शहरं
Join us  
Trending Stories
1
विशेष लेख: मृताच्या टाळूवरचे लोणी खाणाऱ्यांना अद्दल घडवा!
2
RCB vs CSK : रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुचा विजयी सिलसिला कायम! चेन्नई सुपर किंग्सची पराभवाची हॅटट्रिक
3
पोहायला पाण्यात उतरा... पण तुमच्या जबाबदारीवर! तलावावर जीवरक्षक, दारात ॲम्ब्युलन्स तरीही मृत्यूच्या घटना
4
कंगाल पाकिस्तानात जनावरांवरही ‘गोबर टॅक्स’! आपल्याच देशातल्या गोरगरीबांनाही सोडलं नाही...
5
अग्रलेख: चलो, चांद के पार चलो...! ओरियन यानाचा नवा इतिहास, पण कहाणी सुफळ संपूर्ण नाही!
6
Akash More: आधी अजित पवारांविरोधात, आता सुनेत्रा पवारांविरोधात रिंगणात, कोण आहेत काँग्रेसचे उमेदवार मोरे?
7
आता गोदामातून सिलेंडर विक्री बंद, नियम मोडणाऱ्यांवर कारवाई होणार; दिल्ली सरकारचा निर्णय
8
Baramati by Election 2026: सुनेत्रा पवारांविरोधात आकाश मोरेंना उतरवले रिंगणात, काँग्रेसने केली घोषणा
9
Bhuvneshwar Kumar Record : 'स्विंगचा किंग' भुवीनं 'द्विशतका'सह रचला इतिहास; असा पराक्रम करणारा ठरला पहिला
10
Amravati: भाजप सरकारविरोधी कांदबरी 'ते पन्नास दिवस' विद्यापीठाच्या अभ्यासक्रमातून हटवली
11
Jaish-e-Mohammed Aerrorists Arrested : दिल्ली हादरवण्याचा 'टॉय कार' कट उधळला! जैश-ए-मोहम्मदच्या दोन दहशतवाद्यांना अटक
12
RCB vs CSK: एक नो बॉल अन् ४२ धावा! Tim David ची हवा; AB de Villiers च्या विक्रमाशी बरोबरी
13
Ashok Kharat Case : "सीडीआर लीकची चौकशी होणार,'ईडी'चा फास आवळणार"; अशोक खरात प्रकरणावर मुख्यमंत्री फडणवीसांचे स्पष्ट संकेत
14
पत्नीचा खून करून ‘गॅलरीतून पडली’चा बनाव; बिबवेवाडीतील हत्याकांड उघड
15
SRH vs LSG : काव्या मारनसोबत स्माईल; सामना संपताच डोळ्यांत तरळले आनंदाश्रू, संजीव गोयंका यांची रिॲक्शन व्हायरल
16
"आतापर्यंत जे झालं नाही, ते आता मंगळवारी होईल"; डोनाल्ड ट्रम्प यांच्या तोंडी शिव्या, सर्वात मोठ्या हल्ल्याची इराणला धमकी
17
बंगालमध्ये परिवर्तनाची लाट; निवडणुकांनंतर TMC च्या पापांचा हिशोब घेतला जाईल...पीएम मोदींचा हल्लाबोल
18
होर्मुझ ठप्प तरीही नो टेन्शन! सरकारचा 'थार प्लॅन' करतोय काम; भारतात दररोज विक्रमी तेल उत्पादन
19
सर्व पक्षांनी सुनेत्रा पवारांना पाठिंबा देत निवडणूक बिनविरोध करावी; उपमुख्यमंत्री शिंदेंचे आवाहन
20
SRH vs LSG : रिषभची 'पंतगिरी'! सनरायझर्सला घरच्या मैदानात पराभूत करत लखनौनं फोडला विजयाचा नारळ
Daily Top 2Weekly Top 5

विद्यापीठ अधिसभा; व्यवस्थापनच्या जागांवर प्रगती पॅनलचा झेंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 28, 2017 03:24 IST

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत व्यस्थापनच्या प्रतिनिधी पदांच्या ५ पैकी ३ जागा पटकावून विद्यापीठ प्रगती पॅनलने बाजी मारली आहे. तर, विद्यापीठ एकता पॅनलला २ जागा मिळाल्या आहेत.

पुणे : सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत व्यस्थापनच्या प्रतिनिधी पदांच्या ५ पैकी ३ जागा पटकावून विद्यापीठ प्रगती पॅनलने बाजी मारली आहे. तर, विद्यापीठ एकता पॅनलला २ जागा मिळाल्या आहेत. विद्यापीठ प्रगती पॅनलचे संदीप कदम, राजेंद्र विखे-पाटील विजयी झाले, तर सुनेत्रा पवार या बिनविरोध निवडून आल्या. विद्यापीठ विकास मंच प्रणित एकता पॅनलचे सोमनाथ पाटील, श्यामकांत देशमुख विजयी झाले.अधिसभा निवडणुकीत व्यवस्थापन प्रतिनिधिपदाच्या ६ जागा आहेत. त्यांपैकी एक जागा बिनविरोध झाली, तर अनुसूचित जाती प्रवर्गाची जागा उमेदवार न उपलब्ध झाल्याने रिक्त राहिली. त्यामुळे उर्वरित ४ जागांसाठी निवडणूक झाली. अधिसभा निवडणुकीसाठी २२८ मतदार होते. त्यांपैकी २२५ इतके (९८ टक्के) विक्रमी मतदान झाले होते; मात्र २२५ पैकी २२० मते वैध ठरली होती.सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या अधिसभा निवडणूक मतमोजणी प्रक्रियेला सकाळी ८ वाजता सुरूवात झाली. त्यानंतर लगेच १० वाजेपर्यंत व्यवस्थापनचे निकाल जाहीर झाले. मतमोजणीच्या पहिल्या फेरीत ५६ मते घेऊन सोमनाथ पाटील विजयी झाले. त्यानंतर दोन फेºया झाल्या. चौथ्या फेरीत श्यामकांत देशमुख ५१, संदीप कदम ४५ तर राजेंद्र विखे-पाटील ४२ मते घेऊन विजयी झाले. व्यवस्थापन प्रतिनिधिपदासाठी दोन्ही पॅनलमध्ये मोठी चुरस पाहायला मिळाली. महिला गटातून सुनेत्रा पवार बिनविरोध विजयी झाल्याने विद्यापीठ प्रगती पॅनलच्या खात्यात यापूर्वीच एक जागा जमा झाली होती. निवडणुकीनंतर प्रगती पॅनेलकडे ३, तर एकता पॅनलला २ जागा मिळाल्या.अशी झाली मतमोजणी0253 2328936व्यवस्थापन प्रतिनिधी मतमोजणीच्या पहिल्या फेरीत सोमनाथ पाटील ५६ मते घेऊन विजयी झाले. विजयी होण्यासाठी ४५ मतांचा कोटा आवश्यक होता. त्यामुळे त्यांची जास्तीची असलेली ११ मतांचा दुसरा पसंतीक्रम मोजला गेला. त्यानंतर कमी मते मिळालेल्या राजीव जगताप, दीपक शहा यांचीही दुसºया पसंतीक्रमाची मते मोजली गेली. त्यानुसार चौथ्या फेरीत श्यामकांत देशमुख ५१, संदीप कदम ४५ तर राजेंद्र विखे-पाटील ४२ मते घेऊन विजयी झाली.अधिसभा निवडणुकीत विजयी झालेल्या चारही उमेदवारांनी विद्यार्थी केंद्रीत भूमिका बजावणार असल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली. पक्षीय मतभेद विसरून विद्यार्थी हा एकच पक्ष मानून काम करू अशी भावना त्यांनी व्यक्त केली.अभ्यासक्रमांमध्ये सुधारणा करण्यासाठी अधिसभेच्या माध्यमातून प्रयत्न करणार आहे. त्याचबरोबर विद्यार्थ्यांच्या प्रश्नांवर काम करणार आहे. - सोमनाथ पाटीलअधिसभेमध्ये ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचे प्रश्न प्राध्यान्याने मांडणार आहे. विद्यार्थी केंद्रबिंदू मानून काम करू. - राजेंद्र विखे-पाटीलग्रामीण भागातील महाविद्यालयांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहे, त्यांच्या सोडवणुकीसाठी पुढाकार घेऊ. - संदीप कदमसंस्था, शिक्षक -शिक्षकेतर कर्मचारी, महाविद्यालय, विद्यार्थी यांचे प्रश्न अधिसभेत मांडून ते सोडवण्यासाठी पाठपुरावा करू. - श्यामकांत देशमुख

टॅग्स :PuneपुणेPune universityपुणे विद्यापीठ