शहरं
Join us  
Trending Stories
1
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
2
पाकिस्तानच्या गोळीबारात भारतीय जवान शहीद; डॉक्टरांनी वाचविण्याचा खूप प्रयत्न केला...
3
नियंत्रण रेषेवर पाकिस्तानकडून आगळीक, भारतीय नागरिकांच्या मृत्यूनंतर चोख प्रत्युत्तर देण्याचे लष्कराला आदेश 
4
पॉवरप्लेमध्ये अर्धा संघ तंबूत परतल्यावरही CSK नं काढली मॅच; प्लेऑफ्स शर्यतीत KKR तळ्यात मळ्यात
5
Operation Sindoor 2.0: पाकिस्तानला सहजासहजी सोडणार नाही भारत, आणखी काय-काय घडणार?
6
Thank You Rohit Sharma! हिटमॅनच्या कसोटी निवृत्तीनंतर कोण काय म्हणाले? वाचा सविस्तर
7
ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे अवसान गळाले, आता म्हणतात, "आम्ही संयम पाळू, तणाव आणखी वाढता नये’’  
8
मुरिदकेमध्ये बड्या दहशतवाद्याचा खात्मा? पाकिस्तानी सैन्यातील अधिकाऱ्यांची अंत्ययात्रेला हजेरी   
9
Mumbai Local: मुसळधार पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे मुंबई लोकल सेवा विस्कळीत, प्रवाशांची गैरसोय
10
'ऑपरेशन सिंदूर'बद्दल पंतप्रधान मोदींनी कालच दिले होते संकेत? 'त्या' वाक्यावरून रंगलीये चर्चा
11
Rohit Sharma: रोहित शर्माची कसोटी क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा
12
Operation Sindoor Live Updates: रक्ताच्या एकेक थेंबाचा बदला घेऊन, शाहबाज शरीफ यांची भारताला धमकी
13
"मारुतीरायाच्या आदर्शांचं पालन केलं, आम्ही त्यांनाच मारलं ज्यांनी…’’, राजनाथ सिंह यांचं मोठं विधान  
14
"दहशतवाद्यांना माफी नाही"; 'ऑपरेशन सिंदूर'वर इंग्लंडचे माजी PM ऋषी सुनक यांची रोखठोक प्रतिक्रिया
15
अजिंक्य रहाणेचं अर्धशतक हुकलं; पण IPL मध्ये ५ हजार धावांचा पल्ला गाठत मारली खास क्लबमध्ये एन्ट्री
16
Operation Sindoor : "कलमाबद्दल विचारणाऱ्यांना भारतीय सैन्याने महाभारत सुनावलं, आपल्या शांत झोपेमागे..."
17
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
18
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
19
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
20
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त

विद्यापीठ, सामाजिक न्यायची झाडाझडती ; अधिका-यांची कानउघाडणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 18, 2018 05:38 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून अनुसूचित जाती संवर्गाची भरती प्रक्रिया राबविताना जाणिवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे सामाजिक न्याय विभागाकडून विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील सोई-सुविधा व शिष्यवृत्तीबाबत दिरंगाई करण्यात आल्याबद्दल अनुसूचित जाती कल्याण समितीने शनिवारी नाराजी व्यक्त करून अधिका-यांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाकडून अनुसूचित जाती संवर्गाची भरती प्रक्रिया राबविताना जाणिवपूर्वक दुर्लक्ष करण्यात आले आहे. त्याचप्रमाणे सामाजिक न्याय विभागाकडून विद्यार्थ्यांच्या वसतिगृहातील सोई-सुविधा व शिष्यवृत्तीबाबत दिरंगाई करण्यात आल्याबद्दल अनुसूचित जाती कल्याण समितीने शनिवारी नाराजी व्यक्त करून अधिकाºयांच्या कार्यपद्धतीवर ताशेरे ओढले. तसेच राज्य परिवहन महामंडळाच्या कामकाजावरही नाराजी व्यक्त केली.पुणे जिल्ह्यातील सर्व प्रशासकीय, शैक्षणिक व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या कार्यालयांना अनुसूचित जाती कल्याण समितीच्या सदस्यांनी चार दिवस भेटी दिल्या. त्यानंतर शनिवारी विधान भवन येथे आयोजिण्यात आलेल्या बैठकीत सर्व विभागांच्या अधिकाºयांशी चर्चा करून विविध विकासकामांचा व योजनांचा आढावा घेतला. त्यानंतर अनुसूचित जाती कल्याण समितीचे प्रमुख व आमदार हरिष पिंपळे, प्रकाश गजभिये, गौतम चाबुकस्वार यांनी पत्रकारांशी संवाद साधला. याप्रसंगी जिल्हाधिकारी सौरभ राव व इतर अधिकारी उपस्थित होते.पिंपळे म्हणाले, ‘‘जिल्हा परिषद कार्यालय, पुणे व पिंपरी-चिंचवड महानगरपालिका, तसेच जिल्हाधिकारी कार्यालय, सामाजिक न्याय विभाग, पोलीस आयुक्तालय, सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठासह जिल्ह्यातील विविधशासकीय कार्यालयांना समितीने भेटी दिल्या. त्यात विद्यापीठ व आयुक्त समाजकल्याण व उपायुक्त समाजकल्याण आणि एसटी महामंडळ यांच्या कामात त्रुटी असून त्यांच्याकडून अनुसूचित जाती-जमाती संवर्गातील कर्मचारी व विद्यार्थ्यांसाठी राबविल्या जाणाºया योजनांंकडे दुर्लक्ष झाले आहे.’’त्यामुळे संबंधित अधिकाºयांना मुंबई येथे त्यांच्या विभागाच्या सचिवांसमोर साक्ष देण्यासाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले. त्याचप्रमाणे ज्या कामांमध्ये त्रुटी आढळून आल्या आहेत, अशी कामे पूर्ण करून त्याचा अहवाल येत्या तीन महिन्यांत सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. इतर जिल्ह्याच्या तुलनेत पुण्यातील महानगरपालिका व जिल्हा परिषद व जिल्हाधिकारी कार्यालयातील कामकाज चांगले असल्याचे मत समितीने नोंदवले.पोलीस बंदोबस्त हवाकाही समाजकंटकांनी कोरेगाव भीमा येथे घडवून आणलेली अनुचित घटना पोलिसांनी योग्य प्रकारे हाताळली आहे. त्यामुळे मोठा अनर्थ टळला. त्याबद्दल पोलीस प्रशासनाचे अभिनंदनच केले पाहिजे. मात्र, यापुढील काळात अशा घटना घडू नयेत, यासाठी पुतळे, स्तंभ, देवस्थाने आदी ठिकाणी चोख पोलीस बंदोबस्त ठेवावा. तसेच आवश्यकतेनुसार काही ठिकाणी गर्दी करण्यास बंदी घालावी, अशाही सूचनाही समितीतर्फे देण्यात आल्या असल्याचे आमदार हरिष पिंपळे यांनी सांगितले.- विद्यापीठ व आयुक्त समाजकल्याण व उपायुक्त समाजकल्याण आणि एसटी महामंडळ यांच्या कामात त्रुटी असून त्यांच्याकडून अनुसूचित जाती जमाती संवर्गातील कर्मचारी व विद्यार्थ्यांसाठी राबविल्याजाणाºया योजनांंकडे दुर्लक्ष झाले आहे.

टॅग्स :Pune universityपुणे विद्यापीठ