकीय व १० खासगी विद्यापीठांची निवड केली जाणार आहे. पुढील काळात या २० विद्यपीठांनी वर्ल्ड क्लास युनिव्हर्सिटी स्वत:ची ओळख निर्माण करावे, अशी अपेक्षा आहे. त्यातील दहा शासकीय विद्यापीठांमध्ये सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा समावेश व्हावा, यासाठी विद्यापीठ प्रशासनाने प्रयत्न सुरू केले आहेत.त्यासाठी विद्यापीठातील १४ व उद्योग क्षेत्रातील २ अशा १६ सदस्यांची एक समिती स्थापन केली आहे. ही समिती आवश्यक प्रस्ताव तयार करण्याचे काम करणार आहे. तसेच शिक्षण, उद्योग, आयटी व राजकीय व्यक्तींचा सहभाग असलेली ३५ सदस्यांची उच्च समिती स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे. त्यात विद्यापीठाच्या माजी कुलगुरूंचा समावेश असणार आहे.विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. नितीन करमळकर यांच्या अध्यक्षतेखाली विद्यापीठ परिसरातील सदस्यांच्या समितीची बैठक नुकतीच पार पडली. विद्यापीठाच्या व्यवस्थापन विभागाचे प्रमुख डॉ. प्रफुल्ल पवार, तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख डॉ. अदित्य अभ्यंकर, विद्यार्थी कल्याण मंडळाचे संचालक डॉ. प्रभाकर देसाई, संजीव मेहता, अभय जेटे, डॉ. श्रद्धा कुंभोजकर, चंद्रानी चटर्जी, राजेश्वरी देशपांडे, अविनाश कुंभार आदी या बैठकीस उपस्थित होते.नितीन करमळकर म्हणाले, भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, सामाजिक शास्त्र, आरोग्य आदी विषयात विद्यापीठ स्वयंपूर्ण वसक्षम आहे.त्यामुळे अशा घटकांना एकत्रित करून केंद्र शासनाकडे ‘वर्ल्ड क्लास युनिव्हर्सिटी’साठीचा प्रस्ताव सादर केला जाईल. तसेच त्यासाठी अहमदनगर व नाशिक येथील उपकेंद्रांचा सुद्धा वापर करून घेण्याबाबत चाचपणी सुरू आहे.ंसावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाची ‘वर्ल्ड क्लास युनिव्हर्सिटी’साठी निवड व्हावी, या दृष्टीने अभ्यासपूर्ण प्रस्ताव तयार केला जाणार आहे. त्यासाठी राहुल बजाज, आनंद देशपांडे यांसह उद्योग क्षेत्रातील नामांकित व्यक्तींचे मार्गदर्शन घेतले जाईल. विद्यापीठाच्या माजी कुलगुरूंसह शिक्षण व राजकीय क्षेत्रातील व्यक्तींची ३५ सदस्यांची एक उच्चस्तरिय समिती तयार केली जाणार आहे. केंद्र शासनाला प्रस्ताव सादर करण्यासाठी राज्य शासन व राष्ट्रीय उच्चतर शिक्षणा अभियान (रुसा) कडून सहकार्य मिळणार आहे. - नितीन करमळकर,कुलगुरू, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठविद्यापीठ सक्षम असणाºया घटकांचा शोध घेवून त्यांना अधिक सक्षम कसे तयार करता येईल, याबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली.तसेच युरोपियन देशातील विद्यापीठांऐवजी आशिया खंडातील नामांकित विद्यापीठ म्हणून कसे समोर येता येईल, यादृष्टीने प्रस्ताव तयार करताना विचार करावा, असे मत या बैठकीत व्यक्त करण्यात आले.

टॅग्स :Pune universityपुणे विद्यापीठPuneपुणे